Mahanagar (महानगर)

By (author) Milind Bokil Publisher Majestic Publishing House

'महानगर' ह्या संग्रहातील कथा आहेत शहरी-औद्योगिक पार्श्वभूमी असलेल्या. मानवी जीवनाचा भाग बनलेली यंत्रे इथे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मानवी भावनांचं जग संस्कारित करतात. मग ते शस्त्रक्रियेत मदत करणारं जीवनदायी यंत्र असो वा स्मशानातील विद्युतदाहिनी; मोटारींचं इंजिन असो की लैंगिकतेचा बाजारू कल्लोळ टिपणारा निर्विकार कॅमेरा. महानगरी जीवनव्यवस्थेतून काही प्रश्न निर्माण होतात. माणसं यंत्रांशी खेळतात की यंत्र माणताना खेळवतात ? यंत्राप्रमाणे माणसांनाही गृहीत धरलं जातं का? शहरी व्यवस्थेत माणूसपणा वाढतो की कमी होतो? मिलिंद बोकील यांच्या या कथांमध्ये मनातील अंतर्द्धद्ध हे अंघार-प्रकाश, दिवस-रात्र, यांत्रिक-भावनिक अशा द्वैती ताणातून व्यक्त होतं. हा ताण शोघणं हे या कथांचं सूत्र. प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन ह्यांची चित्रे ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाला लाभलेली आहेत. माणूस, कुटुंब आणि प्रवास ही त्रिसूत्री पटवर्धनांच्या चित्रांमधूनही व्यक्त होते. मुखपृष्ठावरील चित्रातून दिसणारी रेल्वे ब्रिजवरील अस्वस्थ लगबग आणि मलपृष्ठावर व्यक्त होणारी नागरी विषमता ह्या प्रतिमा संवाद साधतात बोकीलांच्या अव्यक्त आशयाशी !

Book Details

ADD TO BAG