-
Anitala Jamin Milto (अनिताला जामीन मिळतो)
कायदेमंडळे आणि सरकार म्हणजे लोकशाहीचे दोन आधारस्तंभ. पण या व्यवस्थांमधला गलथान कारभार अनेकदा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचीच पायमल्ली करतो. याचा अनुभव खुद्द माजी मंत्री असलेल्या अरुण शौरी यांनी घेतला. त्यांनी अनुभवलेल्या या मनस्तापजनक घटनेची कारणमीमांसा करत शौरी यांनी भारतीय न्यायव्यवस्थेच्या कारभारावरच या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
-
Shivputra Rajaram (शिवपुत्र राजाराम)
मराठ्यांच्या राष्ट्रजीवनातील अत्यंत कठीण अशा काळात अकरा वर्षं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती राजारामांची चरितकहाणी आहे ‘शिवपुत्र राजाराम.’ मराठी सरदार आणि मुत्सद्दी यांना एकत्र आणून बलाढ्य अशा मोगल साम्राज्याला टक्कर देण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, त्यांच्या शौर्याला, आक्रमक वृत्तीला पूर्ण स्वातंत्र्य देणाऱ्या, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत मराठी वीरांनी उभारलेल्या प्रखर स्वातंत्र्यलढ्याचं नेतृत्व करणाऱ्या राजाराम महाराजांची तेजस्वी जीवनगाथा.
-
Adnyat. (अज्ञात )
बऱ्या-वाईट अनुभवांचं आणि व्यक्तींचं व्यामिश्र चित्रण करणाऱ्या कथांचा संग्रह आहे ‘अज्ञात.’ माणसाची नियतीशरणता अधोरेखित करते ‘अज्ञात’ ही कथा... तर एका वृद्धाच्या मनातील भावकल्लोळ व्यक्त होतो ‘पत्र आलंय’ या कथेतून... शेतमजुराची व्यथा सांगते ‘मोकळं आकाश’ही कथा... तर एका कुष्ठरोग्याचं आक्रंदन टिपते ‘वास्तव’ ही कथा...एका वृद्ध आईच्या चिंतनरूपी भावना प्रकटतात ‘सावलीचा दाह’मधून. सूक्ष्म भावनांचं अस्वस्थ करणारं कथाविश्व.
-
Kaya (काया)
आयुष्याच्या उमेदीच्या काळातच मृत्युशी झुंजणारी वरेण्या...स्त्री-पुरुष संबंधांकडे धारदार नजरेने पाहणारी खैरून बीबी...आत्महत्तेच्या दोलायमान मनस्थितीत गुंतलेला विनोद... मानवी देह आणि त्यातील मनोवस्थांच्या सखोल चिंतनातून ‘काया’ कथासंग्रहातील प्रत्येक कथा आकार घेते. बलात्कारासारख्या विषयांना डॉ. प्रतिभा राय सत्र-मनाच्या उद्रेकी विचारांनी वाचा फोडतात. तर किशोरवयीन मुलांच्या मनातील घालमेल, व्यवसायानिमित्त दूरदेशी राहणाऱ्या माणसाला आपल्या जन्मभूमीविषयी वाटणारी ओढ अशा मनाला स्पर्शून जाणाऱ्या विविध भाव-भावनांचा वेधही त्या घेतात.
-
Hillary Clington (हिलरी क्लिंटन)
`हिलरी क्लिंटन` ही आहे हिलरीची संघर्षगाथा, तिच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाची. माजी राष्ट्रपती बिल क्लिंटनची पत्नी... सिनेटर पद आणि परराष्ट्र मंत्री पदासह विविध पदे भूषवलेली... विविध पुरस्कार लाभलेली... दोनदा राष्ट्रपती पदाची उमेदवार ठरलेली... मुलगी, पत्नी, आई आणि प्रसारमाध्यमांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून स्वत:ला सिद्ध करू पाहणारी एक स्त्री ही प्रत्येक भूमिका मनापासून जगणाNया हिलरीचा प्रेरणादायक जीवनप्रवास.
-
Smart Trust (स्मार्ट ट्रस्ट)
स्टीफन एम. आर. कोव्ही आणि त्यांचे जुने व्यावसायिक भागीदार ग्रेग लिंक ‘स्मार्ट ट्रस्ट’ या पुस्तकाद्वारे विश्वासाचा एक नवीन पैलू आपल्यासमोर ठेवतात, तो म्हणजे डोळस विश्वास. अशा अनेक लोकांचे, संस्थांचे दाखले ते देतात, ज्यांना या उच्च विश्वासपूर्ण नातेसंबंधातून केवळ समृद्धीच प्राप्त झाली नाही, तर त्यांना त्यातून अत्युच्च आनंद आणि ऊर्जेचाही लाभ झाला. विश्वासामुळे नेत्यांच्या, संस्थांच्या अगदी राष्ट्रांची कार्यक्षमता कशी अनेक पटींनी वाढते, याचं प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येतं.
-
Swargakanya (स्वर्गकन्या )
सनसनाटी चिनी इतिहासातील एकमेव स्त्री सम्राटाची, उ छाव्ची नाट्यमय सत्यकथा. वयाच्या १३व्या वर्षी उ छाव् सम्राटाचं अंगवस्त्र बनली. आपल्या सौंदर्य आणि हुशारीचा कौशल्यपूर्ण वापर तिने केला. कारस्थाने रचली. सम्राटाला अंकित करून प्राचीन चीनमधल्या सर्वांत मोठ्या साम्राज्याच्या सिंहासनावर कबजा मिळवला. आपल्या शत्रूंचा तिने निर्दयपणे खातमा केला. तिचा शृंगारातील तरबेजपणा, तिचे रक्तरंजित बंड ते तिने स्वतःला देव म्हणून घोषित करण्यापर्यंतचा सनसनाटी प्रवास.
-
Vyavasthapan Kala (व्यवस्थापन कला)
व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे. ‘व्यवस्थापन कला’ या पुस्तकात व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केलं आहे. चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कसं करावं, व्यवस्थापनाची तंत्रे कोणती, हेतू स्पष्ट करणं कसं महत्त्वाचं आहे, विचारवंत व भावनाप्रधान व्यवस्थापकांमधील फरक इ. व्यवस्थापनाशी संबंधित मुद्द्यांची सोदाहरण चर्चा या पुस्तकात केली आहे आणि ही उदाहरणं प्रत्यक्ष जीवनातील आहेत. कुशल व्यवस्थापनासाठी उपयुक्त असं हे पुस्तक आहे.
-
Ithe Kuni Nahi (इथे कुणी नाही )
सुलेमान-सकीनाची मुलगी भवानीचं यासीनशी लग्न ठरलंय...लग्नानंतर नाव बदलण्याला तिचा विरोध...ती दत्तक असल्याचं तिला समजतं आणि ती खNया आई-वडिलांचा शोध घेते... तिची आई असते आता एक संपन्न, प्रतिष्ठित स्त्री...तर वडील यशस्वी, प्रसिद्ध अॅडव्होकेट...जन्मदात्यांना भेटून भवानी आपल्या दत्तक माता-पित्याकडे परतते...नियतीच्या अगम्यतेची जाणीव झालेल्या भवानीचा नाव न बदलण्याचा हट्ट संपलाय...पण तोपर्यंत यासीनचं लग्न झालंय...अर्थपूर्ण कादंबरी
-
The Magic Of Thinking Success (द मॅजिक ऑफ थिंकिंग
द मॅजिक ऑफ थिंकिंग सक्सेस हे पुस्तक एका स्वप्नापासून सुरू होते. तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे, या प्रश्नापासून सुरू होणारा हा प्रवास ते साध्य करण्याच्या विविध पातळ्यांपर्यंत येऊन पोचतो. आरोग्य, संपत्ती आणि समाधान मिळवण्याच्या संगतवार पायऱ्यांचा हा खरा मार्गदर्शक आहे. जो हमखास यशप्राप्तीची खात्री देतो.
-
Bookmark (बुकमार्क)
प्रज्ञा ओक यांना भावलेल्या व्यक्तींची ओघवत्या भाषेतील व्यक्तिचित्रं म्हणजे ‘बुकमार्क’... अलौकिक स्वरांनी श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे : पं. भीमसेन जोशी... बहारदार वर्णनशैलीने वाचकांना ग्रामीण वातावरणात नेणारे : व्यंकटेश माडगूळकर... पु. ल. देशपांडे या लोकप्रिय लेखकाच्या तितक्याच बुद्धिमान, तर्ककठोर, पण अंतर्यामी भावनाशील सहचारिणी : सुनीताबाई देशपांडे... बरंच काही शिकवून जाणार्या व्यक्तिचित्रांचा संग्रह.
-
Halwai (हलवाई )
साठ वर्षांचा हलवाई जगन. गांधीजींच्या उच्च विचारांनी भारलेला. त्याच्यासाठी त्याचा मुलगा,माली म्हणजे सर्वस्व. पण माली शिक्षण सोडून अमेरिका वारी करतो आणि येताना सोबत अमेरिकन बायको घेऊन येतो. जगनच्या नैतिक-अनैतिकाच्या कल्पना आणि मालीची अतिआधुनिक विचारशैली यांच्या संघर्षातून ही नर्मविनोदी कथा आकार घेत जाते.
-
Disclosure (डिस्क्लोजर)
‘डिस्क्लोजर’ ही मायकेल क्रिश्टनची नवी कादंबरी. या कादंबरीतून त्यानं माणूस नावाच्या प्राण्याच्या अथांग भावविश्वाचा वेध घेतला आहे. ‘डिजिकॉम’ ही एक कॉम्प्युटर कंपनी... गळेकापू औद्योगिक स्पर्धेत जिवाच्या करारानं धावणारी... टॉम सँडर्स या गुणी अधिकाऱ्यायाला डावलून, या कंपनीच्या सर्वोच्च पदावर विराजमान होते सौंदर्यवती मेरेडिथ जॉन्सन... विशेष म्हणजे, हे दोघेही कधीकाळी परस्परांच्या प्रेमपाशात गुंतलेले असतात. आणि तरीही अचानक मेरेडिथ, सँडर्सनं आपला लैंगिक छळ केल्याचा आरोप ठेवते... भूत आणि वर्तमानाच्या सीमारेषा अकस्मात अलगद एकमेकींत मिसळू लागतात... या आरोपाच्या सावटातून निसटण्याचा सँडर्स आटोकाट प्रयत्न करू लागतो. आणि एक मानसनाट्य आकार घेऊ लागतं... स्त्री-पुरुष संबंधांतल्या चकव्यांमधून निर्माण होणारं आणि औद्योगिक शर्यतींमधूनही... मुखवटे गळून पडू लागतात, आधुनिक जगाची एक क्रूर बाजू उघडी पडू लागते... गतिमान काळाच्या झंझावाती प्रवाहात वेगानं बदलत चाललेल्या स्त्री-पुरुषांमधल्या नात्यांची अत्याधुनिक कहाणी... ‘डिस्क्लोजर!’
-
Patna Blues (पटणा ब्लूज )
‘पटणा ब्लूज’ एका नायकाचा प्रवास उलगडत जात देशातील सामाजिक स्थितीवर गहन भाष्य करते. कादंबरीचा नायक आरिफ IAS ची कसून तयारी करतो आहे. आई वडील, तीन बहिणी आणि एक धाकटा भाऊ झाकीर; वातावरण पाटण्याचं. घरची बेताची स्थिती आणि सर्वसामान्य कौटुंबिक आयुष्य. पण निव्वळ एक धार्मिक ओळख आरिफच्या कुटुंबापुढे संकटांची मालिका उभी करते. अशात आरिफ एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडतो आणि त्यातून तेढ वाढत जाते. सरळसाधं वाटणारं आरिफचं आयुष्य एका विवरात अडकून जातं.
-
The Hot Zone (द हॉट झोन )
सर्दीएवढ्या सहजपणे पसरणाऱ्या आणि संसर्ग झालेल्या नव्वद टक्के लोकांना खतम करणाऱ्या , डोळ्याला न दिसणाऱ्या अशा मारेकऱ्याची कल्पना करा. त्यांच्यावर कसलाही तोडगा अथवा उपचार उपलब्धच नाही. त्याचा स्पर्श म्हणजे कल्पनेतही येणार नाही, असा भीषण मृत्यू. या नवीन सूक्ष्म यमदूताचे नाव आहे एबोला विषाणू. ज्याची कल्पना करणेसुद्धा शक्य नाही, ते प्रत्यक्षात आल्यावर काय होते?.... आप्रिÂकेच्या घनदाट जंगलांमधून बाहेर पडलेल्या, माणसाने आजवर न पाहिलेल्या या सर्वात भयानक रोगजंतूमध्ये मानवाचे पृथ्वीवरचे अस्तित्वच पुसून टाकण्याची ताकद आहे.... असा हा जबरदस्त मारेकरी अमेरिकेच्या राजधानीत मोकाट सुटून मृत्यूचे तांडव सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आणि...
-
Poojaghar (पूजाघर )
ओरिसातील सर्वसाधारण समाजजीवन, ग्रामीण जीवन, राजकारणाचा समाजावर- विशेषतः कनिष्ठ वर्गावर होणारा परिणाम, मध्यमवर्गीय समाजाचे दर्शन, त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेदांमुळे उसळणाऱ्या दंगली, त्याचे खरे सूत्रधार या सर्वांचे वेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केलेले आढळते. श्री जगन्नाथाबद्दलची लोकांची असीम भक्ती, श्रद्धाही त्यांच्या कथांमध्ये आवर्जून पाहावयास मिळते. माणसांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या भेदांचे मानवी दृष्टिकोनातून विश्लेषण करू पाहणाऱ्या या साहित्याचा अंश या कथांच्या अनुवादातून मराठी साहित्यात आला आहे. साध्या भाषेतल्या या कथा घटनांबरोबर भावनाही व्यक्त करणाऱ्या आहेत.
-
Ardha Dashak (अर्धदशक)
‘अर्धदशक’ ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या जीवनावर आधारित कादंबरी आहे. स्पर्धा परीक्षांसाठी पुण्यात आलेला कादंबरीचा नायक मोहन, करमरकर मॅडमशी केलेली मैत्री त्याला गोत्यात आणते. एकूणच, मोहन आणि त्याचे मित्र पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू हे तीन अडथळे कसे पार करतात याचं वास्तव आणि उत्कंठावर्धक चित्रण करणारी ही कादंबरी आहे, जी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची मानसिकता अधोरेखित करते.
-
The Lions Game (द लायन्स गेम)
एप्रिल 1986: अमेरिकन एफ - १११ वॉरप्लेन्स लिबियात अल अजिहाय कम्पाऊंडवर बसले जेथे प्रेसिडेंट गधाफी राहत आहेत. एक 16-वर्ष जुन्या युवा, असद - ION सिंह `साठी अरबी - त्याच्या आईला, दोन भाऊ आणि रेडमधील दोन बहिणी गमावल्या. असाद स्वत: च्या कुटुंबाचा नसून केवळ त्याचे राष्ट्र, त्याचा धर्म आणि उत्कृष्ट नेता - गधाफीचा मार्ग निवडण्यासाठी निवडला आहे. डोळ्यांसाठी डोळा, एक टूथ टूथ दोन वर्षांची पत्रिका, नवीन न्यूयॉर्क सिटीमध्ये आसाड आगमन, बॉम्बिंगमध्ये भाग घेतलेल्या अमेरिकेच्या सर्व पाच जहाजे पायलट्सना मारून टाकण्याच्या उद्देशाने. जॉन कोरे - आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर प्लम आयलँड कडून - एनवायपीडीपेक्षा जास्त काळ नाही आणि अँटी-टेररिस्ट टास्क फोर्ससाठी कार्यरत आहे. तो एएसएडीच्या रेव्हेंग किलिंग्ज थांबवू शकतो. पण प्रथम तो त्याला शोधायला लागला. मास्टर स्टोअरटेलरकडून एक रोमांचक मनोरंजक वाचन.
-
Prayaschitth (प्रायश्चित्त)
सतराव्या शतकात घडणारं आणि हेस्टर प्रिन या स्त्रीच्या आयुष्याभोवती गुंफलेलं हे कथानक. आपल्या मुलाच्या बापाची ओळख पटवू न शकल्यानं हेस्टर अघोरी अपमान आणि सामूहिक हिंसेला बळी पडते. हेस्टरची भूमिका तिला काळाच्या पुढची नायिका ठरवते. अनैतिक वागण्याचं सूचक म्हणून तिला तिच्या शरीरावर एक खूण बाळगण्याची शिक्षा होते. ही खूण पुढे तिचा न बदलता येणारा भूतकाळ आणि मानहानिकारक भविष्यकाळ यांचंही प्रतीक ठरते.
-
Huckleberry Finnchi Sahasa (हकलबेरी फिनची साहसं)
अर्नेस्ट हेमिंग्वेंपासून अनेक दिग्गजांना भावलेली ही कादंबरी. आई नसलेला, दारुड्या बापापासून पळणारा उनाड पोरगा हक फिनची ही गोष्ट. हक कायम जगाचा अदमास बांधत राहतो. निसर्गाकडे निर्मळपणे बघतो, लोकांकडे बेरक्या नजरेनं पाहातो, त्या-त्या वेळचे सामाजिक पूर्वग्रह त्याच्याही मनात आहेतच, पण या सगळ्यासकट एक गुण-दोष असलेला तरुण पोरगा म्हणून तो वाचकांपुढं उभा राहतो.
-
Tom Sawyerchi Sahasa (टॉम सॉयरची साहस)
ही कादंबरी दीडेकशे वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रसिद्ध झाली. मिसिसिपी नदीकाठच्या सेंट पीटर्सबर्ग या काल्पनिक गावात राहाणाऱ्या टॉम सॉयर या खोडकर मुलाचं भावविश्व या कादंबरीत उभं राहातं.. बालपणीचा निरागसपणा आणि प्रौढ वयातलं वास्तव यांच्यातील तफावत टॉम सॉयरच्या या गोष्टीतून जाणवते. ही तफावत आपणही अनुभवलेली असतेच ना, त्यामुळं भूगोलाचं नि भाषेचं अंतर पार करून ही कादंबरी आपल्याशी संवाद साधते.
-
Pather Panchali (पथेर पांचाली)
बिभूतिभूषण बॅनर्जी यांची अभिजात कांदबरी. जवळपास शतकापूर्वीच्या बंगाली ग्रामीण जीवनाचं अनोखं चित्रण वाचकाला वेगळ्या विश्वात नेतं. दारिद्र्यग्रस्त जीवनात एका उमलत्या वयातल्या मुलाचा होत जाणारा मानसिक विकास आणि त्याचे मोहून टाकणारे चित्रण या कादंबरीची सशक्त बाजू आहे. तिचं सिनेमाच्या रूपातील माध्यमांतरही अभिजात कलाकृती म्हणून नावाजलं गेलं आहे.
-
The Ministry Of Utmost Happiness (द मिनिस्ट्री ऑफ
जुन्या दिल्लीपासून ते काश्मीरमधील पर्वतराजींपर्यंत आणि महानगराच्या विराट रूपापासून ते दूरवरच्या जंगलापर्यंत... वेगवेगळ्या आयुष्यांचे अनेकरंगी पदर उलगडून दाखवणारी ही विलक्षण कादंबरी आहे. शहरातील एका कब्रस्तानात ‘घर’वसवणारी अन्जुम आणि तिच्या परिघातील पात्रे, एका रात्री फुटपाथवर अचानक प्रकट झालेली एक बालिका, एस. तिलोत्तमा आणि तिच्यावर प्रेम करणारे तीन पुरुष... या साऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कादंबरी वाचकाला विविध भावभावनांचं उत्कट दर्शन घडवते.