-
Baaizzat Bari ?
एखाद्या देशातील काही लोकांना केवळ त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य केलं जातं आणि त्यांच्याबाबतीत सरकार आणि जनता पूर्वग्रहाने वागते, असे असेल तर त्या देशाची लोकशाही अपूर्ण आहे. अशाने लोकशाही मॉडेलमध्ये मोठी त्रुटी असल्याची जाणीव मला होते. अशा स्थितीत देशातील सजग प्रसार माध्यमांनीआपल्या वैयक्तिक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन सदर मुद्दे हाती घ्यायला हवेत. मात्र दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर प्रथमच प्रसार माध्यमेच स्वतः समस्या होऊन बसली आहेत.तुम्ही आणि मी घरात बसून कल्पनाही करू शकणार नाही आणि नखशिखान्त हादरुन जाऊ असे काही प्रसंग या पुस्तकात वाचायला मिळतात. - अभिसार शर्मा, ज्येष्ठ टीव्ही पत्रकार राजकीय पक्षांना आरसा दाखवणारा एक भक्कम दस्तावेज म्हणून मीया पुस्तकाकडे बघतो आहे. जागरुक समाजाची भूमिका कशी असावी याबद्दल हे पुस्तक भाष्यकरतं. - अबू बकर सब्बाक, वकील, सर्वोच्चन्यायालय या पुस्तकातील प्रत्येक दस्तावेज ही कहाणी सांगतो :वर्षानुवर्षे तुरुंगवास, दहशतवादाचा कलंक, प्रत्येककेसमध्ये एक नव्हे तर अनेक आयुष्यं उद्ध्वस्त होणं. देशाची सद्यस्थिती या पुस्तकात दिसून येतेच शिवाय या सगळ्याची जबाबदारी कोणत्या एका राजकीय पक्षाची नसून, सगळ्यांचीच आहे हे सांगते. निरपराध माणसांना दहशतवादाच्या नावावर भोगावीलागणरी शिक्षा अल्पसंख्याक माणसांना गुन्हेगार ठरवणाऱ्या एका विचारसरणीकडे निर्देशकरते. हे पुस्तक आणि त्यामागचे कष्ट आजच्या काळासाठी खूप महत्त्वाचे ठरतात. आपल्याविचारसरणीशी आपल्याला लढावं लागणार असल्याची ही हाक आहे, आणिती काही केवळ एका समुदायासाठी अथवा धर्मासाठी नव्हे, तरआपल्या सगळ्यांसाठीच आहे. - हरतोश सिंह बाल, राजकीय संपादक, कारवाँमॅगझीन
-
Hamid
सीमेपलीकडून झालेल्या विश्वासघातामुळे हमीद अन्सारीच्या आयुष्याचं पार वाटोळं होणार होतं. वाचलंच पाहिजे असं पुस्तक- राज चेंगप्पा कहाणीतील प्रत्येक वळण हृदयाचा ठोका थांबवणारं आहे. खूपच उत्तम प्रकारे सांगितलेली कहाणी. - सुहासिनी हैदर तुमच्या हृदयाच्या तारा छेडणारी मनोवेधक कहाणी - राजदीप सरदेसाई नोव्हेंबर, २०१२ मध्ये २७ वर्षांचा मुंबईकर आयआयटी तज्ज्ञ हमीद अचानक कुठंतरी गायबच झाला. काय घडलं होतं त्याच्या बाबतीत ? तो गेला होता तरी कुठं? त्याच्या पालकांना एवढंच ठाऊक होतं की आपला मुलगा अफगाणिस्तानात काबूल इथे नोकरीच्या निमित्ताने गेला आहे. थोडी शोधाशोध केल्यावर त्यांना कळलं की आपला मुलगा सीमेपलीकडील काही पाकिस्तानी दोस्तांसोबत खास करून एका पाकिस्तानी मुलीसोबत चॅटिंग करत होता. हमीद अन्सारी आणि गीता मोहन यांनी अगदी आतल्या गोटातून आणि अधिकारवाणीने असं हे लेखन केलं आहे. वाणी प्रथेखाली जबरदस्तीने लग्न लावून दिलं जाणार होतं म्हणून एका मुलीला सोडवण्यासाठी जाणाऱ्या हमीदला दोन देशांतल्या सीमारेषा लक्षातही घ्याव्याशा वाटल्या नाहीत. त्याला कशाचीही भीती वाटली नाही, कसलीही आडकाठी त्याला झाली नाही परंतु पाकिस्तानातील त्याच्या मित्रांनीच त्याला दगाफटका केला. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्याचा निर्धार मोडून काढून त्याच्यावर गुप्तहेर असा शिक्का मारण्यासाठी जंग जंग पछाडलं. त्यानंतर पुढे काय झालं तर या उलट तपासणीच्या काळात सोसावा लागलेला छळ, एकांतवासात कोठडीत जखडून राहण्याची सजा आणि त्यातूनही तग धरून राहण्यासाठी केलेला संघर्ष. भारतात त्याची आई फौजिया अन्सारी यांनीही अथक लढा दिला. अगणित दारं त्यांनी मदतीसाठी ठोठावली आणि हमीदला परत आणण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या मदतीने भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांना गदगदा हलवून सोडलं. १८ डिसेंबर २०१८ रोजी सरतेशेवटी हमीदनं भारताच्या भूमीला स्पर्श केला. अत्यंत जिगरबाज, हृदयद्रावक आणि गतिमान अशी ही कहाणी माणुसकी, प्रेम, विश्वासघात आणि विपरित परिस्थितीतही आशा जागृत ठेवणं म्हणजे काय चीज असते, याविषयी आपल्याला खूप काही सांगून जाते.
-
Alguj(अलगूज)
हा कथासंग्रह आपल्या हाती देताना मला मनापासून आनंद होत आहे. माणूस आयुष्यात भावनांवर जगत असतो. प्रत्येकाच्या आयुष्याचा आकृतिबंध त्याला येणारे अनुभव आणि मनात उमटणाऱ्या, त्यात गुंतलेल्या भावना यांवर अवलंबून असतो. आयुष्याच्या पटलावर ह्याच भावभावनांच्या रंगाने माणूस चित्र रेखाटत राहतो. प्रेम ही सगळ्यात सुंदर भावना. उदात्त भावना. स्त्री-पुरुषांमधील प्रेमभावना ही मला नेहमीच एखाद्या काव्यासारखी वाटली आहे. ती उदात्त असते. सुंदर असते आणि त्याहीपेक्षा हळवी अलवार असते. प्रेमाने जग जिंकता येते, हे खरं असलं तरी प्रत्येकाला जग नाही जिंकता येत. अव्यक्त राहिलेले प्रेम, अपूर्ण राहिलेली स्वप्ने हा मग जीवनाचा एक हळवा भाग होऊन जातो. अतृप्तीचा आणि आठवणींचा एक झरा काळजात आयुष्यभर पाझरत राहतो. साफल्यात जगण्याचा आनंद असतो, तर अशा अपूर्णतेतही जगण्याची कविता सापडते. अशा काही कविता म्हणजेच या कथा आहेत. आयुष्याच्या प्रवासात काही नाती निसटतात आणि काही परत भेटतातही. निसटलेल्या नात्यांमुळे दोन जिवांच्या आयुष्यात पडणारे अंतर एका जन्माचे असते. ते 'जन्मांतर' असते, तर कधी भेटलेल्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या नात्यातून 'स्वप्नांचा गाव' उभा राहतो. कधी जोडीदाराची 'प्रतीक्षा' हेच फक्त आयुष्य उरतं, तर कधी पुन्हा गवसलेल्या नात्यांची 'गिफ्ट' ही मिळते. कधीकधी नाते पुन्हा नव्याने उमलायला 'उत्तररात्र' लागते. मनात वर्षानुवर्षे रंगवलेला 'संसार' कधी दोन दिवसांसाठी का होईना जगता येतो.
-
Pravas bakiya (प्रवास बाकीय )
'प्रवास बाकीय...' ही प्रियांका डहाळे या अष्टपैलू तरुणीची कादंबरी. प्रियांका डहाळे ही पेशाने पत्रकार होती. 'अनावृत्त रेषा' हा तिचा पहिला कवितासंग्रह आणि पहिलेच पुस्तक. त्यानंतर आलेले तिचे हे दुसरे आणि शेवटचे पुस्तक. कारण तिचे अपघाती निधन झाले आणि तिचा लेखनप्रवास मात्र अधुराच राहिला. अतिशय हरहुन्नरी असलेली प्रियांका डहाळे हिची शोधक-चिकित्सक-निरीक्षक वृत्ती आणि दृष्टी तिच्या या कादंबरीतूनही प्रत्ययास येते. या कादंबरीतील मुख्य नायिकाही पेशाने पत्रकारच आहे. आत्मिक आणि देहिक पातळीवरील मानवाचे स्थलांतर... नातेसंबंधातील स्थलांतर... भावभावनांच्या पातळीवरील स्थलांतर कसे घडते? त्याचे काय परिणाम घडतात? परिणामांचे भोग कसे भोगावे लागतात? याचा तिच्या पत्रकार मनाने घेतलेला शोध आपल्यालाही अंतर्मुख व्हायला भाग पाडतो.
-
Yamunatiri anande (यमुनातीरी आनंदे)
सामाजिक विषयांबरोबरच या कथासंग्रहात गूढकथा आणि विनोदी कथा हे दोन प्रकारही समाविष्ट केले आहेत. त्यामुळे हा कथासंग्रह म्हणजे सकाळी उठल्यानंतर देवासाठी फुलं वेचत असताना आपण तबकात बकुळीची सुगंधित फुलं, फारसा वास नसलेली पण नियमित फुलणारी तगर, अजिबातच सुगंध नसलेली पण आकर्षक रंगाची जास्वंद, एखादी दूर्वांची जुडी, तुळशीच्या चार मंजिऱ्या, या सगळ्या स्त्रीलिंगी फुलांच्या जोडीला तो अनंत किंवा तो चाफा अशी आरास रचतो, तसा हा कथासंग्रह विविधरंगी, विविधगंधी आहे.
-
-
Gas Chamber (गॅस चेंबर)
रत्नाकर मतकरी हे रुढार्थाने ललित लेखक असले तरी त्यांच्यामध्ये एक राजकीय निरीक्षक जागता असे. आपल्या भवतालातील गुंतागुंतींचा विचार करणं आणि तो विचार ललित कलाकृतींतून निर्भीडपणे वाचकांसमोर मांडणं ही लेखक म्हणून आपली सामाजिक बांधिलकी आहे , असं ते मानत. ‘गॅस चेंबर' मधल्या कथा वाचताना ही गोष्ट पुन्हा एकदा जाणवते.या संग्रहातील कथा अस्वस्थ वर्तमानाचं प्रतिबिंब टिपत भविष्यकाळाचं सूचन करणाऱ्या आहेत. या कथांना आजच्या काळाचा संदर्भ आहे. त्यापलीकडे या कथा एकुणात एकाधिकारशाही आणि तिच्या पकडीखाली दबल्या गेलेल्या समाजाबद्दलही बोलतात.