Aho Kharach 480 Takke (अहो खरंच ४८० टक्के )

By (author) Dr.Maruti Nalawade Publisher Udveli

ह्या संग्रहात सहा कथा असून बहुतेक दीर्घ कथाच आहेत. ह्या दीर्घकथा आहेत कारण आपण आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त अनुभव सांगून समाजाचे प्रबोधन करावे, ही तळमळ लेखकास आहे. पुढे काय होणार? पुढे काय होणार? याची वाचकांना उत्सुकता निर्माण होते,तो वाचतच राहतो आणि लेखक त्या प्रश्नाचेही समाधान करतो आणि लगेच कथेला नवे वळण देऊन नवीन प्रश्न, नवीन समस्या निर्माण करतो. घटनांमधून घटना घडत जाणे आणि या घटनांचे एकमेकांशी नाते निर्माण होणे, हे कोणत्याही कथा-कादंबरीमध्ये अपेक्षित असते. नेमके हेच ह्या कथांमधून घडते आहे.जीवनातील सतत संघर्षमय अनुभवांमुळे लेखकाला या समस्यांमय प्रसंगाची कमतरता भासत नाही. लेखक समाजातील फक्त नकारात्मकतेचे चित्रण करत नाही, तर समाजातील सकारात्मक बाजूही तो हिरीरीने मांडतो. समाजातील दृष्ट वृत्तीचा तो निषेध करतोच, पण समाजातील चांगुलपणावरही त्याचा विश्वास आहे. आणि म्हणूनच या संग्रहातील सर्वच कथा सुखान्त झाल्या आहेत. अशाप्रकारचे पारंपरिक पद्धतीने केलेल्या वर्णनातून लेखकाचे मराठी भाषेवरील प्रभुत्व लक्षात येते. कथा बरेचदा संवादातून पुढे जाते, तेव्हा पात्रांप्रमाणे ग्रामीण बोलीतही लेखकाने संवाद लिहिण्याची काळजी घेतली आहे. लेखकाची निरीक्षण शक्ती दांडगी आहे, हे या कथा वाचताना प्रत्ययास येते. समर्पक शब्दयोजना, भाषेवरील प्रभुत्व आणि दांडगी निरीक्षणशक्ति यामुळे कथांतील पात्रांच्या व्यक्तिचित्रणात आणि एकामागून एक येणाऱ्या घटनांमध्ये जिवंतपणा आढळतो. एखादा चित्रपट पाहत आहोत, असे आपल्यास वाटते, व ह्या उत्कंठावर्धक कथा आपण केव्हा वाचून संपवतो, ते आपणांस कळतही नाही. डॉ .मारुती नलावडे या लेखकाकडून मराठी साहित्याला फार मोठ्या अपेक्षा निर्माण होऊ शकतात.

Book Details

ADD TO BAG