Ibru (इब्रु)

By (author) Priyanka Patil Publisher Menka Prakashan

प्रियांका पाटील हिच्या कथांमधून भेटणार्‍या स्त्रिया (आणि पुरुषही) एकविसाव्या शतकातल्या जागतिक मानवी संबंधांच्या परिवर्तनशील पर्यावरणाच्या द्योतक आहेत. हिंदुस्थानात आणि मराठी साहित्यामध्ये तर या लेखिकेच्या काही कथा धक्कादायक व परंपरेला धीटपणे छेद देणार्‍या ठराव्यात अशाच! लिखाणाची वैशिष्ट्यं पाहता, प्रियांका पाटील ही उद्याची समर्थ कथाकार असू शकेल, हे मी बिनधास्तपणे नमूद करतो. - मधु मंगेश कर्णिक (ज्येष्ठ साहित्यिक) ... नवोदित कथाकारांच्या घोडदौडीत प्रियांका पाटीलचा ‘इब्रु’ हा कथासंग्रह एक वेगळी कथाशैली घेऊन येत आहे, जो माझ्यातल्या वाचकाला स्तब्ध तर करतोच, पण माझ्या आतल्या माणूसपणालादेखील काहीसा अस्वस्थ करून जातो. आपल्यातल्या हरवत चाललेल्या माणूसपणाला साद घालत राहतो. प्रियांका, तुझ्यातल्या व्यथा कथारूपांत येत असताना इतकंच म्हणावंसं वाटतं, की कागद नवा नसेलही, पण शाई नक्कीच नवी आहे! - गजेंद्र अहिरे (निर्माता-लेखक-दिग्दर्शक)

Book Details

ADD TO BAG