-
Teenage Dot Com 2 (टीनएज डॉट कॉम २)
मी अशी का वागते हल्ली?' ‘माझ्या दिसण्यात एकदम हे बदल का होताहेत?' ‘आजकाल आई-बाबा सारखी कुरकुर का करतात माझ्याबद्दल?' ‘माझी एवढी जवळची मैत्रीण - आता एकदम परक्यासारखी का वागतीये?' प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! कोणाला विचारायची अशा प्रश्नांची उत्तरं? प्रश्न विचारायला पण कसंतरीच वाटतं. मग त्याबद्दलची तपशीलवार चर्चा तर दूरच! ‘टीन एज'मध्ये प्रवेश करणाऱ्या सगळ्याच मुलामुलींना सतावणाऱ्या समस्या अन् प्रश्न. त्यांना समजूतदारपणे सामोरे जाऊन त्यांचं शास्त्रीय पद्धतीनं निराकरण करणारं - केवळ मुलामुलींनाच नव्हे तर पालक अन् शिक्षकांनाही उपयुक्त ठरणारं पुस्तक. या क्षेत्रात नावाजलेल्या तज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलामुलींना आपलंसं करून सांगितलेल्या या गोष्टी म्हणजे सल्लामसलत नाही, तर या आहेत किशोर मित्रमैत्रिणींशी मारलेल्या दिलखुलास गप्पा! टीनएज डॉट कॉम # 2
-
A-Joon Tendulkar (अ जून तेंडुलकर)
समग्र मराठी साहित्य-परंपरेमध्येच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरदेखील विजय तेंडुलकर यांचे स्थान ‘लेखक’ म्हणून अढळ व अनन्यसाधारण आहे. नाटक, कथा, कादंबरी, एकांकिका, ललितगद्य व पटकथा – संवाद अशा सर्व लिखित व दृक् – श्राव्य माध्यमांवर तेंडुलकरांनी आपल्या अम्लान प्रतिभेची लखलखीत मुद्रा उमटवली. समकालीनता व सार्वकालीनता समर्थपणे अभिव्यक्त करणाऱ्या तेंडुलकरांच्या साहित्याचे अर्थनिर्णयन व पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न एकूण सोळा लेखकांनी अंत:स्फूर्तता आणि वैचारिकता यांचा मेळ घालत येथे केला आहे. कारण कटू सत्याचे प्रयोग करणारे ‘तें’ तथा तेंडुलकर अ-जून, आजही प्रस्तुत ठरतात.