Masalevaik Mansa(मासलेवाईक माणसं)
'मासलेवाईक माणसं' या कथासंग्रहात सामान्य व्यक्तिरेखा आहेत. नंदकुमार विजयकर या कथालेखकाने त्या उच्चतम पदावर नेऊन ठेवल्या आहेत. नावाप्रमाणेच व्यक्तिरेखेतील स्वभाव, गुणवैशिष्ट्ये व त्यांच्यातील दोषांवर मात करून गुणसौंदर्य आपल्या लेखणीने कथेत मिश्कीलपणे उतरवून वाचकांचे हृदय खेचून घेतलेले आहे. अनेक ढंगांच्या आवडीनिवडी, व्याधी जोपासणाऱ्या, त्यावर मात करणाऱ्या व्यक्ती, एकोणिशे पन्नासनंतरच्या संस्कृती-संस्कारांचे चित्रण, चाळसंस्कृती आणि नाते, माणुसकी जपणाऱ्या पिढीचे चित्रण या कथासंग्रहात अनुभवास येते. भाषेतील हेलकावे, वागण्याबोलण्यातील लकबी, भाषांची लज्जत या अनेकविध गोष्टींचे चित्रण या कथांतून व्यक्त होते.