Ladha Mumbaicha Covidshi (लढा मुंबईचा कोविडशी)

By (author) Suresh Kakani / Vaishali Rode Publisher Granthali

मुंबई कोरोनाशी लढली आणि लढतालढता एका वेगळ्या अर्थाने घडली. कोरोनाच्या तीन लाटा आल्या, त्या प्रत्येक लाटेतून मुंबई महापालिका काही ना काही शिकली. कधी तिने ऑक्सिजन पुरवठ्याचे धडे घेतले, कधी बेड्सच्या सोयीचे, तर कधी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे. या लढ्याचं नेतृत्व स्वीकारून महापालिकेने आपल्या सर्व विभागांतल्या कर्मचाऱ्यांची टीम उभी केली आणि ‌‘सगळ्यांना' बरोबर घेऊन मुंबईला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढलं. सुरेश काकाणी यांनी या पुस्तकात कोरोना व्हायरसवर मुंबईने विजय कसा मिळवला, हे बारकाईने आणि तपशीलवार मांडलं आहे. काकाणी आणि त्यांची टीम कोरोनाशी लढताना वेगवेगळ्या कल्पना मांडण्यात आणि त्या प्रत्यक्षात आणण्यातही सतत आघाडीवर होती. कोरोनाशी दिलेला हा लढा ‌‘मुंबई मॉडेल' म्हणून जगभर चर्चेत कसा राहिला याची माहिती यातून मिळते. त्यामुळे हे पुस्तक अस्सल आणि खिळवून ठेवणारं झालं आहे. - डॉ. सुभाष साळुंखे

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category