Marma (मर्म)
खांडेकरांच्या परंपरेतील कथालेखक, कादंबरीकार, नाटककार आपापल्या पद्धतीने जीवनवादाचा पुरस्कार करत राहिले. सुनील मंगेश जाधव हेही याच पद्धतीने जीवनवादाचा पुरस्कार करत राहिले. सुनील मंगेश जाधव हेही याच परंपरेतील चांगले लेखक आहेत. वि. स. खांडेकर शिक्षक होते. सुनील जाधव हेही शिक्षक आहेत. राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. गेली १५ ते २० वर्षे ते कथालेखन करीत आहेत आणि त्यांचे काही कथासंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. 'मर्म' या त्यांच्या नव्या कथासंग्रहात दहा कथांचा अंतर्भाव असून या सगळ्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांचा भूगोल, घटना आणि लोकजीवनाचं दर्शन या कथांमधून घडतं. या कथासंग्रहातील सगळ्या कथांमध्ये मला आवडलेली कथा म्हणजे 'दहेरजा' ही आहे एका नदीची गोष्ट. नदीच्या अंतरंगात परकायाप्रवेश करून लेखकानं जणू जलप्रदूषण करणाऱ्या कंपनीशी लढा दिला आहे. दहेरजा नदी ज्या प्रदेशांतून वाहते त्या सगळ्या भागाशी लेखकाची ओळख असावी, अशा वास्तववादी घटना, प्रसंग, व्यक्ती आणि त्यांचे संवाद चित्रित करण्यात लेखकानं कसूर ठेवलेली नाही. हे तरुण पुढे दहेरजा वाचवण्यासाठी कसा लढा देतात आणि त्यात ते यशस्वी होतात की अपयशी, हे वाचकांना कळायला हवं असेल तर सुनील मंगेश जाधव यांनी त्यासाठी कादंबरी लिहिली पाहिजे. -- डॉ. महेश केळुसकर