-
Kahani Manavpranyachi
विश्वाचा जन्म कधी झाला हे गूढ असले तरी जगभरातील शास्त्रज्ञ त्यांची उकल करीत आहे. त्याचे उत्तर हळूहळू उलगडत आहे. मानवाच्या अस्तित्वानंतर अनेक शोध लागले. त्यातून आजचे आधुनिक जग साकार झाले आहे. ज्ञान - विज्ञान, तत्वज्ञान - तंत्रज्ञान यांच्या विकासातून अनेक असाध्य गोष्टी सध्या झाल्या आहेत. यातून मानव 'सिव्हिलायझेशन' कडे वळला. म्हणजेच सभ्यता, नैतिकता मानू लागला. पण ह्या गोष्टी अहिंसेला पूरक असल्या तरी त्या स्थळ, काळ, व्यक्तीसापेक्ष असल्याने हिंसेचे मूळ यातून फुटले. विश्वाची निर्मिती, माकडापासून मानवाची अत्तापर्यत जी उत्क्रांती झाली त्याचा शोध अनेक शास्त्रज्ञ आजही घेत आहेत. हा प्रवास गूढ, रहस्यमय असून, 'नंदा खरे' यांनी 'कहाणी मानवप्राण्याची' मधून त्यांची झलक दाखवली आहे. सहा विभागात त्य आणि संपूर्ण विश्वाचा, मानवाचा इतिहास, भूगोल रंजक शब्दांत, आवश्यक तेथे छायाचित्र, नकाशे यांच्या मदतीने कथन केला आहे.
-
Raja Ravivarma
आजवर भारतीय साहित्यात चित्रकाराच्या जीवनावर कोणीही काहीही लिहिलेले नाही. मानवी जीवनाला सांस्कृतिक, भावननिक समृद्धतेकडे घेऊन जाणार्या विविध कलांचे महत्त्व महान कलाकारांनीच सिद्ध केलेले असते. जीवनात येणार्या सुख दु:ख, मान अपमानाला सामोरे जातानाही या कलावंतांची दृष्टी आणि अभिव्यक्ती कलात्मकतेचे दर्शन घडवते. भारतीय चित्रकलेला एक वेगळे वळण लावणार्या थोर चित्रकाराच्या जीवनाचे कलात्मक व भावात्मक दर्शन ही कादंबरी घडवते. काव्यमय भाषाशैली आणि नाट्यपूर्ण अभिव्यक्ती ही देसाईंची लेखन वैशिष्ट्ये. "राजा रविवर्मा’ मध्ये रणजित देसाईंमधल्या "कलावंताचे’ आणि "माणसाचे’ उत्स्फूर्तपण मधूनमधून कारंजासारखे उसळताना आढळते. माणसाला कलेची भूक का लागते ? जीवन आणि कला यांचा संबंध कोणत्या प्रकाराचा असतो ? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ वाचकाच्या मनात उठतं आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद वाचकाला मिळतो.