-
Pimpalpan Part -16 (पिंपळपान भाग-१६)
आशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Khaki Stories Part 1 (खाकी स्टोरीज भाग १)
पोलिसी तपासकथा उत्कंठावर्धक असतातच, परंतु डिजिटल युगात गुन्ह्यांचा सारीपाटच बदलला गेलाय. अर्थात, तपासाचं तंत्रही बदलून गेलंय. गुन्ह्याची शस्त्रं आणि क्लृप्त्या बदलल्या, तसा त्यांचा माग काढण्याच्या पद्धतीतही आमूलाग्र बदल झाला. गुन्हेगारीच्या विकृतीला आता अत्याधुनिक गॅजेट्सची साथ लाभलेली आहे. मनोरंजन आणि उपयुक्तता असलेली गॅजेट्स प्रत्येकाच्या हातात आल्यामुळे त्यांच्यावर जाळं फेकण्याऱ्यांची कमी नाही. स्मार्ट फोन वापरणाऱ्यांना हातोहात 'मामा' बनवण्याचे फंडे विकसित झालेले आहेत. या गुन्ह्यांचं स्वरूप चक्रावणारं आणि विजेच्या वेगानं कवेत घेणारं आहे. तपासयंत्रणांच्या बुद्धीचा कस पाहणाऱ्या या गुन्ह्यांचं आव्हान आक्राळविक्राळ आहे. या पार्श्वभूमीवर गुंतागुंतीच्या केसेसचा लीलया फडशा पाडणाऱ्या इन्स्पेक्टर किरण देशमुख आणि त्यांच्या टीमच्या कौशल्याचा चित्तथरारक वेध घेणाऱ्या खाकी वर्दीतल्या तपासकथा एक कडक सॅल्यूट ठोकायला भाग पाडतील.
-
Pimpalpan Part -15 (पिंपळपान भाग-१५)
Madhuri Shanbhag Vrunda Bhargav Suman Phadke Mandakini Godse Kalpana Bhagwat Pravin Davane Prakash Pathak Rajesh Belhekarआशयसमृद्ध, भावस्पर्शी कथांच्या रूपानं आजवर अनेक सिद्धहस्त लेखकांच्या लेखणीचा स्पर्श 'मेनका'चं रंगरूप खुलवत राहिला आहे. मनाचा ठाव घेणाऱ्या विलक्षण प्रवाही कथा हे 'मेनका'चं बलस्थान. मराठी भावविश्वाला गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ गुंतवून ठेवणाऱ्या दिग्गज लेखकांच्या विविधरंगी कथा एकत्रित स्वरूपात आणणारं हे पिंपळपान...
-
Sheel (शीळ)
शीळ, कैफियत आणि खलनिग्रहणाय.... अगदी वेगळ्या विषयावरच्या तीन दीर्घकथा ◆ प्रियकराच्या विशासावर लग्न करून शलाका सासरी येते. दिराच्या कारस्थानांना बळी न पडता शलाका युक्तीनं त्यालाच जन्माचा धडा शिकवते. कसा? ◆ गौरव आणि कामिनी दोघंही स्वार्थी उपभोगाला चटावलेले. सरळसाधी कावेरी आयुष्यभर वाट्याला आलेली कर्तव्यं प्रेमानं पार पाडत राहते. शेवटी कोण जिंकतं ? ◆ आपल्या वडलांवर, शाळेतल्या बाईंवर झालेला अन्याय साधना विसरू शकत नाही. योग्य वेळ येण्याची ती वाट पाहते आणि योजनाबद्धरीतीनं दुष्टांचा काटा काढते.
-
Daityaraj Auto Shankar Ani Itar Katha (दैत्यराज ऑट
रानटी अवस्थेत राहणारा माणूस सुसंस्कृत होण्यासाठी हजारो वर्षं लागली, पण माणूस खरंच सुसंस्कृत झाला का? मानवी इतिहासातली अनंत युद्धं आणि त्यात गेलेले लक्षावधी बळी काहीतरी वेगळंच सांगतात. चेहऱ्यावरचे मुखवटे उतरतात आणि त्यामागची हिंसक वृत्ती सतत दिसत राहते. जगभरात घडणारे गुन्हे माणसांतली श्वापदं जिवंत असल्याचे दाखले रोज देतात. गुन्ह्यांच्या या कथा मानवी मनातल्या हिंसक भावनांचं ‘कॅथार्सिस’ आहेत. हा ‘कॅथार्सिस’ अधिक गतिमान आणि प्रबळ करणाऱ्या थरारक कथा कल्पिता राजोपाध्ये यांच्या धारदार लेखणीतून...
-
Deshodeshichi Khadyasanskriti (देशोदेशींची खाद्यसं
आज जग जवळ आलंय. त्यामुळे भाषा, संस्कृती यांची जशी देवाण-घेवाण होते, तशीच खाद्यसंस्कृतीचीही होते. प्रत्येक ठिकाणची खाद्यसंस्कृती त्या त्या ठिकाणचं हवामान, तिथली पिकं, समुद्रसान्निध्य, डोंगराळ प्रदेश अशा अनेक भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असते. प्रत्येक देशाच्या वेगवेगळ्या भागांत ती वेगवेगळी असू शकते आणि ती बदलत राहते. अशा प्रकारची देवाण-घेवाण वर्षानुवर्षं होत आलेली आहे. तरीही काही परंपरागत पाककृती तशाच राहतात. इतकंच काय, पण बाहेरून आलेल्या पाककृती, तिथल्या स्थानिक चवीप्रमाणे आणि पद्धतीनुसार बदलतात आणि रूढ होतात. जगाच्या कानाकोपर्यातल्या अशाच विविध खाद्यपदार्थांचा खजिना म्हणजे वसुंधरा पर्वते यांचं ‘देशोदेशींची खाद्यसंस्कृती’ हे पुस्तक. प्रत्येक गृहिणीच्या संग्रही असायलाच हवं.
-
Vikalpa (विकल्प)
‘विकल्प’ या डॉ. अनघा केसकर यांच्या नव्या कथासंग्रहात विविध विषयांवरच्या नऊ कथा आहेत. हा ताजा कथासंग्रह त्यांच्या पूर्वीच्या कथांप्रमाणेच मानवी मनाच्या विविध छटा त्यांच्यातल्या बारीकसारीक कंगोर्यांसकट वाचकांसमोर ठेवतोे. आपल्याच आसपास वावरणारी, आपल्यासारखेच छोटे-मोठे प्रश्न नि समस्या हाताळणारी सामान्य माणसं वाचकाला या कथांमधून भेटतील. आणि म्हणूनच स्वतःच्या अनुभवविश्वाशी कथांतल्या व्यक्तिरेखांचं आणि घटनांचं साधर्म्य शोधण्याचा वाचक अजाणता प्रयत्न करतील. आयुष्याविषयी मुळातून विचार करायला उद्युक्त होतील.