-
Aivaj Ek Smrutibandh (ऐवज एक स्मृतिबंध)
अमोल पालेकर यांच्या कला कारकिर्दीचा ‘ऐवज’ वाचकांच्या हाती! हे पुस्तक केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही; हे एका माणसाचं आत्मचिंतन आहे. यातून आपण जीवनातील साधेपणाचं सौंदर्य आणि स्वाभिमानाची ताकद अनुभवतो." "कलावंत म्हणून ते केवळ भूमिका साकारत नव्हते, तर समाजाला विचार करायला लावणारी कला निर्माण करत होते." सिद्ध चित्रकार, अभिनेता-दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या ऐंशीव्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐवज’ या आत्मकथनपर मराठी पुस्तकाचे प्रकाशन! यानिमित्ताने स्वत:चा वेगळा चेहरा निर्माण केलेल्या एका मनस्वी मराठी कलाकाराची नवी ओळख वाचकांना होणार असून पालेकर यांच्या कलात्मक प्रवासाला आकार देणाऱ्या अनुभवांचा तपशील वाचकांना समृद्ध करणारा ठरेल.पालेकर यांच्या आत्मकथनातून भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील काही मौल्यवान क्षणचित्रे गवसतात. व्यक्तिगत आठवणी, दुर्मीळ छायाचित्रे आणि सत्यदेव दुबे, बादल सरकार, हृषिकेश मुखर्जी, बासू चटर्जी, जयदेव वर्मा अशा नाट्य-चित्रपट जगतातील दिग्गजांना पालेकर यांनी अर्पण केलेले श्रद्धांजलीपर मनोगत समाविष्ट करण्यात आले आहे. पुस्तकामध्ये दिलेल्या ‘क्यूआर कोडमुळे पालेकर यांच्या कलाकृती बघण्याची संधी वाचकांना लाभणार आहे...!! माझा इथवरचा प्रवास न्याहाळताना, कला क्षेत्रातील परिवर्तनाचा आवाका, व्याप्ती आणि खोली लक्षात येईल. पडद्यावर दिसणाऱ्या भोळसट नायकापलीकडच्या माणसाची जडणघडण समजून घेता येईल
-
Mahabharat Te Bharat @ 2025 (महाभारत ते भारत @ २०२
'महाभारत ते भारत@ २०२५' या उल्लेखनीय पुस्तकाचा प्रवास 'इंडिया' या नावाने जगाला ओळख असलेल्या या प्राचीन, चिरंतर आणि विकसनशील राष्ट्राप्रती असलेल्या श्रद्धेने उलगडतो. लेखकाने पानोपानी असा सुंदर गोफ विणला आहे की या भूमीचा अलौकिक इतिहास, संस्कृती आणि अध्यात्म जिवंत होऊन डोळ्यासमोर उभे राहते. हे पुस्तक वाचताना तुम्हाला एका सशक्त राष्ट्राची स्पंदनेच नव्हे, तर पिढ्यानपिढ्यांचे शहाणपणही जाणवेल. लेखक माधव जोशी आमचे आभार आणि कृतज्ञतेला पात्र आहेत. महाभारत ते भारत @ २०२५ या गौरवशाली प्रवासात आपल्याला बरोबर घेऊन जाण्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल धन्यवाद. आपण भारतीय काय होतो आणि काय आहोत याबद्दल अभिमानाची भावना निर्माण केल्याबद्दल कृतज्ञता. - पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर
-
Bhintiaadacha Cheen (भिंतीआडचा चीन)
भारताशी चीन शत्रुत्वाने का वागतो? चीनकेंद्रित जगाचे धोके काय असतील? चीनच्या नाकावर टिच्चून भारत महासत्ता होईल का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी चीनचा इतिहास, कम्युनिस्ट पक्षाची अमानवी धोरणं, त्यातून चीनने घेतलेली झेप, इतिहास आणि वर्तमानाबद्दलच्या भानातून तयार झालेलं चीनचं परराष्ट्र धोरण, चीनचा भारताला असणारा धोका या सर्व अंगांनी श्रीराम कुंटे यांनी सखोल अभ्यास केला. त्यातून ‘भिंतींआडचा चीन` जन्माला आलं आहे. महासत्ता होऊ घातलेल्या चीनमधल्या साम्राज्यशाहीच्या इतिहासापासून ते आजच्या उत्तुंग प्रगतीपर्यंतचा आढावा घेत लेखकाने या पुस्तकातून चीनची कुंडली मांडली आहे. भारताच्या संदर्भात चीन समजून घ्यायचा असेल, तर चिनी राजघराण्यांचा इतिहास, स्थित्यंतराची चाळीस वर्षं, जगाला चकित करणारा काळ आणि भारतासमोरील चिनी आव्हानं या चार भागांत विभागलेलं हे पुस्तक आपल्या जवळ असायलाच हवं. चीनची ओळख करून देणाऱ्या पुस्तकाची मराठीत कमी होती. श्रीराम कुंटे यांच्या ‘भिंतींआडचा चीन`मुळे ही उणीव भरून काढण्यास मदत होईल. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय विषयांवर प्रबंधी-प्राध्यापकीपणा टाळून जनसामान्यांसाठी लिहिणारा एक नवा लेखक कुंटे यांच्या रूपाने मराठीत समोर येताना दिसतोय. गिरीश कुबेर (संपादक, दै. लोकसत्ता व लेखक) एका संतुलित राष्ट्रवादी दृष्टिकोनातून, तसेच बहुविद्याशाखीय जाणकारीतून लिहिलेले हे पुस्तक आपल्या निकटतम स्पर्धकाला समजून घेण्यासाठीच्या प्रवासातील अत्यावश्यक वाचन ठरणार आहे. रवि आमले (ज्येष्ठ पत्रकार व लेखक) महत्त्वाकांक्षी चीनशी स्पर्धा करण्यास आसुसलेल्या भारतीयांना स्वतःच्या व चीनच्या मर्मस्थळांची जाणीव हे पुस्तक कळात-नकळत करवून देते. प्रा. परिमल माया सुधाकर (चीनचे अभ्यासक व लेखक)
-
Sansar (संसार)
जर तुमच्यासमोर देव प्रगट झाले, तर तुम्ही काय कराल? एक असे ठिकाण आहे, जिथे मोबाईल फोन बंद पडतो, स्मार्टवॉच चालत नाही, आणि हातावर निळ्या रंगाचे निशाण उत्पन्न होते. आधुनिक युगातील भारतात राहणाऱ्या अमन चंद्र आणि संसारातील इतर दहा जीवांचे अपहरण करून जेव्हा त्यांना हिमालयातील गुप्त खोऱ्यात नेले जाते, तेव्हा त्यांच्या बाबतीत असेच घडते. हिंदू देवता, योगी आणि पौराणिक पशू यांचा निवास असलेल्या या दिव्य क्षेत्रामध्ये जाऊन संसारातील या जीवांनी काय करायचे, हे स्पष्टपणे ठरलेले असते. त्यांना योगाच्या साहाय्याने काही प्राचीन विद्या शिकाव्या लागतात. त्यानंतर एका जीवावरच्या यात्रेत सहभागी होऊन नेमून दिलेले काम पूर्ण करावे लागते. या भयंकर प्रवासातून म्हणे थोडीच माणसे वाचून परत येतात. पण मग त्यांनी असल्या प्रवासाला जायचेच का? आणि या सगळ्याशी देवांचा काय संबंध? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात, तोच संसारातील जीवांना कळू लागते की तिथे प्रत्यक्षात कोणतीतरी मोठी योजना आकार घेत आहे. देवांच्या राजाने एक विचित्र आज्ञा दिली आहे. आता अमनला निर्णय घेणे अधिकच कठीण जाणार आहे. त्याच्या निर्णयामुळे केवळ त्याचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे भवितव्य पालटणार आहे... “शेवटी हे भारताने हॅरी पॉटरला दिलेले उत्तर आहे.”— कृष्ण उदयशंकर, लेखक “संसाराचे कथानक आ वासायला लावणारे उत्तम मिश्रण आहे, एक अद्भुत प्रतिभा उदयाला आली आहे!” —अनुजा चंद्रमौली
-
Suswarlakshmi Subbulakshmi (सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक
ती म्हणजे साक्षात 'तुळशी वृंदावन' • जगद्गुरू चंद्रशेखरेन्द्र सरस्वती कांची मठाचे शंकराचार्य सुस्वरलक्ष्मी सुब्बुलक्ष्मी पद्मभूषण उस्ताद बडे गुलाम आली खाँसाहेब, पतियाळा घराण्याचे श्रेष्ठ गायक एम. एस. ने चित्रपटात काम केलं नाही. ती साक्षात मीरा झाली. एलीस डंगन, प्रख्यात अमेरिकन दिग्दर्शक त्यांचं गाणं ऐकल्यावर माझा हरवलेला आत्मा मला नव्याने सापडला थोर स्वातंत्र्यसेनानी गोविंद वल्लभ पंत. भारताचे गृहमंत्री (१९५५ ते १९६१) त्यांचं गाणं दैवी आहे, जे त्यांनी देशसेवेसाठी उपयोगात आणल - डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन् भारताचे माजी राष्ट्रपती I am always inspired by two women. One is my Mother and the other is 'Mother of Music'-the Great M. S. Subbulakshmi. - Dr. A. P. J. Abdul Kalam Former President Of India
-
Ram Tretayugacha Mahasangram Part 2 (राम त्रेताय
अखेर त्या महायुद्धाला प्रारंभ झाला. दुंदुभी, नगारे, झांजा, शंख आदी रणवाद्यांच्या प्रचंड घोषानं सारी लंका हादरून गेली. त्यातच उभय पक्षातून जबघोष आणि आरोळ्या उठू लागल्या. एकच कल्लोळ माजून राहिला. राम हनुमानाच्या खांद्यावर वसला; आणि त्यानं धनुष्याचा टणत्कार केला. उभय पक्षाची सेना भेदरून त्याच्याकडे पाहू लागली. रामानं भराभर वेगवान तीक्ष्ण बाण सोडायला प्रारंभ केला... केवळ चार घटकात रामानं राक्षससैन्याचा पुरता विध्वंस केला. गज, पदाती आणि अश्व यांच्या मृतदेहांचा ढीग रणभूमीवर पडला. त्यामुळे क्रुद्ध झालेल्या रुद्राची ती जणु क्रीडाभूमीच असल्यासारखं वाटू लागलं. रामाच्या संहाराखातून उरलेले राक्षससेनानीही अवयव तुटल्यामुळे युद्धाला निरुपयोगी झाले होते. वानरसेनेत मात्र आनंदी आनंद पसरला होता. सगळे वानर रामाची प्रशंसा करत होते. कडवं राखीव सैन्यदलही परास्त झाल्यानंतर युद्धात स्वतः उतरण्याखेरीज रावणाला आता गत्यंतर उरलं नव्हतं. ** वाल्मीकी रामायणात वर्णन केलेले अनेक प्रसंग आज कल्पित वाटू शकतात. परंतु रामायण हे कल्पित काव्य नसून, तो आपल्या भारताचा सहस्रो वर्षांपूर्वी घडून गेलेला देदीप्यमान इतिहास आहे. रामजन्म, ऋषींचं कार्य, इंद्राचं स्वरूप आणि कार्य, गृध्र जटायूचं वास्तविक स्वरूप, वानरांची वास्तविकता, पुष्पक विमानाचं स्वरूप, रावणाचं साम्राज्य, दक्षिण अमेरिकेपासून भारताच्या पूर्वेकडच्या देशांपर्यंत घडलेलं राजकारण, आदी गोष्टी - घटना आजच्या शोधांशी ताडून बघितल्या तर आपण पाषाण किंवा ताम्रयुगातला इतिहास वाचत नसून अत्यंत प्रगत संस्कृतीविषयक इतिहास वाचतो आहोत याचा अनुभव वाचकांना मिळेल.