-
The Hidden Hindu Part 3 (द हिडन हिंदू भाग ३ )
"देवध्वज नक्की कोण आहे, नागेंद्र की ओम? परिमल आणि एलएसडी एकमेकांवर विश्वास ठेवण्यासाठी धडपडत आहेत, तर नागेंद्र मृतातून पुनरुत्थित झाला आहे. असुरक्षित आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आहे. परशुराम आणि कृपाचार्य ओमच्या कोलमडलेल्या भूतकाळात अडकले आहेत तर वृषकपी निश्चित मृत्यूशी लढत आहेत, ज्याने आधीच मिलारेपाला संपवलं आहे. पराक्रमी अश्वत्थामाला अनभिज्ञ सोडून, इतर सर्व चिरंजिवी सर्व आघाड्यांवरून निघून गेले आहेत. उरलेले शब्द कुठे लपले आहेत? नागेंद्र त्या सर्वांना शोधून श्लोक पूर्ण करेल की अमर त्याला रोखू शकेल? काळाशी झगडत असलेल्या चिरंजिवीच्या अनपेक्षित रहस्याचा उलगडा..."
-
Pasodi(पासोडी)
मराठी मनातलं 'पासोडी' या शब्दाच्या अर्थाचं साहचर्य वैचित्र्य आणि विविधतापूर्ण, विलक्षण अशा चार शतकांपूर्वीच्या प्रसिद्ध साहित्यकृतीशी निगडित आहे. प्रतिपाद्य विषयाबद्दलची अपार आस्था प्रचलित चौकटीत मांडता येऊ न शकण्यातून निर्माण झालेली पटविस्ताराची आस यातून दिसते. दीड दशकात लिहिलं गेलेलं वैविध्य असलेलं तरीही एका व्यापक सूत्रात बांधलं जाऊ शकणारं हे लेखन आहे. आस्थेच्या अंतर्कक्षेतलं जे जे काही आहे ते प्रस्तुत पुस्तकात साहित्य या एका सूत्रात आणलेलं आहे म्हणूनही या पुस्तकाचं शीर्षक 'पासोडी' असं आहे. -गणेश विसपुते
-
Scienstoriya Katha Tantradnyanachya(सायन्स्टोरीया
बॅडेडचा शोध पत्नीवरच्या प्रेमापोटी लागला. कॉफी भारतात तस्करीद्वारे आली. पेसमेकर एका अभियंत्याची कारागिरी आहे. रेफ्रिजरेटर एका डॉक्टरनं शोधलं. या काही कपोलकल्पित कथा नाहीत तर आख्खं मानवी आयुष्य बदलवून टाकणाऱ्या शोधगाथा आहेत. अत्यंत रंजक, प्रेरक आणि उद्बोधक अश्या 'सायन्स्टोरी या'
-
Scienstoriya Katha Shodhanchya(सायन्स्टोरीया कथा श
लुई पाश्चरनं 'रेबिज'वर लस शोधली ही गोष्ट नाही.. ती त्याला नेमकी का शोधावी वाटली? त्यासाठी त्यानं काय काय केलं? कुठल्या पातळीवरचे धोके पत्करले? यापाठचं नेमकं निरिक्षण कसं गवसलं? या आणि अश्या एक ना अनेक प्रश्नांच्या शोधामागं दडलीये खरी गोष्ट.. बरं लस अशीच येत नाही.. सुई असते तेव्हा इंजेक्शन येतं आणि इंजेक्शन येतं तेव्हा कुठं लस येते.. मानवी संस्कृती ही रिले रेस प्रमाणं आहे एकानं दिलेली बॅटन पुढं सरकते तेव्हा कुठं ही शर्यत चालू रहाते.. अश्याच नानाविध बॅटन्सच्या गोष्टी रंजक, प्रेरक आणि उद्बोधक 'सायन्स्टोरी या
-
Renaissance State (रेनेसॉन्स स्टेट)
हे पुस्तक म्हणजे महाराष्ट्राच्या प्रदीर्घ आणि संघर्षमय इतिहासाचे चित्तवेधक कथन आहे. या पुस्तकात महाराष्ट्र या महान राज्याच्या 2,000 वर्षांच्या अस्तित्वातील महत्त्वाची तत्थे आणि पैलू यांची नोंद आहे. या पुस्तकात लेखक महाराष्ट्र प्रदेशाची कथा सांगत आहेत. या प्रदेशाच्या राजकारणाला, समाजाला आणि इतिहासाला कवेत घेत या कथनाचा व्यापक पट सातवाहनांपासून ते वर्तमानापर्यंत उलगडत, हे पुस्तक क्वचितच ज्ञात असणार्या कथांची नोंद करतं : बलशाली मुगलांना गुडघे टेकायला लावणारं साम्राज्य, वैवाहिक लैंगिक संबंधांमध्ये संमतीचा प्रश्न थेट राणी व्हिक्टोरियापर्यंत नेणारी एक स्त्री, काळाच्या कित्येक योजने पुढे असलेले समाजसुधारक, जीवनाच्या विभिन्न क्षेत्रांत अग्रेसर राहिलेले स्त्री-पुरुष, डाव्या-उजव्या विचारांच्या तसेच दलित अस्मितेच्या चळवळींची उत्क्रांती, गांधींचे मार्गदर्शक आणि गांधींचे मारेकरी या सर्वांसह या प्रदेशाच्या उत्तरेतील सत्ताकेंद्रांशी संघर्ष करण्याच्या प्रदीर्घ परंपरेलाही हे पुस्तक उजाळा देतं. महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या जडणघडणीचा हा असा लेखाजोखा आहे, जो इथल्या अभिमानी जनतेस पात्र आहे; मात्र जो आजवर अलिखितच राहिला होता.
-
Velecha Niyojan Kara Tanavmukta Vha (वेळेचे नियोजन
वेळेचे नियोजन करा तणावमुक्त राहा’ हे लेखिका रिटा एमेट यांचे सुंदर पुस्तक . पुढील आठ प्रकरणांतून त्यांनी दिवसेंदिवस वाढणाऱ्या तणावपूर्ण जीवनाचा अभ्यास करून, त्यावरील उपाय आणि मानवी जीवनाचा खरा आनंद व उत्कर्ष शोधला आहे. ८ प्रकरणांतून उच्च पदावर कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था-त्यांची ध्येय-धोरणे, कार्यपध्दती तसेच सामान्यांचे दैनंदिन प्रश्न, यांचा मनोविश्लेषणात्मक दृष्टीने लेखिकेने अभ्यास केला आहे.
-
The Hidden Hindu Part 2 (द हिडन हिंदू भाग २)
ओम अनोळखी ठिकाणी डोळे उघडतो, त्याच्या भूतकाळासंबंधीची उत्तरं तो अजून शोधतोय. दृष्ट प्रवृत्तींनी मृत संजीवनीचं पुस्तक हस्तगत केलंय, अशा परिस्थितीत जो सदाचारी आहे तो विजयी होईल? सद्गुणांचा विजय होईल? मृत संजीवनीत अशी कोणती गुपितं दडली आहेत, जी चुकीच्या हातात पडली तर गहजब माजेल आणि विनाश होईल? ओम कोण आहे? LSD चं आणि परिमलचं वास्तव काय आहे? बाकीचे चिरंजीव कुठे लपले आहेत? विचित्र, गूढ ठिकाणी विखुरलेले हे शब्द आहेत तरी काय आणि नागेंद्र ते का गोळा करतोय? मर्त्य मानव, देवता आणि दानव या सगळ्यांसाठी अमरत्वापेक्षाही मोठं उद्दिष्ट ज्यात दडलं आहे अशा शब्दांचा शोध ती अतूट त्रयी घेत असताना, त्यांच्यासोबतच ‘द हिडन हिंदू २` मधून तुम्ही कधीही न पाहिलेल्या प्रदेशांची उत्कंठावर्धक सफर करायला सज्ज व्हा.
-
Delivering Happiness (डिलिव्हरिंग हॅपिनेस)
डिलिव्हरिंग हॅपिनेस हे पुस्तक आपल्याला, व्यावसायिक यशासोबतच लेखकाच्या आयुष्याचा प्रेरणादायक प्रवास पोहोचवते. अतिशय लहान वयातच व्यवसायाची ओढ निर्माण झालेल्या टोनीची ही कथा आपल्याला बरंच काही शिकवून जाते. लहानपणी मिस्किल, खट्याळ, डांबरट, उद्योगी; पण ध्येयवादी असणार्या टोनीने कुमारवयातच छोट्या छोट्या उद्योगांना सुरुवात केली. मित्राच्या सहकार्यानं त्यानं सुरुवातीला `लिंक एक्स्चेंज’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी आणि त्यानंतर इंटरनेटद्वारा बूट विकणारी ‘झापोस’ नावाची त्यांनी कंपनी सुरू केली. या कंपनीला नावारूपाला आणण्यासाठी त्यानं किती संकटं झेलली; धैर्यानं, जिद्दीनं तो कशा प्रकारे उभा राहिला; कंपनीला तारणारं मार्गदर्शक तत्त्व त्याला कसं उमगलं; इथपर्यंतचा टोनीचा प्रवास हा विलक्षण आहे. केवळ सदतीस वर्षांचा असणारा हा व्यावसायिक त्याच्या जीवनकहाणीतून अनेक मूल्यं आपल्यापर्यंत पोहोचवतो.
-
The Art Of Management (द आर्ट ऑफ मॅनजमेंट)
या पुस्तकाद्वारे लेखक शिव शिवकुमार यांनी स्व-व्यवस्थापन, तुमच्या टीमचे व्यवस्थापन आणि तुमच्या उद्योगाचे व्यवस्थापन यांविषयी संपूर्ण आणि सखोल मार्गदर्शन केले आहे. शिवकुमार यांनी चक्क २१ आघाडीच्या अनुभवी ‘लीडर्स`च्या सखोल आणि सविस्तर मुलाखतींद्वारे व्यवस्थापनाचे हे तिन्ही घटक ही तुमची स्वत:चीच जबाबदारी आहे, असे सारांशरूपाने अधोरेखित केले आहे. शिवकुमार यांनी अनेकविध उद्योगांचे व टीम्सचे नेतृत्व केले आहे. त्यांच्याकडे समृद्ध अनुभवसंचित आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘स्व-व्यवस्थापन’ या विषयावरील पुस्तकात त्यांचा इतक्या वर्षांचा अनुभव आणि त्यांनी आजवर मिळवलेले ज्ञान यांतून तरुण पिढी नक्कीच शिकू शकेल. आयुष्याच्या सर्व क्षेत्रांत स्व-व्यवस्थापन करण्यासाठी माणसाने शिकत राहाणे गरजेचे असते. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणार्या ‘प्रोफेशनल्स`चे विचार, मते आणि अनुभव यांचे हे संकलन आहे; तसेच स्व-व्यवस्थापन, टीम व्यवस्थापन व बिझिनेस व्यवस्थापन या विषयांनाही स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या ‘प्रोफेशनल्स`कडून तुम्हाला शिकता यावे आणि तुमच्या लक्ष्यापर्यंत जाणारा मार्ग तुम्हालाच तयार करता यावा हा उद्देश आहे.
-
Hitler Ani Bharat (हिटलर आणि भारत)
हिटलर - जगात सर्वत्र अत्यंत तिरस्कारानं उच्च्चारल्या जाणारं नाव – भारतीय उपखंडात मात्र काही वेळा हा गैरसमज पाहायला मिळतो की फ्युहरर हा भारतीयांचा मित्र होता. पत्रकार वैभव पुरंदरेंना जाणवलं की या जर्मन हुकूमशहानं स्वत:च्या लिखाणात भारताविषयी त्याचं खरं मत बेधडकपणे मांडून ठेवलेलं असूनही या विषयी भारतीय जनमानसात घोर अज्ञान आहे. ही उणीव भरून काढण्याच्या निकडीतून त्यांना जर्मनी, भारत आणि इतर जागची अभिलेखागारं खंगाळून काढण्याची प्रेरणा मिळाली. हिटलरची भारत देश आणि इथल्या लोकांबद्दलची धारणा, ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाविषयी त्याची मतं आणि भारताचा इतिहास, संस्कृती आणि सभ्यते विषयी त्याचा अभिप्राय ह्यांचं समर्पक विश्लेषण या पुस्तकात आहे. या शिवाय हे पुस्तक नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांची तिसर्या साम्राज्याशी झालेली गुंतागुंत, नाझी जर्मनीत राहिलेल्या इतर भारतीयांचे अनुभव, हिटलरद्वारे हिमालयात ‘शुद्ध रक्ताचे आर्यन’ शोधण्यासाठी चालवली गेलेली मोहीम आणि या संदर्भातील अनेक अप्रचलीत घटनांवरदेखील प्रकाश टाकतं.