-
Nothing To Lose
होप’ आणि ‘डिस्पेअर’च्यामध्ये जी सीमारेषा होती, ती खरोखरच रस्त्याच्यामध्ये एक रेषाच होती. एका गावाचा रस्ता संपून दुसNया गावाचा जिथे सुरू होतो, तिथे ती सीमारेषा तयार झाली होती. ‘होप’ म्हणजे ‘आशा’ तर ‘डिस्पेअर’ म्हणजे ‘निराशा.’ जॅक रीचरला कोणतेही वाहन न मिळाल्यामुळे त्याला चालत जावे लागते, फक्त एक कप कॉफी साठी. पण त्याला रेस्टॉरंटमध्ये आलेल्या चौकडीमार्पÂत जाळ्यात अडकवले जाते. चूक... चूक... चूक... ते चुकीच्या माणसाला धरतात. जॅक रीचर हा त्याच्या क्षेत्रात मोठा असतो कामधंदा नसलेला, कायमस्वरूपी पत्ता नसलेला, सामानसुमान नसलेला फक्त मनस्वी जिज्ञासू. भटकेपणाचा आरोप ठेवून त्याला गावातून हद्दपार केले जाते. अशी कोणती गुपितं आहेत की जी स्थानिक प्रशासनाने दडवून ठेवली आहेत? मिलिटरीतून निवृत्त झालेला अतिशय कठोर वृत्तीचा जॅक रीचर हे नाजूक धागे पकडून अमेरिकेच्या सर्वात मोठ्या प्रतिष्ठा धुळीला मिळविणा-या धक्कादायक आणि गूढ प्रकरणाचे कारस्थान उकलण्यासाठी सज्ज होतो. कारण काहीही झालं तरी जॅक रीचरला काहीच गमवावं लागणार नव्हतं. एक रहस्यमय थरारकथा म्हणून या पुस्तकाकडे बघता बघता त्या वाटेने सुरू झालेला प्रवास देशभक्ती, कडवे धर्मवेड अशा अनेक भावनांपाशी, आग्रहांपाशी येऊन थांबतो. कोणतीही गोष्ट जेव्हा अतिरेकाकडे झुकते तेव्हा ती दुराग्रहामध्ये रूपांतरित होते. या दुराग्रहांचे, माथेफिरू धर्मवेडाचे जे दर्शन या पुस्तकात घडते ते भयचकित करणारे आहे. त्यामुळे हे पुस्तक केवळ एक रहस्यमय थरारकथा राहात नाही; तर ते मानवी प्रवृत्तींना आव्हान देत राहते.
-
Digital Fortress
एन.एस.ए. या संस्थेने एका महासंगणकाच्या साहाय्याने कोणत्याही गुप्त मजकुराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढ मजकुराचा भेद मात्र त्यांच्या महासंगणकाला करता येईना. पाच मिनिटात होणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदर गणितज्ञ स्त्री होती. तिला त्या वेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. एन.एस.ए. संस्थेला ओलीस धरले गेले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे, तर फक्त एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका राष्ट्र पांगळे होण्याची वेळ जवळ येत चालली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत पळापळ करावी लागली. तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती. शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली. शेवटी काय झाले? ते या खिळवून ठेवणार्या, श्री. अशोक पाध्ये यांनी आपल्या खास शौलीत अनुवाद केलेल्या कादंबरीत वाचा.