-
Chal Bas Ek Round Marun Yeu (चल बस एक राऊंड मारून येऊ)
माझ्या 'चल बस, एक राऊंड मारून येऊ!' या कथासंग्रहाचं १७ मार्च २०१९ ला प्रकाशन झालं आणि महिनाभराच्या कालावधीतच पाचशे पुस्तकांची पहिली आवृत्ती दणक्यात संपली. फोटोग्राफी व्यवसायानिमित्त होणाऱ्या भटकंतीतून टिपलेले अनुभव कथेच्या स्वरूपात वाचकांसमोर ठेवण्याचा मी केलेला हा प्रयत्न सर्वांच्या पसंतीस उतरला, याचं समाधान निश्चितच आहे. संवेदना प्रकाशनामार्फत पुस्तकांचं वितरण होतच राहिल, नव्या आवृत्याही निघतील, मात्र पुस्तकाची मागणी वाढल्यानंतर पुस्तक लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रकाशकाच्या सोबतीने माझंही काम आहे, असं मी मानतो. अशा वेळेस देश-विदेशातल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी 'ई-बुक' या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे मी ठरवलं आणि त्यासाठी सुप्रसिध्द 'ब्रोनॅटो' या ई-प्रकाशनसंस्थेची निवड केली. ब्रोनॅटोने आजपावेतो अनेक पुस्तके या माध्यमातून वाचकांपर्यत पोहोचवली आहेत आणि आँन-लाईन वाचनाचा आनंद तंत्रज्ञानाशी मैत्री असणाऱ्या वाचकांना मिळवून दिला आहे. वाचक आणि लेखक यांच्यातलं अंतर अशा नव्या पध्दतीने कमी होणं आजच्या नेटयुगात गरजेचंच आहे. माझं हे पहिलं पुस्तक या नव्या रूपात तुमच्या हाती देतांना खूप आनंद होत आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा! - सुहास मळेकर १७ एप्रिल २०१९
-
Salnara Salaam (सलणारा सलाम)
माझ्या लेखनाला प्रोत्साहन देणारे माझे आयकर विभागातील मित्र श्री. रवींद्र पारकर, राजाभाऊ नार्वेकर, यशवंत कदम आणि इतर सर्व सहकारी. माझ्या लेखनाचं कौतुक करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे. माझ्या कवयित्री मैत्रिणी संगीता अरबुने, गौरी कुलकर्णी, लेखिका रश्मी कशेळकर. माझ्या लेखन प्रवासाला साक्षी असणारे, सतत प्रोत्साहन देणारे, बोरीवलीचे भूषण असलेले स्व. डॉ. गुजराथी आणि त्यांचा परिवार. माझे लेखन प्रसिद्ध करणारे तत्कालीन संपादक, लोकसत्ता, सामना, गोमंतक, साहित्यसूची, साप्ताहिक चंद्रप्रभा इत्यादी. आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी श्रीमती. उमा दीक्षित, नेहा खरे आणि ज्योत्स्ना केतकर. माझे भाऊ श्री. चंद्रशेखर आणि महेंद्र हळदणकर. वहिनी सौ. सुरेखा आणि अनघा, भगिनी सौ. छाया आणि मृणाल तसेच माझे कौतुक करणारे माझे मेहुणे श्री. दीपक कुलकर्णी आणि श्री. उपेंद्र बागायतकर पन्नास वर्षांनी नव्याने भेटलेल्या आणि माझं मनापासून कौतुक करणाऱ्या माझ्या शाळेतील मैत्रिणी. कोकण मराठी साहित्य परिषदेचा सर्व मित्रपरिवार
-
Prarabdhachi vat (प्रारब्धाची वाट)
ईश्वराने हातात लेखणी घेऊन आयुष्यात चढ उतार लिहावेत आणि एखाद्या चित्रपटात घडत असणाऱ्या घटना प्रत्यक्षात कुणाच्या आयुष्यात घडत असतील तर याचाच अनुभव प्रारब्धाची वाट ह्या कादंबरी मध्ये वाचकांना येईल.गिरीश आणि अमृता दोघेही संस्कारी आणि सुशिक्षित पण नियतीने त्यांच्या माथी घटस्फोटित असा शिक्का मारला आणि दोघेही खचून गेले.संसार आणि लग्न ह्या शब्दांवरील देखील विश्वास उडून गेलेले हे दोघे पुन्हा आयुष्याकडे छान नजरेने पाहतील का ??वेगवेगळ्या वाटेवरून चालणाऱ्या ह्या दोघांच्या प्रारब्धाची वाट एक होईल का ??एकदा वाईट अनुभव आल्याने त्यांनी मनाशी केलेला ठाम निश्चय तसाच राहील की त्यांचे मतपरिवर्तन होईल ??दोघेही पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकून जातील की फक्त एक मित्र म्हणून आपले दुःख वाटून आपले मन एकमेकांच्या जवळ हलके करून आपापल्या वाटेने निघून जातील.?या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी ही कादंबरी तुम्हाला वाचायला हवी ,वाचन करत असताना तुम्ही त्यात गुंग होऊन जाल हे नक्की. ✍️ श्री.आनंद पिंपळकर ( सुप्रसिध्द वास्तूतज्ञ ज्योतिर्विद विद्या वाचस्पती )
-
Ek Ulat Ek Sulat Bhag 2 (एक उलट एक सुलट भाग २)
हे एका शहाण्या मुलीचं मर्मस्पर्शी लिखाण आहे. तिच्यासाठी तिचं लेखन ही एक शोधाची वाट आहे. तिच्यामध्ये एक अतिशय उत्कट अशी शिकणारी मुलगी आहे. ती तिच्या लिखाणामधून स्वत:ला वाढवायला बघते. इतकी वाढण्याची धडपड मला फार कमी माणसांमध्ये दिसते. तिच्यात सतत एक ऊर्मी आहे, सतत एक उत्साह आहे. मोठ्ठा हात पसरून एखाद्या मुलीनी यावं ना, ‘हे सगळं मला हवंय!’ असं म्हणत, तशी मला अमृता तिच्या लिखाणातून दिसते. एकूणच जीवन समजून घेण्याची या मुलीला फार असोशी आहे. शिवाय विचारपूर्वक जगण्याचं भान आहे आणि अशा जातीच्या माणसांना कायम अतृप्त, अस्वस्थ राहण्याचा एक शाप किंवा वर असतो. तोही तिला मिळालेला आहे, असं मला वाटतं. तिच्याभोवती घरीदारी नाटक, सिनेमा, चित्रं, संगीत, गाणं, नाचणं या सगळ्यांनी झणकारणारं वातावरण आहे आणि या झणकारणार्या वातावरणामध्ये ती स्वत:चा आवाज लावू पाहतीये. अतिशय प्रामाणिक आणि उत्कट अशा मुलीचा तो आवाज आहे आणि अमृता, तुझा आवाज आम्हाला छान ऐकू येतोय. डॉ. अरुणा ढेरे
-
Aadikal Ek Itihas : Part 2 (आदिकाल एक इतिहास : उत्तरार्ध)
आदिकाल : एक इतिहास' हे पुस्तक प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. हे पुस्तक वाचकांना भारताच्या समृद्ध भूतकाळात घेऊन जातं आणि प्राचीन भारताच्या विविध पैलूंची माहिती देतं. केवळ पौराणिक कथा नाही तर त्यामागील शास्त्र, इतिहास इत्यादी गोष्टी व्यापक दृष्टीने हे पुस्तक समजावून सांगतं. श्री. वझलवार यांनी यात सोप्या भाषेत आणि कथारुपात, आकर्षक पद्धतीने अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. भारताची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपणारं हे पुस्तक एक अमूल्य ठेव आहे. आपल्या समृद्ध भूतकाळाची ओळख करून देत आपल्या संस्कृतीचा वारसा जतन करणारं हे पुस्तक नक्कीच संग्रही हवं.
-
Manik Moti Manik Varma Ani Parivar (माणिक मोती माणिक वर्मा आणि परिवार)
माणिक वर्मा' असे नाव उच्चारले की, कानामनात रुणझुणू लागतात असंख्य भावगीते, भक्तिगीते अन् नाट्यगीते. शास्त्रीय संगीतातही आपले वेगळे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी जशी लखलखती कारकीर्द साकारली, तसाच स्वतंत्र ठसा वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात उमटवला. माणिकताईंचे पती अमर वर्मा हिंदी आणि उर्दूचे ख्यातकीर्त शायर. दोन कन्या - भारती आचरेकर अन् वंदना गुप्ते सुप्रसिद्ध अभिनेत्री, तर तिसरी कन्या राणी वर्मा नामवंत गायिका. चौथी कन्या अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट. संपूर्ण वर्मा परिवार म्हणजे जणू विविध कलाक्षेत्रांमध्ये लाखो रसिकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवणारी अनमोल रत्ने. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त या समग्र परिवाराच्या कलाकर्तृत्वाचा वेध घेणार्या स्मृतिचित्रांचा वेधक शब्दपट -
-
Bharat Satya Satva Swatva (भारत सत्य सत्व स्वत्व)
श्री. अभिजित जोग लिखित ‘भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ हा ग्रंथ म्हणजे हजारो वर्षांपूर्वी भारतीयांनी केलेल्या ज्ञानोपासनेचा व भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा धावता आढावाच होय. ‘ज्ञान विज्ञान योग’ असे प्रस्तुत ग्रंथाचे वर्णन करता येईल. यात तत्वज्ञान, अध्यात्म, भाषा ( संस्कृत ), वैद्यक, खगोलशास्त्र, गणित, धातुशास्त्र या ज्ञान-विज्ञानाच्या सर्व आयामांचा भारतातच उदय झाल्याचे सप्रमाण विवेचन केलेले आढळते. सखोल चिंतन, ‘ना मूलं लिख्यते किंचित’ हे असे धोरण, भारत म्हणजे जगातला पहिला ज्ञानाधिष्ठित समाजाचा देश, वेदोपनिषदे व सभ्यतेची मानवी मूल्ये भारतात निर्माण झाली तेंव्हा इतर देशात अज्ञानांधःकारच होता हे ठासून सांगणारा हा ग्रंथ होय. ही अशी एकमेवाद्वितीय ज्ञानपरंपरा आठवून भारतीयांना ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’ असे सुचविणारा हा मौलिक ग्रंथ होय. गो. बं. देगलूरकर नामवंत विद्वान आणि भारतीय कला व स्थापत्यशास्त्राचे सर्वमान्य अभ्यासक विषयाचा आवाका आणि मांडणी याबाबतीत हे पुस्तक ज्ञानकोषीय पातळीवर जाते. इतका मोठा विषय हाताळताना बारीक-सारीक तपशीलही सुटणार नाही याची काळजी घेण्यात लेखक अभिजित जोग पुन्हा एकदा यशस्वी ठरले आहेत. तरीही, प्रवाही भाषेमुळे हे पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे. भारतवर्षाची खरी ओळख पुनर्स्थापित करणारे हे दर्जेदार पुस्तक सर्व प्रकारच्या वाचकांना आवडेल असा मला विश्वास वाटतो. नीलेश ओक विद्वान संशोधक आणि लेखक
-
Anandi Jivnache 7 Pailu (आनंदी जीवनाचे ७ पैलू)
स्वतःच्या आयुष्याचा उद्देश समजून घेताना लेखकाला लागलेला आयुष्याबद्दलचा एक शोध म्हणा किंवा स्वानुभूती म्हणा, उद्देशपूर्ण आयुष्य जगण्यासाठी आत्मशोधाच्या दिशेने जाणारा सुनीत पाटील यांचा एक शोधनिबंध .... वाचकांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारा.... अंतर्मुख करणारा.... आनंदी जीवनाचे ७ पैलू शिक्षण ज्ञान कारकीर्द आर्थिक स्वातंत्र्य नातेसंबंध विवाह आरोग्य सुनीत पाटील यांनी मुंबई विद्यापीठातून mms ची पदवी प्राप्त केली आहे. काही काळ business analyst या पदावर कार्य केले आहे, तसेच काही काळ human resources manager म्हणून कार्यभार सांभाळला आहे. सध्या त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे व ते विधीविषयक शिक्षणही घेत आहेत.
-
The Art Of Self Awareness (द आर्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस)
द आर्ट ऑफ सेल्फ अवेअरनेस ही एक अशी यात्रा आहे, जी तुम्हाला कोणत्याही परदेशी दौऱ्यावर घेऊन जाणार नाही तर हा आपल्या अंतरंगामध्ये जाण्याचा प्रवास आहे. हा प्रवास काही अंशी धोकादायक, भीतीदायक आणि असहज करणारा असला तरीही यात्रा पूर्ण केल्यानंतर मिळणारा पुरस्कार असामान्य आहे. स्वजागरूकता म्हणजे फक्त तुमचं नाव जाणणं नाही तर स्वजागरूकता म्हणजे तुम्ही कशामुळे आनंदी होता, कशामुळे दुःखी होता हे जाणणं. याचबरोबर अशा कोणत्या मान्यता आणि खोलवर रुजलेल्या धारणा आहेत, ज्यामुळे या भावना उत्पन्न होतात हेही समजून घेणं. काही लोक त्यांच्या समस्यांचं समाधान बाहेरील जगामधे शोधत असतात. पण हे फक्त जखमेवर बँडेज लावण्यासारखं आहे. खरंतर आपल्याला आनंदी आणि दुःखी करणाऱ्या गोष्टीचं मूळ कारण हे आपल्या आतमधेच दडलेलं असतं. आता त्या गोष्टीचा शोध घेण्याची वेळ आली आहे. मेटाकॉग्निशन हे सर्वात कठीण कौशल्य आत्मसात करा : मेटाकॉग्निशन म्हणजे आपल्या विचारांवर विचार करणं.
-
Ikigai Ek Safar (इकिगाई एक सफर)
‘इकिगाई एक सफर’ या पुस्तकामध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठीचे 35 प्रभावी मार्ग सांगितले आहेत. या मार्गांचा उपयोग करून आपण आपल्या जीवनाचा उद्देश्य पूर्ण करू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. हे पुस्तक आपल्याला प्रेरणेने आणि उद्देश्याने परिपूर्ण अशा एका नव्या यात्रेवर घेऊन जाते. या यात्रेमध्ये आपल्याला पुढील स्थानकं लागतील. * भविष्याची कल्पना - आपण भविष्यात काय काय साध्य करू शकतो याविषयीचा आशावाद. * भूतकाळातून शिकवण - भूतकाळामध्ये आपण घेतलेल्या चांगल्या आणि वाईट, दोन्ही निर्णयांमधून आणि अनुभवातून मिळालेली शिकवण. * वर्तमानातील जीवन - प्रत्येक क्षणाला आनंदी जीवन जगण्यासाठी आपण वर्तमानामध्ये काय करायला हवं? * आपल्या अनुभवालाच आपल्या वर्तमानातील आणि भविष्यातील मार्गासाठी दीपस्तंभ कसे बनवावे? * ध्येयनिश्चिती - आपण कशाप्रकारे आपली ध्येयं ठरवू शकतो आणि कोणती साधनं आणि मार्ग आपल्याला ती साध्य करण्यासाठी मदत करतील? The Ikigai Journey या मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद
-
Drive (ड्राईव्ह)
कौशल्य, स्वायत्तता आणि उद्देश ही प्रेरणेची तीन तत्त्वं आहेत. ड्राइव्ह पुस्तकामधे या तीनही तत्त्वांचं सखोल विश्लेषण केलेलं आहे. तसंच यांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी स्मार्ट तंत्रं सांगितलेली आहेत. बहुतेक लोकांचा असा समज आहे की, लोकांना प्रोत्साहन देण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना पुरस्कार देणे किंवा शिक्षा देणे. बेस्टसेलर लेखक डॅनियल एच. पिंक असं म्हणतात की, हा दृष्टिकोन चुकीचा आहे. 1) प्रेरणेतील प्रगती आणि अधोगती 2) बक्षीस आणि शिक्षेचा उपयोग न होण्यामागील तीन कारणे 3) आंतरिक प्रेरणा 4) आय आणि एक्स प्रेरणा 5) प्रेरणा जागृत करण्याच्या नऊ पद्धती 6) पालक-शिक्षकांनी मुलांना प्रेरणा कशी द्यावी 7) व्यायाम सुरू करण्यासाठी आणि 8) चालू ठेवण्यासाठी युक्त्या
-
Build The Life You Want (बिल्ड द लाईफ यू वॉन्ट)
या पुस्तकात मला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. मला आशा आहे की, तुम्हीदेखील त्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहाल. म्हणजे एक अशी खऱ्या अर्थी आनंदी व्यक्ती पाहाल, जी तुम्ही बनू शकता. आर्थरने या पुस्तकात मांडलेल्या तत्त्वांचे मी पालन करते आणि त्यामुळे मी अधिकाधिक आनंदी होत चालले आहे. मला खरंच मजा येत आहे. मला हे पक्कं माहिती आहे की, जेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देतो तेव्हा तो वाढतो. हे पुस्तक तुम्हाला आनंद स्वीकारण्याचं आणि तुमचा आनंद इतरांनाही वाटण्याचं स्मरण देत राहील. ओप्रा विन्फ्रे या पुस्तकात... आनंद म्हणजे काय? भावनांचं व्यवस्थापन मेटाकॉग्निशनची शक्ती आपला नावडता भूतकाळ परत कसा लिहावा? उद्देश्य असलेलं आणि अर्थपूर्ण जीवन जे खरोखरच महत्त्वाचं आहे ते घडवणे
-
Level Up (लेव्हल अप)
‘लेव्हल अप’ हे पुस्तक तुमच्या आयुष्याप्रती आणि ध्येयांप्रती असलेल्या दृष्टिकोनात क्रांतिकारी बदल घडवेल. “आत्तापर्यंत रॉब डायलच्या प्रशिक्षणाने लाखो लोकांना त्यांची मानसिकता बदलवण्यास आणि ध्येय प्राप्त करून देण्यास मदत केली आहे. ‘लेव्हल अप’ हे पुस्तक वाचून तुम्हालाही समजेल की, तुम्हाला हवं असणारं आयुष्य कसं मिळवायचं.” - हाल एलरॉड ‘दि मिरॅकल मॉर्निंग’ या पुस्तकाचे लेखक. “उज्ज्वल भविष्याची गुरूकिल्ली.” - लेविस होवेस ‘द ग्रेटनेस माईंड सेट’ या पुस्तकाचे लेखक. या पुस्तकात… तुम्ही कृती का करत नाही? कृती करण्यासाठी स्वतःला कसं भाग पाडावं? सवयी निर्माण कशा कराव्यात आणि त्यावर कसं टिकून राहावं? भीतीचे प्रकार आणि त्यांची वास्तविकता कार्यक्षमतेचं रहस्य – एकाग्रता मेंदूत बदल घडवून आणणारं शास्त्र चित्त एकाग्र करणे, प्रोत्साहन मिळवणे यामागचे शास्त्रीय सिद्धांत
-
How To Know A Person (हाऊ टू नो अ पर्सन)
या पुस्तकाचे लेखक डेव्हिड ब्रुक्स म्हणतात, ‘वय वाढतंय, तसं मला एका गोष्टीची जास्तीत जास्त खात्री वाटायला लागली आहे की, कोणतंही समतोल कुटुंब, कंपनी, वर्ग, समाज किंवा राष्ट्र यांच्या केंद्रस्थानी एकच कौशल्य असतं : ते म्हणजे, एकमेकांना जाणून घेण्याची क्षमता. समोरच्याला आपली किंमत केली जात आहे, आपलं कोणीतरी ऐकून घेतंय आणि आपल्याला समजून घेतलं जातंय असं वाटायला लावणं.’ घर, ऑफिस आणि समाजात तयार होणारी नाती आयुष्यभरासाठी कशी दृढ करायची, समोरच्याला खऱ्या अर्थानं कसं जाणून घ्यायचं? हे सांगणारं आणि सहज अमलात आणता येण्याजोगं पुस्तक. या पुस्तकात... दखल घेण्याची ताकद समोरच्याला समजून घेताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात ? अवघड परिस्थितीत कसं संभाषण करावं ? निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मित्राला कशी मदत करावी ? संघर्ष तुमच्या जीवनाला कसा आकार देतो? तुम्ही तुमच्याबरोबर कोणती ऊर्जा घेऊन येता?
-
The Happiness Story (द हॅप्पीनेस स्टोरी)
सर्वोत्तम जीवन जगण्याचं रहस्य उलगडणारं पुस्तक - आनंद हे दूरचे स्वप्न नसून तुमच्या आवाक्यात असलेली निवड आहे. भीतीदायक जगामुळे निराश होण्याची गरज नाही. कारण त्याचा सामना करण्याचा प्रभावी मार्ग उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला तो मिळवता येईल. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आवडी जोपासण्यासाठी, महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं नशीब स्वतःच लिहिण्यासाठी प्रेरित करेल. परिस्थिती काहीही असो, या पुस्तकात दिलेले व्यावहारिक सल्ले तुम्हाला दररोज आनंद आणि शांततेचा अनुभव देतील. 1) आपली दैनंदिन जीवनशैली कशी आखावी ? 2) स्वतःची काळजी घेणं 3) कृतज्ञता 4) इच्छा-आकांक्षा आणि यातना यांचं चक्र 5) आनंदाच्या बाबतीतलं सत्य 6) स्वतःच्या बाबतीतली जागरूकता
-
You Happier (यू हॅपिअर)
न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलिंग लेखक डॉ. डॅनिअल आमेन यांनी न्यूरोसायन्सच्या सात रहस्यांचा उलगडा केला आहे. या रहस्यांच्या माध्यमातून एखादी व्यक्ती 30 दिवसांमध्ये 30 टक्के जास्त आनंदी राहू शकते. तुमचं वय किती आहे, तुमची वाढ कशा पद्धतीने झाली आहे, तसंच तुमची आनुवंशिक वैशिष्ट्ये किंवा तुमचा वर्तमान कसाही असला तरीही ही रहस्यं तुम्हाला आनंदी राहण्यात मदत करतात. b. आनंद हे मेंदूचं कार्य आहे. जर मेंदू निरोगी असेल तर आयुष्य आनंदाने जगता येऊ शकतं. डॉ. आमेन यांनी 155 देशांमधील 200000 पेक्षाही जास्त मेंदूंच्या स्कॅन्सचा अभ्यास केला. त्या अभ्यासाद्वारेच त्यांनी आनंदासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या मेंदूच्या पाच प्राथमिक प्रकारांचा आणि न्यूरोसायन्समधील सात रहस्यांचा शोध लावला. ‘यू हॅपिअर’मध्ये त्यांनी याची सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही आनंदी होण्यासाठी यात काही शास्त्रशुद्ध आणि व्यावहारिक उपाय सांगितले आहेत. जसे की : 1) तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार तुमच्या मेंदूचा प्रकार कसा ओळखायचा आणि स्वतःसाठी उपयुक्त असलेले आनंदी होण्यासाठीचे उपाय कसे करायचे 2) स्वतःची मनःस्थिती सतत चांगली ठेवण्यासाठी स्वतःच्या मेंदूचे सर्वांगीण आरोग्य कसे सुधारायचे 3) मेंदूत सुरू असणाऱ्या गोंधळापासून स्वतःला वेगळे करून स्वतःच्या आनंदाचे रक्षण कसे करायचे 4) स्वतःच्या आनंदात वाढ करण्यासाठी घ्यायचे सात सोपे निर्णय आणि विचारायचे सात प्रश्न कोणते c. स्वतःचा आनंद सतत कायम ठेवणं हा एक रोज चालणारा प्रवास आहे. ‘यू हॅपिअर’मध्ये डॉ. आमेन तुम्हाला न्यूरोसायन्सवर आधारित काही सवयी, पद्धती आणि पर्यायांबद्दल सांगतात. यामुळे तुमची मनःस्थिती तर चांगली राहतेच, शिवाय तुम्ही रोज स्पष्टपणे ठरवलेली मूल्ये, उद्देश्य आणि ध्येयांवर आधारित आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला त्याची मदत होते.
-
Gunhyachya Paulkhuna (गुन्ह्याच्या पाऊलखुणा)
प्रत्येक गुन्हेगार काही पुरावे मागे सोडून जातो. कधी ते चटकन सापडतात तर कधी पुरावे सापडायला काही वर्ष ही लागतात. सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध करण्यासाठी आणि गुन्हेगाराची ओळख निःसंशय पटवून देण्यासाठी न्यायव्यवस्था ज्या विज्ञानाचं सहाय्य घेते त्याला न्यायसाहाय्यक विज्ञान असं म्हणतात. चित्रपट आणि टी वी सीरियल्स मधून न्यायसाहाय्यक विज्ञानाची तोंड ओळख झाली असेलच. या पुस्तकात न्यायसाहाय्यक विज्ञानाची सखोल माहिती आणि फॉरेंसिक सायन्सच्या उपयोगाने सोडवलेल्या काही थरारक क्रिमिनल केसेस आहेत. विविध शास्त्र जसे की रसायनशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र यांचा उपयोग न्याय दानासाठी केला जातो. क्राईम सीन पासून न्यायालयापर्यंतचा पुराव्यांचा प्रवास सोप्या भाषेत वर्णन करण्याचा हा प्रयत्न आहे. विविध टेक्नॉलॉजी आणि उपकरणांची उपयोग गुन्हे तपासासाठी केला जातो. या सगळ्याची नेमकी माहिती या पुस्तकात मिळेल. हस्ताक्षर, स्वाक्षरी, बोटांचे ठसे यांचा अभ्यास कसा केला जातो. लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट डीएनए प्रोफाइलिंग अश्या ऐकीवातल्या तंत्रज्ञानाची माहिती या पुस्तकात आहे. न्यायवैद्यक शास्त्र आणि त्याच्या विविध शाखांची ओळखही तुम्हाला या पुस्तकातून होईल. सायबर गुन्हे आणि त्यांचा तपास करण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर/ हार्डवेअर यांची ही थोडक्यात माहिती मिळेल. सत्य हे कल्पनेपेक्षा आश्चर्यकारक असतं या वाक्प्रचाराची अनुभूती देणारे गुन्हे आणि त्यांचा फॉरेंसिक सायन्स च्या मदतीने केलेला उलगडा या पुस्तकात आहे. फॉरेंसिक सायन्स चे विद्यार्थी, तपास कार्य करणारे अधिकारी व एक्सपर्ट्स, न्यायाधीश व वकील, थ्रिलर कथा लिहिणारे लेखक आणि फॉरेंसिक सायन्स व गुन्हे तपास या विषयाचे कुतूहल असलेल्या सर्व वाचकांना हे पुस्तक वाचायला आवडेल.
-
Big Bang Vishwaprarambhache Thararnatya (बिग बँग विश्वप्रारंभाचे थरारनाट्य)
या अथांग विश्वाचा प्रारंभ कसा झाला ? विश्वाच्या प्रारंभाचा शोध घेण्याचं वेड शास्त्रज्ञांना कसं लागलं ? विश्वाच्या प्रारंभाचे पुरावे माणसानं कसे शोधले ? या पुस्तकात उलगडेल विश्वप्रारंभाची शोधकथा.. थक्क करणारा विश्वप्रारंभाचा थरार आणि त्याचा शोध घेताना शास्त्रज्ञांनी केलेली अचंबित करणारी धडपड जाणण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा ! सुर्यासारख्या अब्जावधी ताऱ्यांनी बनणाऱ्या गॅलेक्सीज आणि अशा अब्जावधी गॅलेक्सीजनं बनलेलं विश्व पाहिलं की अक्षरशः थक्क व्हायला होतं. या अथांग विश्वाच्या प्रारंभाचा माणसानं घेतलेला शोध हा एखाद्या उलगडत जाणाऱ्या रहस्यकथेसारखा आहे. 'बिग बँग' ही विश्वाच्या प्रारंभाची शोधकथा आहे. रात्रीच्या आकाशातल्या चांदण्यांचं निरीक्षण करायचं आणि गणित, विज्ञानातले नियम वापरत निव्वळ तर्काच्या आधारावर विश्व कधी आणि कसं निर्माण झालं याचा शोध घ्यायचा म्हणजे माणसाची एक उत्तुंग झेप आहे ! या शोधकथेत एकामागोमाग एक झपाटलेले शास्त्रज्ञ येतात आणि विश्वाच्या निर्मितीच्या रहस्यांचा उलगडा करताना दिसतात.