-
Safari Afriketli (सफारी आफ्रिकेतली)
जंगल हे ठिकाण असे असते जिथे तुम्ही जर चुकीचे वागल्यास कोणाच्या तरी तोंडचा घास होऊ शकता! कारण या जंगलात असतात, घातक शिकारी प्राणी,चिडलेले हत्ती आणि जगातले सर्वात बेभरवशाचे प्राणी- म्हणजे,बेलगाम पर्यटक आणि अविचाराने धाडस करणारे सफारी गाईड! या सगळ्याचे चित्रण लेखकाने या पुस्तकात केले आहे. अंगावर धावून येणाऱ्या सिंहाचा लेखकाने दोन वेळा कसा सामना केला,ब्रिटीश राजघरयाण्यातून आलेल्या झिंगलेल्या अर्धनग्न पर्यटकाचा रात्रीच्या अंधारात कसा शोध घेतला,पर्यटकांनी भरलेली ल्यांडरोव्हर गाडी पाणघोडे असलेल्या जलप्रवाहाच्या घेऊन गेल्यावर कशी तारांबळ उडाली,आणि आफ्रिकेतल्या सर्वात धोकादायक प्राण्याला त्याने आपला पाळीव प्राणी कसे बनवले,असे विविध अनुभव लेखक गोष्टीरूपात सांगतो. नर्मविनोदी शैलीतले हे अनुभव वाचतान कधी भीतीने अंगावर काटा उभा राहतो,तर कधी हसून-हसून पुरेवाट होते,तर कधी डोळ्यात पाणी उभे राहते.
-
End Game (एन्ड गेम)
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीनची हजारो-लाखो कोटींची गुंतवणूक आहे. ह्या आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अक्षरशः उलथापालथ घडवू शकतो. त्यातून मग दोन महासत्तांमधील लष्करी संघर्षाला सुरुवात होईल का? ह्या दोघात युद्ध भडकले, तर संपूर्ण जगच त्या वणव्यात होरपळणार हे नक्की. चीन व अमेरिकेच्या युद्धनौका समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्याही क्षणी भडका उडेल,अशी परिस्थिती आहे. पण हा केवळ आर्थिक किंवा लष्करी संघर्ष आहे कि त्या मागे काही मुलभूत कारणे आहेत? जगाला भेडसवणाऱ्या ह्या प्रमुख समस्या सर्वव्यापी आहेत,मग प्रत्येक राष्ट्राने त्या केवळ आपल्या हिताचा विचार करून सोडवायचा प्रयत्न केला तर हितसंबंधांचा संघर्ष अटल आहे. थ्रिलरचा रोमांचकारी अनुभव देतानाच विचारप्रवृत्त करणरी कादंबरी.
-
Videshi Kanya (विदेशी कन्या)
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी इस्त्राइलमधून जहाजात बसून भारतात आलेले काही बेने इस्त्राईल हे आपले पूर्वज आहेत आणि त्याची मुले कुठपर्यंत खोलवर गेलेली आहेत,हे शोधण्याचा तिचा ध्यास असतो. या ध्यासापोटी ती आपल्या आजीला याचा शोध घेण्याचे आश्वासन देते ते पूर्ण करण्यासाठी ती प्रथम भारतात येते. तिने ज्यू धर्माच्या लोकांविषयी जे काहीं आजवर ऐकलेले होते, त्याहीपेक्षा ते अधिक वेगळे असल्याचा तिला शोध लागतो. निरनिराळ्या धर्म संस्कृतींचा मिलाफ असलेला एक समान धागा तिला सापडतो आणि हा धागा पकडून ती आपल्या पूर्वजांबद्दल माहिती मिळऊ लागते. त्यातच आपला धर्म नेमका कोणता? आजीचा (ज्यू),आईचा (मुस्लिम) कि वडिलांचा (खिश्चन) अशा विचारचक्रात ती अडकते...
-
To Ek Pakistani (तो एक पाकिस्तानी)
आंतरराष्ट्रीय पातळीवर संभ्रमावस्था निर्माण करणारी एक सत्यकथा! या ग्रहावरील सर्वात धोकादायक अशा उद्दाम आणि युद्धखोर देशांमध्ये अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा फैलाव करण्यासाठी केवळ एक माणूस कसा वागतो, कोणत्या ठरला जाऊ शकतो; ताबाबत धोक्याची सूचना देणारे तसेच सर्वकाही ज्ञात असूनही अमेरिकेच्या सरकारने हे सर्व होऊ कसे दिले, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक.
-
Mi Eric (मी एरिक)
मेंदू शेंगदाण्याच्या आकाराचा असूनही मी पटपट शिकणारा आहे, असे आठवड्याच्या शेवटी जाहीर करण्यात आले, परंतु खरच जर का माझ्या 'शेंगदाण्याच्या आकाराच्या' मेंदूत ते डोकावून पाहू शकले असते, तर त्यांना हे कळले असते की, मी त्यांच्या मताप्रमाणे वागतोय; ते मी त्यांची आज्ञा पाळावी या जाणीवेने नव्हे ; तर माझ्या सोईसाठी मला ते करावेसे वाटते म्हणून! …विचार करणे, आठवून गोष्टी करणे,हृदयाला जाणवणे आणि प्रेम करणे... यासाठी देवाने आम्हाला मेंदू दिला आहे. भले,तो मेंदू दुसर्यांच्या मेंदूपेक्षा थोडा लहान आहे! …त्यमुले 'निव्वळ कुत्रा'असे म्हणण्यामागे लोकांना काय अभिप्रेत असते?
-
Sad Uttungachi (साद उत्तुंगाची)
जीवावर उदार होऊन गिर्यारोहणाचा आनंद स्वतः लुटणाऱ्या आणि इतरांना त्या आनंदाची ओळख करून देणाऱ्या एका साहसप्रिय कलंदराच्या जीवनाचं हृदयस्पर्शी चित्रण! साहस, महत्वाकांक्षा आणि जबरदस्त सहनशक्ती यांचं मूर्तीमंत प्रतिक असलेल्या स्कॉट फिशरच्या जीवनाचा आलेख वाचता- वाचता आपण त्याच्या समवेत जगभरातील विविध उत्तुंग, दुर्गम शिखरांवर फेरफटका करून येतो. आणि अंगावर काटा आणणाऱ्या थरारक अनुभवात आपणसुद्धा समरसून जगतो. आयुष्यभर ज्या एव्हरेस्ट पर्वताचा त्याला ध्यास लागलेला होता,त्याच पर्वताच्या कुशीत विसावून अखेरचा श्वास घेणारा स्कॉट फिशर आपल्या हृदयाचा ठाव घेतो!
-
The Partner (द पार्टनर)
चार वर्षांपूर्वी त्याचं नाव होतं पॅट्रिक एस. लॅनिगन. फेब्रुवारी,१९९२ मध्ये एका कार अपघातात त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर मिसिसिपी इथल्या बिलॉक्सी इथे त्याची कबरही बांधण्यात आली. तो एका लॉ फर्ममध्ये म्हणजे कायदेविषयक काम करणारया कंपनीत 'पार्टनर' होता. त्याच्या बाबतीत सगळं काही चांगलं होतं - सुंदर पत्नी,गोड मुलगी आणि उज्वल भविष्यकाळ! त्याच्या मृत्युनंतर,सहा आठवड्यांनी एकाएकी त्या कंपनीतून ९० दशलक्ष डॉलर्स एव्हडी प्रचंड मोठी रक्कम गायब होते! आणि मग त्याच्या इतर पार्टनर्सना लक्षात येतं - हो, अजूनही तो जिवंत आहे!
-
Majhi Jivanyatra Swapne Sakartana... (माझी जीवनयात
देशातील नामवंत शास्त्रज्ञ व ज्येष्ठ विचारवंत डॉ. कलाम यांच्या जीवनयात्रेतील स्फूर्तीदायी आठवणी... रामेश्वरमच्या सागरतीरावरील अल्लडवयीन मुलगा ते भारताच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणारा बुद्धिमान शास्त्रज्ञ व थोर विचारवंत... या दरम्यानची डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जीवनयात्रा म्हणजे दृढ निश्चय,धाडस,चिकाटी आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास यांचा विलक्षण मिलाफ आहे. या जीवन यात्रेदरम्यांच्या आठवणी,भेटलेली माणसं. ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकातून वाचकांसमोर उलगडले आहेत. त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती,त्यांचे जिवलग, मार्गदर्शक,गुरु या सगळ्यांबद्द्ल त्यांनी अतिशय प्रेमानं व आपुलकीनं लिहिलं आहे. आयुष्यात या स्थानावर पोहोचताना त्यांनी केलेला त्याग,संघर्ष आणि जिद्द यांच्या वाटचालीची कहाणी वाचताना वाचक भारावून जातो. ही विलक्षण जीवनयात्रा मार्गदर्शक,स्फूर्तीदायी आणि प्रेरक आहे.
-
Jamilchya Sahaskatha (जमिलच्या साहसकथा)
जमिल राहत असलेल्या तातासी प्रदेशात दोन महत्वाच्या, पण दु:खद घटना घडतात आणि सगळ्या गोष्टी बदलूनच जातात! मोठ्ठा भूकंप होऊन ज्वालामुखीचा उद्रेक होतो. त्यामुळे मुख्य भूभागापासून तातासी तुटून वेगळं होतं आणि त्याचं रुपांतर एका बेटामध्ये होतं. त्यानंतर लगेचच, समुद्रात एक राक्षस असल्याचं लक्षात येतं आणि तो बेटवासीयांना त्रास देऊ लागतो, त्यांची अडवणूक करून ठेवतो. जमिल आणि त्याच्या प्रत्येक मित्राचं एकच स्वप्न असतं - एके दिवशी या राक्षसाला चांगलाच धडा शिकवायचा आणि सगळ्या बेटवासीयांना भीती आणि असुरक्षितता यांपासून मुक्त करायचं. जमिलचं आणखीही एक स्वप्न असतं - हरवलेली किल्ली शोधण्याचं! कारण या किल्लीमुळेच भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून तातासी बेटवासियांचा बचाव ह्पोणार असतो. साहसी योजना आखून समुद्रराक्षसाला तर जमिल हरवतो, पण त्याचं पुढचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. त्यासाठी त्याला वाळवंट पार करावं लागतं, सामुद्रीचाच्यांना तोंड द्यावं आणि भयंकर चीमेरांशीही सामना करावा लागतो........ हि कथा आहे एका मुलाची,त्याच्या स्वप्नांची आणि त्यासाठी त्याने केलेल्या दिव्य साहसांची...
-
Jurassic Park (ज्युरॅसिक पार्क)
ज्युरासिक पार्क’ ही कादंबरी लिहिताना मी अनेक मान्यवर पुराजीवशास्त्रज्ञांच्या संशोधनाचा आधार घेतला आहे. त्यापैकी रॉबर्ट बाक्कर, जॉन हॉर्नरा, जॉन ऑस्ट्रॉम आणि ग्रेगरी ह्यांचा विशेष उल्लेख करायला हवा. ह्या शिवाय मी, केनेथ कारपेंटर, मार्गारेट कोलबर्ट, स्टीफन आणि सिल्व्हिया झेर्कास, जॉन गुर्चे, मार्क हालेट, डग्लस हेंडरसन आणि विल्यम स्टाउट अशा नव्या दमाच्या चित्रकारांच्या चित्रांचाही उपयोग केला आहे. डायनोसॉर कसे दिसत-वागत असावेत ह्याची कल्पना येण्यासाठी ह्या लोकांच्या चित्रांचा उपयोग झाला. नामशेष झालेल्या प्राण्यांच्या डीएनए अवशेषांबद्दलची कल्पना प्रथम चार्लस पेलेग्रिनो ह्यांनी मांडली. त्यांनी जॉर्ज ओ. पॉर्हनर, ज्युनिअर आणि रॉबर्ट हेस ह्यांच्या संशोधनाचा उपयोग केला होता. ह्या दोघा शास्त्रज्ञांनी बर्कलेमधे प्राचीन डीएनए रेणूंच्या अभ्यासासाठी एका गटाची स्थापना केली होती. केऑस सिद्धांताबद्दलची चर्चा ही इव्हर एकलॅन्ड आणि जेम्स ग्लिक ह्यांच्या अभ्यासावर आधारित आहे. संगणकाच्या आज्ञावली आणि त्यांच्यावरचं ग्राफिक्स हे बॉब ग्रॉस ह्याच्याकडून मिळालं आहे. तर आता ह्यात नसलेल्या हेन्झ पागेल्स् ह्यांच्यावरून मी माझा हदान माल्कम उभा केला आहे. ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे. त्यात व्यक्त केलेले सर्व विचार आणि मते माझी आहेत. त्याचप्रमाणे पुस्तकामधे मूळ माहितीबद्दल काही चुका असतील त्याला मी जबाबदार आहे. लक्षावधी वर्षापूर्वी पृथ्वीवर महाकाय आकाराचे प्राणी राज्य करत होते. जमीन, आकाश आणि पाणी, सर्वत्र अतिप्रचंड डायनोसॉरनी प्रभुत्व गाजवलं होतं. सुमारे चौदा कोटी वर्षे पृथ्वीवर अधिराज्य गाजवल्यावर अंदाजे साडेसहा कोटी वर्षापूर्वी त्यांचा विनाश झाला. सजीवांच्या जीवाश्मांमधून त्यांचे डी.एन.ए. रेणू मिळवण्याचे आणि क्लोनिंग करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले. मध्य अमेरिकेच्या किनार्याजवळच्या एका अगदी आडबाजूच्या बेटावर जैवअभियंत्यांनी मानवाचे सर्वात थरारक स्वप्न साकार केले. पण...... प्रत्येक थरारक स्वप्नपूर्तीला एका काळी बाजूसुद्धा असते...