Rang Tya Nabhache (रंग त्या नभाचे)
पुनः प्रत्यय देणाऱ्या आश्वासक कथा डॉ. नितीन करमरकर यांचा पाच कथांचा संग्रह 'रंग त्या नभाचे' या नावाने प्रकाशित होत आहे. याआधी त्यांचा 'समर्पण' हा पुरस्कारप्राप्त कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्या संग्रहातील आणि यातील अशा दोन्ही कथांचा विचार केला तर या कथांची प्रकृती दीर्घत्वाकडे झुकणारी अशी आहे. म्हणजे या कथा एका अर्थाने दीर्घ स्वरूपाच्या आहेत. त्यांना आपल्या कथांमधून जाणिवेपेक्षा अधिक काही वेगळे, अलक्षित असे सांगायचे असते, ते विस्तृत स्वरूपात सांगायचे असते, असे त्यांच्या कथा वाचून ठरवता येईल. मानवी जगण्याचे, सत्याचे दर्शन सर्जनात्मक पातळीवरून घडविणे हा सर्जनशील लेखकाचा धर्म असतो. आणि या धर्माला जगणारे लेखक म्हणून डॉ. नितीन करमरकर यांच्याकडे पाहावे लागते. आपल्याला आलेली अनुभूती ते कथेच्या माध्यमातून सांगता सांगता जीवनाच्या काही अलक्षित, काही लक्षित बाबींकडे, प्रश्नांकडे वाचकांचे लक्ष वेधतात. त्या प्रश्नांची आच आपल्याला कशी आणि किती लागली, याचे पुनःप्रत्यंतर ते आपल्या लेखनातून दर्शविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यामुळे ही कथा आपली वाटते, आपलीशी वाटू लागते. हेच या कथांचे खरे मर्म आहे, असे म्हणावे लागते