Mission India (मिशन इंडिया)
भारत देश बदलण्याची ताकद भारतातल्या तरुण पिढीत आहे, तीच भारताचं आशास्थान आहे. तरुणांचे लाडके गुरू डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक नागरिकापुढे – खासकरून तरुण पिढीपुढे एक मौलिक ध्येय ठेवलं आहे ते म्हणजे, `मिशन इंडिया'चं – विकसित राष्ट्र म्हणून भारताची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावण्याचं, आपलं मानाचं स्थान निर्माण करण्याचं! हे ध्येय साध्य करण्यासाठी कलाम यांनी विकसित देश म्हणजे काय, त्यांची लक्षणं, त्यांची अर्थव्यवस्था आणि भारताची सद्य:स्थिती यांबद्दल तपशीलवार विवेचन पुस्तकात केलं आहे. तसंच भारत विकसित देश व्हावा यासाठी आपण शेती, रसायन उद्योग आणि बायोटेक्नॉलॉजी, उत्पादननिर्मिती उद्योग, संरक्षण, सेवा क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था आदी क्षेत्रांमध्ये कशी प्रगती केली पाहिजे, त्यासाठी भविष्यात कोणती पावलं उचलली पाहिजेत याचा सहजसोप्या शब्दांत उदाहरणासह यात ऊहापोह केला आहे. भारताच्या भविष्यकालीन विकासाच्या दिशेचं भान देणारं... सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणारं आणि त्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्यास प्रेरणा देणारं पुस्तक...मिशन इंडिया !