Rahee (राही)
कथासूत्र हा कथेचा आत्मा असतो. रोजच्या मानवी जगण्यातच असंख्य कथाबीजं असतात. ही कथाबीजं फुलवण्यासाठी सूक्ष्म निरीक्षणशक्ती आणि शब्दवैभवाची गरज असते. या दोन्हींचं लेणं लाभलेल्या प्रकाश नारायण दुधाणे यांच्या हातून 'राही' कथासंग्रह साकारलेला आहे. ‘अनसूया’,‘वासुदेव’,‘चाफ्याच्या पिवळ्या फुलांचा सुगंध', 'जोगण', 'विधुर', 'उमा', 'राजाजी' या सर्वच कथा जीवनाच्या विविध अंगांना स्पर्शन जाणाऱ्या आहेत.