-
Destination (डेस्टिनेशन)
सचिवालयात काम करणारी दीपा सापडली आहे हाजी बिलाल नावाच्या एका क्रूर दहशतवाद्याच्या जाळ्यात...दीपाचा खोटा पासपोर्ट तयार करून तिच्यामार्फत इराकला कोकेन पाठवण्याची योजना आहे बिलालची...ते कोकेन माणसाला उत्तेजित करणारं आहे...महावीर नावाचा गुप्तहेर पोलिसांना मदत करतो दीपापर्यंत पोचण्यात...काय असते त्याची योजना?...वाचा ‘षड्यंत्र’ या कथेत... एका हवेलीत एक गुप्त खजिना आहे...त्याच्या किल्ल्या आहेत एका संग्रहालयात... तबरेज आणि खतिब या हवेलीचा मालक अल अमिन याच्या सांगण्यावरून त्या किल्ल्या चोरतात आणि अमिनच्या सुपूर्द करतात...दरम्यान, डीके नावाचा एक नामवंत उद्योजक मॉलमधील दोन मौल्यवान घड्याळं चोरतो आणि चोरी उघडकीला आल्यावर आत्महत्या करतो...अल अमिन आणि एका न्यूरो सर्जनचा डीकेंबाबत घडलेल्या घटनेशी संबंध आहे...काय आहे तो संबंध? किल्ल्यांची चोरी आणि डीकेंची आत्महत्या यातील धागेदोरे शोधत इन्स्पेक्टर धनंजय अल अमिनपर्यंत कसा पोचतो?... वाचा ‘मृगजळ’ ही कथा...दहशतवाद, गुन्हेगारांचं अंगावर शहारे आणणारं क्रौर्य आणि पोलीस, गुप्तहेरांचं असीम शौर्य अशा संघर्ष नाट्यातून रंगलेल्या थरारक कथांचा संग्रह
-
Ajun Nahi Jagi Radha (अजून नाही जागी राधा )
‘अजून नाही जागी राधा’ ही कथा अष्टवक्रा कुब्जा, राधा आणि अर्थातच श्रीकृष्ण यांचे अनोखे स्नेहबंध उलगडते. स्वच्छंदी जीवन जगणारी; पण प्रामाणिक स्त्री आदर्श पत्नी बनून नवऱ्याने न मागितलेले वचनही कसे निभावते त्याची कथा आहे ‘सावी’. साध्यासुध्या तरुणावर मनापासून एकतर्फी प्रेम करणारी सरपंचाची मुलगी मत्सरापोटी कोणत्या थराला जाते याचे चित्रण आहे ‘हवा’च तू’ या कथेत. विवाहाच्या गाठी नियोजित असतात, याचा प्रत्यय देणारी कथा आहे ‘तरीही...’ पतिनिधनानंतर महिलांची स्वार्थी मुला-मुलींकडून होणारी परवड/हेळसांड आठवणींच्या स्वरूपात शब्दबद्ध केली आहे ‘जेचं तेच्यापाशी’ कथेत. सुधारित परग्रहाने मैत्रीसाठी पृथ्वीवासीयांना दिलेल्या संदेशाची कथा आहे ‘चॉइस’. आशयपूर्णतेचा साज ल्यायलेल्या विविधरंगी कथांचा नजराणा.
-
Baichi Gosht (बाईची गोष्ट)
क्रोध, लोभ, मद, मत्सर इत्यादी षडरिपुंमधे दशांगुळं मातब्बर ठरते कामवासना! अन्य वासनांचा अंत शक्य आहे पण कामवासना मात्र अंतहीन! कामोपभोग घेणं हीच पुरुषप्राण्याची आदिम, उन्मत्त लालसा. कामवासना ही जशी सर्जनशील तशी विनाशकारीसुद्धा! कधी प्रेमरज्जू बांधते तर कधी सूडभावना चेतवते. तिची अनंत रुपं थक्क करणारी! ती स्वत:च्या अनावर प्रपातात पुरुषाला आणि क्वचित स्त्रीलासुद्धा अध:पतित करीत पशुत्वाच्या क्रूर पातळीला नेऊन ठेवते. कामवासनेच्या नानाविध रुपांना बळी पडलेल्या, कामशरणागत झालेल्या पात्रांच्या या श्रुंगारकथा समाजाला ‘सेक्स`च्या प्रदूषणाचा गंभीर विचार करायला भाग पाडतील अशाच आहेत.
-
Dharmavedha (धर्मवेध)
ल. सि. जाधव यांचे सर्व धर्मांविषयी चिंतन म्हणजे ‘धर्मवेध’ ही कादंबरी. इतिहासाचे सेवानिवृत्त प्राध्यापक चैतन्य आनंद हे कथानायक. त्यांच्या माध्यमातून हे चिंतन होताना दिसतं. वस्तुत: धर्म हा प्रेमाचा आविष्कार आहे. प्रेम हे मूलत: सर्वव्यापी असल्याने सर्व धर्मांतील प्रेमभाव लेखकास अभिप्रेत आहे. धर्माकडे, वैश्विक सत्याचे अधिष्ठान म्हणून ते पाहतात. वैचारिक मतमतांतरे असणे स्वाभाविक आहे. तथापि, सकल मानवाचे कल्याण, बंधुत्व, सामंजस्य धर्मास अपेक्षित असूनही धर्माच्या नावे छळ, कलह, लढाई कशासाठी, अशा आशयाचे आणि त्या अनुषंगाने येणारे धर्मविषयक विचार कादंबरीतून व्यक्त होत राहतात. कथानायकाचं पत्नीच्या मृत्यूनंतरचं विरक्त जीवन, त्याचं धार्मिक पर्यटन, वेगवेगळ्या मठांमध्ये केलेलं वास्तव्य, संन्यास दीक्षा घेणं, धर्माचा अभ्यास करणाऱ्या आश्रमाची स्थापना करणं आणि आश्रमप्रमुख म्हणून काम करताना तेथील कामातील चढ-उतार अनुभवणं अशा कथानकातून, घटना-प्रसंगांतून कलात्मकतेने ही धर्मचर्चा घडवून आणली आहे.
-
Aaisi Akshare (ऐसी अक्षरे)
मुलीच्या अस्तित्वासाठी सासूला ठार मारणारी महुआ आणि महुआच्या मुलीचं पालकत्व स्वीकारणारी गौरी भेटते ’प्रतिबिंब’मध्ये...तरुण मुलाच्या मृत्यूनंतर एकाकी जीवन जगणार्या अनिताच्या जीवनाला फुटलेल्या पालवीचं दर्शन घडतं ’फ्रायडे इव्हिनिंग’मध्ये...अल्झायमर या रोगाने ठाासलेल्या मीराताई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदना उलगडतात ’यात्रा’मधून...तर ’गार्बेज’ कथा प्रकाश टाकते आजच्या तरुणाईच्या संस्कारांवर...’ओळखपरेड’मध्ये मृत्युशय्येवर असलेल्या आईला परदेशातून बघायला आलेली आणि त्याही परिस्थितीत नातेवाइकांचे टोमणे सहन करावे लागणारी गीता भेटते...यांसारख्या अन्य कथांतून नियती...मानवी मन...नातेसंबंध...सामाजिक परिस्थिती यांची गुंफण करणार्या आणि स्त्रीमनाचा वेध घेणार्या वाचनीय कथांचा संठाह ’ऐसी अक्षरे.
-
George and the ship of time (जॉर्ज एण्ड द शिप ऑफ ट
अर्टेमिस अंतराळयानाच्या कचाट्यातून जॉर्ज निसटतो. त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. त्याच्या आपल्या घराकडील प्रवास सुरू होतो. पण तो जेव्हा पृथ्वीवर पोहचतो त्याचा आनंद पुन्हा झाकोळून जातो. त्याच्या घराच्या जागी निव्वळ पडीक जमीन असते. रस्त्यांवर रोबो फिरत असतात, पण ते त्याच्याशी बोलत नाहीत. पण तिथेही त्याला एका अनपेक्षित मित्राची मदत मिळते. हा मित्र कोण? आणि त्याच्या मदतीनं जॉर्ज या भयंकर जगाचं रहस्य शोधू शकेल का? साहस, उत्कंठा आणि रहस्याचा अनोखा मिलाफ असलेली जॉर्जची रंगतदार अंतराळ सफर...
-
Cast Matters (कास्ट मॅटर्स)
या स्फोटक पुस्तकात, जगातल्या अनेक खंडांमध्ये शिक्षण घेतलेले पहिल्या पिढीचे दलित अभ्यासक, जातीबाबत खोलवर रुजलेल्या धारणा आणि तिचं बहुस्तरीय स्वरूप विशद करतात. दररोज नरकयातना भोगावा लागणारा दलित आणि प्रेम व विनोदबुद्धीनं भारलेली त्याची अपूर्व बंडखोरीही यात आढळते. दलितांमधील अंतर्गत जातीभेदांपासून ते उच्चभ्रू दलितांचं वर्तन आणि त्यांच्यातील आधुनिक काळातल्या अस्पृश्यतेची विखुरलेली रूपं ब्राह्मणी सिद्धांताच्या अटळ प्रभावाखाली कार्यान्वित असतात. जोवर दलित सत्ता मिळवण्यासाठीच्या लढ्यात नेतृत्वस्थानी नसतील आणि ब्राह्मणवादाविरोधात ब्राह्मण उभे राहणार नाहीत, तोवर जातीचं अस्तित्व राहणार असल्याची मांडणी एंगडे करतात.
-
1912 Antarcticachya Shodhat (१९१२ अंटार्क्टिकाच्या
जगभरातील साहसवीरांनी दक्षिण ध्रुवीय प्रदेशात जाऊन नोंदवलेली निरीक्षणे, त्या प्रदेशातील वास्तव्यादरम्यान त्यांना आलेले अनुभव, तेथील प्रतिकूल हवामानाशी झगडताना होणारा प्राणांतिक त्रास, तिथे नेता येऊ शकणारे प्राणी (घोडे, खेचर, कुत्री), त्या प्राण्यांची उपयुक्तता, तेथील वास्तव्यात खाल्ले जाणारे अन्न (व्हेल माशांचे मांस इ.), तेथील बर्फातून मार्गक्रमण करताना वापरली जाणारी साधने, वैज्ञानिक उपकरणे (होकायंत्र, मॅग्नोमीटर इ.), पोषाख , तसेच या मोहिमांदरम्यान काही जणांना पत्करावा लागलेला मृत्यू इ. विषयीRचे उल्लेख म्हणजे ‘१९१२ अंटार्क्तिकाच्या शोधात’ हे पुस्तक. तिथे वापरल्या जाणाऱ्या साधनांमध्ये, पोषाखामध्ये, पादत्राणांमध्ये कालमानाने होत गेलेले बदलही या पुस्तकातून नोंदवले आहेत. एकूणच जगभरातील या साहसवीरांच्या मोहिमांच्या निमित्ताने या प्रदेशाविषयीचा प्रत्येक पैलू उलगडला जातो. संबंधित विषयाची छायाचित्रे, काही नकाशे, साहसवीरांची स्वहस्ताक्षरातील पत्रे, तसेच संदर्भसाधनांचाही समावेश आहे. या मोहिमांमधील थरार आणि साहसवीरांच्या अचाट इच्छाशक्तीचं दर्शन घडवणारं प्रेरणादायक पुस्तक.
-
Azadi (आझादी)
डोळ्यांत अंजन घालणाऱ्या या निबंधांमधून अरुंधती रॉय अधिकारशाही वृद्धिंगत होत असलेल्या या जगात स्वातंत्र्याचा अर्थ चाचपून पाहण्यासाठी आपल्याला उद्युक्त करतात. या निबंधांमध्ये सार्वजनिक तसेच खासगी भाषा आणि या अस्वस्थ कालखंडात फिक्शनसह इतर पर्यायी कल्पनांची नेमकी कोणती भूमिका असावी, याविषयीच्या चिंतनाचा समावेश आहे. रॉय म्हणतात, की ही जागतिक साथ म्हणजे दोन जगांच्या दरम्यान असलेले एक प्रवेशद्वार आहे. या साथीमुळे आरोग्याची आणि इतरही अपरिमित हानी झालेली असली, तरी तिने मनुष्यजातीला एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. नव्या जगाची कल्पना करण्याचे आपल्या सगळ्यांना मिळालेले हे निमंत्रण आहे.
-
Everest 1953 (एव्हरेस्ट 1953)
राणी एलिझाबेथच्या राज्याभिषेका दिवशी 2 जून 1953 रोजी एव्हरेस्टवरच्या पहिल्या चढाईची बातमी आली. गिर्यारोहणाच्या इतिहासातला हा सुवर्णक्षण. तसं पाहता ही एक सुनियोजित मोहीम होती, पण तरी अनेक अडथळ्यांनी आणि विरोधाभासानं ती अधिकाधिक खडतर होत गेली. गिर्यारोहकांच्या डायऱ्या, त्यांची पत्रं अशा असंख्य दस्तावेजातून एव्हरेस्ट चढाईची पट उलगडत जातो. या थक्क करणाऱ्या प्रवासाचा पुनर्अनुभव देत हे पुस्तक 1953च्या इतिहासाची सफर घडवतं.
-
Kulamamachya Deshat( कुलामामाच्या देशात)
कोरकु भाषेत ‘कुला’ म्हणजे वाघोबा. मेळघाटच्या जंगलातला हा कुलामामा जेवढा काळजात धडकी भरवणारा, तितकीच त्याच्याबद्दलची उत्सुकताही अधिक. रानवाटा तुडवत कुलामामाचं दर्शन घेताना इथं वनअधिकाऱ्यांनाही जद्दोजहद करावी लागते...पण त्यातूनच काही खुसखुशीत प्रसंग, पेचप्रसंग निर्माण होतात. असेच हे ‘कुलामामाच्या देशातले’ रंगतदात प्रसंग. वनाधिकारी रवींद्र वानखडे यांच्या सुरस जंगलकथा आणि जी.बी. देशमुख यांच्या खुमासदार लेखनशैलीचा हा अद्भुत मिलाफ.
-
Aajcha Divas Majha (आजचा दिवस माझा )
स्पर्धा परीक्षा म्हणेज संयम आणि प्रयत्नांचीच परीक्षा. पण जिद्द आणि मेहनतीची तयारी असल्यास यश पायाशी लोळण घेतं, याचं उदाहरण म्हणजे आयएएस विजय अमृता कुलांगे. कुलांगे यांच्या ‘आजचा दिवस माझा’ पुस्तकातून त्यांच्या याच यशाची गुरूकिल्ली आपल्या समोर येते. ग्रामीण व शहरी भागांतील विद्यार्थ्यांनी खडतर परिस्थितीतही जिद्द न सोडता संकटांवर मात करून यश कसं संपादन करायचं, याचा वस्तुपाठ म्हणजेच लेखकाचे जीवन. प्राथमिक शिक्षक ते आयएएस अधिकारी हा प्रवास अगदी थक्क करणारा. काळाच्या मुशीत तावून सुलाखून निघालेले लेखकाचे आयुष्य आपणा सर्वांपुढेच सकारात्मकतेचा, प्रसन्नतेचा व नवनवीन आव्हानांचा दीप प्रज्वलित करते. जीवनजाणिवा समृद्ध करते.
-
Sthalantar (स्थलांतर)
युरोपला स्थलांतरित होण्याचं, तिथे एक सुस्थिर जीवन जगण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन आफ्रिकेतील एरिट्रिया या देशातून बाहेर पडलेली सेमिरा... नंतर सुदान ते छादमधील अंजामेना असा झालेला प्रवास....अंजामेनात खिसशी झालेली भेट... दोघांत निर्माण झालेले शरीरसंबंध... त्यानंतर बोटीने इटलीला जात असताना लिबियाकडून बोट पकडली जाऊन दोन महिन्यांचा घडलेला असहनीय तुरुंगवास...तुरुंगवासात असताना लक्षात आलेलं गरोदरपण...तुरुंगातून सुटल्यावर परत अंजामेनाला गेली असताना खिसने फसवणूक केल्याचं कळलेलं सत्य...तिथेच निर्वासित कार्यालयाच्या निवासात राहत असताना जडलेला स्मृतिभ्रंशाचा आजार... तिची रुग्णालयात झालेली रवानगी...अशातच तिने मुलीला दिलेला जन्म...मुलीच्या जन्मानंतर काही दिवसांनी रुग्णालयातून केलेलं पलायन...निर्वासित कार्यालयाच्या अधिकारी रेमा बुस्तानी आणि तिच्या भावाने तिच्या शोधासाठी केलेले अथक प्रयत्न...नाट्यमय वळणांनी पुढे सरकत राहणारी सेमिराची सत्यकथा ‘स्थलांतर.’
-
Bhintina Jibhahi Astat (भिंतींना जिभाही असतात)
डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस अमृतराव मोहिते यांना गुन्ह्यांच्या तपासामध्ये डॉ. कौशिक यांनी केलेली मदत, या सूत्रातून साकारलेल्या कथा... ‘वाचेवीण संवादु?’ या कथेमध्ये बलात्काराच्या धक्क्याने ‘कोमा’सदृश स्थितीत गेलेली महिला... तिच्याशी ‘फंकक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ तंत्राद्वारे शब्दांविना संवाद साधून डॉ. कौशिक गुन्हेगाराला समोर आणतात... धाकट्या भावाने मोठ्या भावाचा गोळी घालून खून करून आत्महत्येचा रचलेला बनाव; पण ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम’चा आधार घेऊन डॉ. कौशिक यांनी केलेला पर्दाफाश म्हणजे ‘हातचलाखी’ ही कथा... चीफ ऑफ आर्मी स्टाफने पंतप्रधानांना पाठवलेले गोपनीय पत्र लीक होते, त्याचा आणि त्या पत्राचे डिक्टेशन घेणाऱ्या महिला सेक्रेटरीने नेसलेल्या ऑप्टीकल फायबरयुक्त धाग्याचा संबंध डॉ. कौशिक सिद्ध करतात, याची हकिकत येते ‘ए फॅब्रिकेटेड स्टोरी’ या कथेत...विविध गुन्ह्यांचा विज्ञानाच्या आधारे केलेला पर्दाफाश... विज्ञानाधारित रहस्यकथांचा उत्कंठावर्धक संग्रह
-
George And The Blue Moon (जॉर्ज एण्ड द ब्लू मून)
‘जॉर्ज अॅन्ड द ब्ल्यू मून’ या कादंबरीतील जॉर्ज व अॅनी या शाळकरी मुलांचे जीवन म्हणजे साहसी जीवनाची गाथाच! विश्वाचे अंतरंग उलगडून दाखवणारी सुंदर सफर आपण या कादंबरीतून अनुभवतो. अवकाशातील चित्तथरारक स्पंदने, अचानक समोर उभं राहणारं अनोखं विश्व आणि त्यातील खगोलशास्त्रीय, वैज्ञानिक गमती-जमती आणि विश्वाच्या अंतरंगात मुशाफिरी करणारी दोन अफलातून मुलं यांची धाडसी सफर म्हणजेच हे पुस्तक.
-
Rajacha Ghoda Aani Itar Katha (राजाचा घोडा आणि इतर
राजाचा घोडा खंतावतो, त्याच्याकडे वेगळं काही नाही म्हणून...पण घोड्याची खंत कशी दूर होते...इतर प्राणी-पक्ष्यांना बघून चिमणीला वाईट वाटतं की आपल्याला चालता येत नाही...चिमणीचं दु:ख कशामुळे दूर होतं?...जिराफाला दु:ख असतं त्याच्या उंचीचं, कोणाला शाबासकी देता येत नाही याचं...खारूताई त्याला दु:खातून कशी बाहेर काढते?...काळी आणि पांढरी कबुतरं वेगळ्या रंगामुळे एकमेकांशी फटकून वागतात...पण एका प्रसंगातून साळुंकी त्यांना एकत्र आणते...प्राणी-पक्षी यांच्या माध्यमातून स्वत:कडे काय आहे याचा शोध घ्यायला लावणाऱ्या कथा
-
Ajab Dongar Aani Itar Katha (अजब डोंगर आणि इतर कथा
एका गावात होता एक मोठा डोंगर...त्याच्यावर होत्या फळबागा, पुÂलबागा, मुलांना खेळायला ऐसपैस बागा, कारंजी आणि बरंच काही...सगळ्या गावाचं डोंगरावर भारी प्रेम...तरीही नाराज का होता हा डोंगर...कशी दूर झाली त्याची नाराजी?...एका घनदाट जंगलात होता एक हत्ती...खूप मस्तवाल होता तो...लहान लहान प्राणी-पक्ष्यांना मुद्दामहून घाबरवायचा...एकदा तर त्याने चिमणीच्या घरट्याला आणि तिच्या पिलांना धोका पोचवायचा प्रयत्न केला...कसा गेला या हत्तीचा मस्तवालपणा?...एका जंगलातील एका अस्वलाला वाटलं आपण जंगलचा राजा का होऊ नये...आपल्या तर सगळ्या अंगावर आयाळ आहे आणि सिंहापेक्षा आपण जाडजूड आहोत...त्याने गुपचूप सिंहाचं निरीक्षण सुरू केलं...त्याचं डौलदार चालणं, झाडाखाली बसणं वगैरे...इतर प्राण्यांनीही आपल्याला राजा म्हणावं, असं अस्वलाने त्यांना सांगितलं...पण त्यांनी ऐकलं नाही...मग अस्वल राजा झालं की त्याची फजिती झाली?...प्राणी-पक्षी-निसर्ग यातून पुÂलत गेलेल्या गोष्टी...जोडीला रंगीबेरंगी आणि मनाला मोहवणारी चित्रं...
-
Phule Fhulali Aani Itar Katha (फुले फुलली आणि इतर
फार फार वर्षांपूर्वी फुलंच नव्हती... पानांच्या वेगवेगळ्या रंगगंधांमुळे विविध कारणांसाठी पानंच तोडायला लागले लोक...पण मग का आणि कशी फुलली फुलं?...एकदा झाडांना कंटाळा आला सकाळी सकाळी फुलण्याचा...मधमाश्यांच्या आणि भुंग्याच्या गुणगुणण्याचा...मग काय केलं झाडांनी?...एकदा झाडांना उभं राहायचा, ऊन-पाऊस झेलायचा आला कंटाळा...मग झाडं झाली आडवी...त्यामुळे काय झालं? ...आधी सगळी पानं होती गोलमगोल...त्यामुळे काय व्हायचं?...पूर्वी फुलपाखरं होती बिनरंगाची...मग ती रंगीबेरंगी कशी झाली?... झाडं, पानं, फुलं, फुलपाखरू ...निसर्गाची सुंदर रूपं...या सुंदर रूपांच्या तितक्याच सुंदर चित्रांसह सजलेल्या गोष्टींचा संग्रह