From Russia With Love

उजव्या गालावर आणि डाव्या खांद्यावर ओरखड्याचे व्रण, तालीमबाज, पिस्तुलबाजीमध्ये निष्णात, उत्तम मुष्टीयोद्धा, सुरे फेकण्यात तरबेज, वेषांतर करत नाही, फ्रेंच आणि जर्मन भाषा येतात, धूम्रपानाचं जबरदस्त व्यसन (तीन सोनेरी रिंगांच्या खास सिगरेटस् ओढतो) दुर्गुण : मद्यपान करतो पण अति मद्य घेत नाही, स्त्रियांचा मोह. जगामधल्या प्रत्येक मोठ्या देशातल्या गुप्तचरखात्यामध्ये ब्रिटिश सीक्रेट एजंट जेम्स बॉंड याची संपूर्ण माहिती असलेली फाईल मौजूद आहे. स्मर्श या रशियन गुप्तचर संघटनेनं जेम्स बॉंडला लक्ष्य बनवलं, त्याचा वध करण्यासाठी. जेम्स बॉंडला मोहिनी घालण्यासाठी त्यांनी तातिआना रोमानोवा या रूपसुंदर तरुणीची निवड केली. जेम्स बॉंडला इंग्लंडहून इस्तंबूलपर्यंत खेचून आणणं आणि त्याला आपल्या मोहजालात अडकवणं हे तिचं काम होतं. पुढला सगळा पाताळयंत्री कट तिचे वरिष्ठ घडवून आणणार होते. स्मर्शनं लावलेल्या या सापळ्यात जेम्स बॉंडनं आपण होऊन प्रवेश केला. या घातकी खेळामध्ये भुरळ पाडणारी तातिआना आणि रशियनांचं स्पेक्टर यंत्र ही दोन प्रमुख आमिषं होती. आणि, आणि या भयंकर खेळाचा शेवट अगदी निश्‍चित होता. तो म्हणजे जेम्स बॉंडचा मृत्यु... ! फ्रॉम रशिया विथ् लव्ह. डेली मेल, संडे टाईम्स या वृत्तपत्रांनी गौरवलेल्या इयान फ्लेमिंगच्या या जबरदस्त कादंबरीचा हा उत्कंठावर्धक मराठी अनुवाद.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category