Yamunatiri anande (यमुनातीरी आनंदे)
सामाजिक विषयांबरोबरच या कथासंग्रहात गूढकथा आणि विनोदी कथा हे दोन प्रकारही समाविष्ट केले आहेत. त्यामुळे हा कथासंग्रह म्हणजे सकाळी उठल्यानंतर देवासाठी फुलं वेचत असताना आपण तबकात बकुळीची सुगंधित फुलं, फारसा वास नसलेली पण नियमित फुलणारी तगर, अजिबातच सुगंध नसलेली पण आकर्षक रंगाची जास्वंद, एखादी दूर्वांची जुडी, तुळशीच्या चार मंजिऱ्या, या सगळ्या स्त्रीलिंगी फुलांच्या जोडीला तो अनंत किंवा तो चाफा अशी आरास रचतो, तसा हा कथासंग्रह विविधरंगी, विविधगंधी आहे.