-
Katha Tyanchya Vaktrutvachi (कथा त्यांच्या वक्तृत्
अत्रे, पु.ल., पुरंदरे, भोसले आणि शेवाळकर हे मराठी वक्तृत्वाचे मानदंड! ही सारी वक्तृत्वशिखरेच; पण एक शिखर दुसऱ्यासारखे नाही – हे या शिखरांचे वैशिष्ट्य. प्रत्येकाची वक्तृत्वशैली निराळी, विचारप्रतिपादनाची रीत निराळी, आपल्या शब्दश्रीमंतीतून माय मराठीला ऐश्वर्य प्रदान करण्याचा बाज निराळा आणि हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याचा वशीकरण मंत्रही वेगळाच. या वाणीच्या उपासकांनी वाग्देवतेच्या गाभाऱ्यात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले. रसिक अन् चोखंदळ श्रोत्यांनीही आपल्या हृदयसिंहासनावर त्यांना दिले अढळपद. या पाच वक्तृत्वशिखरांचे विहंगम दर्शन
-
Roby Disilvha Eka Manasvi Kalakaracha Pravas (रॉबी
अग्रगण्य युरोपियन डिझायनर्सच्या बरोबरीनं काम केलेला, मिलान (इटली)च्या स्टुडिओ बोजेरीनं आणि लंडनच्या जे. वॉल्टर थॉम्पसन जाहिरात कंपनीनं सन्मानानं बोलावून घेतलेला पहिला आणि एकमेव भारतीय डिझायनर. इंग्लंडच्या राजघराण्याकडून F.C.S.D. पदवीनं सन्मानित झालेला एकमेव आशियाई. यानं भारतात पॅकेजिंग डिझाइन प्रथम आणलं. इंडस्ट्रिअल डिझाइनची सुरुवात केली. ग्राफिक डिझाइनला भारतीय चेहरा देण्याचा ध्यास घेतला. कला-विद्यापीठ उभं करण्याचं स्वप्न पाहिलं… 1960चं दशक सरताना रॉबी डिसिल्वा भारतात परतले, तेव्हा ते इथल्या डिझाइन क्षेत्राच्या वीस-पंचवीस वर्षं पुढेच होते.