Dr.Toys Smart Play Smart Toys (डॉ. टॉयज् स्मार्ट प

खेळणी आणि खेळ यातून मुलांना कसं घडवावं, याचं मार्गदर्शन करणारं हे पुस्तक आहे. अगदी नवजात शिशूपासून ते साधारण दहा-बारा वर्षांपर्यंतचा वयोगटाचा लेखिकेने विचार केला आहे. प्ले कोशंट म्हणजेच खेळण्यांक या संज्ञेचा परिचय या पुस्तकातून होतो. तसेच त्या-त्या वयोगटातील मुलांसाठी कोणती खेळणी घ्यावीत, त्या खेळण्यांचा आणि मुलांच्या शारीरिक-मानसिक जडणघडणीचा कसा संबंध आहे, हे सांगितलं आहे. त्या-त्या वयोगटातील मुलांचे महत्त्वाचे शारीरिक, भावनिक-सामाजिक, मानसिक टप्पे यावरही भाष्य केलं आहे. खेळण्यांचे विविध प्रकार सांगितले आहेत. खेळण्यांचं अर्थकारण, खेळण्यांची सुरक्षा इ. मुद्द्यांची चर्चा खेळण्यांच्या अनुषंगाने केली आहे. भिरभिरे, संगीत वाजवणारे खेळणे आणि टेपरेकॉर्डर, बाहुल्या, मनोरे रचणे, टेलिफोन, भोवरा इ. खेळण्यांबद्दल तपशीलवार विवेचन केलं आहे. खेळ आणि खेळणी यांच्या माध्यमातून मुलांना घडविण्यासाठी केलेलं हे सखोल मार्गदर्शन पालकांसाठी आणि खेळमार्गदर्शकांसाठी उपयुक्त आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category