-
Ek Asto Builder
ही आहे, एका बिल्डरची रोमहर्षक कहाणी. ह्यामध्ये उत्तुंग इमारतींमागची यशोगाथा आहे. त्याबरोबरच खंडणी, धमक्या आणि फसवणुकीची भयकथाही आहे. जीवनावर भरभरुन प्रेम करणारा हा बिल्डर, प्रत्यक्षात एक शेतकरी आहे. शेतातली उत्पादनं एक्स्पोर्ट करणारा एक व्यापारी आहे. तो कलांचा चाहता आहे आणि एका अखंड दानयज्ञाचा यजमानही आहे. ह्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे, डॉ. सुधीर ग. निरगुडकर ! ‘मी कोणी असामान्य कर्तृत्त्वाचा माणूस आहे’ असा त्यांचा अजिबात दावा नाही. उलट त्यांचं असं म्हणणं आहे की ‘एक सामान्य माणूसही काहीतरी बरं काम करू शकतो. हे सांगण्यासाठीच हा लेखनप्रपंच.’
-
Idli Orchid Aani Me (इडली ऑर्किड आणि मी)
कामत ग्रुप'चे सर्वेसर्वा डॉ. विठ्ठल कामत यांचं हे पुस्तक उद्योजक बनण्याची प्रेरणा देतं. सर्वसाधारण खानपानवाला, ते ऑर्कीड'सारख्या पंचतारांकित हॉटेलचा मालक हा त्यांचा प्रवास या पुस्तकातून वाचक अनुभवतो. १९५० साली कामत यांच्या वडिलांनी चर्चगेट रेल्वेस्टेशनपाशी सत्कार हे हॉटेल सुरू केलं. आईनं दागिने गहाण ठेवून हे होटेल उभारायला मदत केली. याच हॉटेलनं पुढे इतिहास घडविला. 'सत्कार'पासून सुरु झालेला प्रवास दिमाखदार ठरला. 'पर्यावरणाचा तोल राखणारं सर्वोत्कृष्ट हॉटेल'चा मानही त्यांच्या हॉटेलला मिळाला. मराठी माणसाला उद्योजक होता येत नाही, ही उक्ती खोटी ठरवणारं कामत यांचं हे आत्मचरित्रपर लेखन वाचावं असेच आहे.
-
Kalpit Akalpit
विस्मय, अद्भुतता, अनाकलनीय गूढ या गोष्टींचे मानवी मनाला नेहमीच आकर्षण असते. विज्ञान यातील ब-याच गोष्टींवर सत्याचा प्रकाश टाकते. पण जसजसे विज्ञान पुढे जाते, तसतसे ते स्वत:बरोबरही काही प्रश्नही निर्माण करते. शास्त्रज्ञ त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतत जातात. आणि आपण सगळेच विज्ञान आणि विज्ञानाने निर्माण केलेल्या तंत्रज्ञानाच्या भोव-यात रमून जातो. आणि पुन्हा पुन्हा अनुत्तरित प्रश्नांच्या आणि कल्पनांच्या वलयात गुंगून जातो. ह्या कथा अशाच सहज सुचलेल्या वैज्ञानिक कल्पनांमधून साकारल्या आहेत. ह्या कथांमधील कल्पना ख-या का खोट्या यांचे मोजमाप न करता, केवळ मनोरंजन म्हणून त्या स्वीकाराव्यात आणि वाचाव्यात. त्यामधून वैज्ञानिक सिद्धांत इ. शोधण्याच्या भानगडीत पडू नये. कारण ह्या सर्व कथांमधील पात्रे, प्रसंग, विचार हे निव्वळ काल्पनिक आहेत. कथा काय किंवा कविता काय शेवटी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून असे म्हणतात ना... "जे न देखे रवी, ते देखे कवी" त्यामुळे कुणी सांगावे, की आज ज्या निव्वळ कल्पना वाटत आहेत त्या विज्ञानाच्या प्रगतीमुळे, भविष्यकाळी प्रत्यक्षातही येतील कदाचित.
-
Sadanamast
नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जाणारं श्री. जगन्नाथ कुंटे यांचं हे दुसरं अनुभवकथन. १९९९ पासून फ़क्त नर्मदा परिक्रमा करत राहिलेल्या या साधकानं ’माईच्या आज्ञेनं’ चौथी परिक्रमा केली, तिची ही कहाणी.
-
Shala
त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.