-
Coronachya Krushnachhaye (करोनाच्या कृष्णछायेत)
कोरोनाचा विषाणू बघता बघताएका देशाच्या सीमा ओलांडून बाहेर पडला.सगळ्या जगावर हे सावट पसरलं.कोरोनामुळे बळी पडलेल्या मृतांची संख्या भीतीदायक होती.बुद्धिमान मानवजातीसमोर या विषाणूनं हे भयंकर आव्हान उभं केलं.हा विषाणू कुठून आला, कसा पसरला,जगभरात अनेक देश त्याचा सामना कसा करत आहेत,भारत त्याच्याशी कसा लढा देत आहे –अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा वेध घेणारंआणि त्याबरोबरच – कोरोनानंतरची बदलणारी भू-राजकीय समीकरणं,औषध-संशोधन आणि निर्मितीच्या क्षेत्रातली व्यापक होणारी आव्हानंयाचाही लेखा-जोखा मांडणारं पुस्तक!भविष्यात अशा किती लढायांना माणसाला सामोरं जावं लागू शकेल,कुणास ठाऊक? त्यामुळे या विषयाची सामान्य माणसालासोप्या भाषेत ओळख करून देणं हीच आजची सर्वात मोठी गरज!औषधनिर्मितीच्या क्षेत्रांत जवळपास दोन दशकं कार्यरत असणाऱ्याअभ्यासक डॉ. मृदुला बेळे यांनी सांगितलेलीधोकादायक विषाणू आणि चिवट मनुष्यजातीच्या संघर्षाची कहाणीकोरोनाच्या कृष्णछायेत….
-
Inshaallah (इन्शाअल्लाह)
दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. पैशाचा अभाव, शिक्षणाचा अभाव! अज्ञान, अस्वच्छता, व्यसनाधीनता यांनी ग्रस्त जीवन.एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली.वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली.जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता.कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? का? का? का?त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करत पुढे पुढे जाणारी कादंबरी. इन्शाअल्लाह.
-
Nipun Shodh (निपुण शोध)
‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हे डार्विननं सांगितलेलं तत्त्व ‘कॉर्पोरेट विश्वा’लाही लागू पडतं. कोट्यवधी रुपये – डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच! कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो. एखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते. त्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण ‘टीम’ त्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो. ‘वर्क फ्रॉम होम’च्या नव्या जमान्यात एखादा बनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो. अशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते. अशी नानाविध कामं करणारा जादूगार : ‘हेडहंटर’! गिरीश टिळक या निष्णात ‘हेडहंटर’चे देशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे वास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत की, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात!
-
Raktagulab (रक्तगुलाब)
फुलाफळांनी बहरलेलं रम्य काश्मीर. पण तेथे धार्मिक, आर्थिक, शासकीय, राजकीय गुंतागुंतीचं जाळं. या पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही काश्मिरी पंडितांच्या कुटुंबाची कहाणी – ही पितापुत्रांची, जिवलग मित्रांची, उत्कट प्रीतीचीही कहाणी – संपादक अभय प्रताप जिवाच्या भीतीने अनंतनागमधून कुटुंबासह बाहेर पडतात. जम्मूत बेघर पंडितांसाठी उभारलेल्या तंबूंच्या छावणीत हे कुटुंब दाखल होतं… पुढे काय घडतं?
-
Tumhi Bi Ghada Na (तुम्ही भी घडा ना)
‘‘शहरे ही माणसाची सर्वोत्तम निर्मिती आहे’’. शहरेच माणसाच्या सर्जनशीलतेला ऊर्जा पुरवतात, माणसातील कल्पकतेला आणि उद्योजकतेला खतपाणी घालतात, त्याच्या सहनशीलतेला आणि लवचीकतेला धार चढवतात. लोकशाहीचा पाया शहरांनी घातला आणि तीच लोकशाहीला बळकट करतात. म्हणूनच शासनकर्त्यांनी आपली शहरे रावांपासून रंकांपर्यंत सर्वांसाठी स्वागतशील बनवायची असतात. आपले हे विचार प्रत्यक्षात आणण्याचा मूलमंत्र जगाला देणाऱ्या अंतोनी व्हिवस या राजकारण्याचे अनुभवकथन …
-
Bhagirathache Varas ( भगीरथाचे वारस )
' पाणी पंचायती' चे प्रवर्तक विलासराव साळुंखे यांचं चरित्र.
-
Jagana Premacha An Maranahi ! (जगणं प्रेमाचं अन मर
प्रकृतीची काही तक्रार नाही. ना कसली प्रापंचिक वा मानसिक चिंता. आर्थिक अन् सामाजिक दृष्ट्याही उत्तम स्थैर्य. अशा आपल्या समृद्ध, सार्थक जीवनावर स्वेच्छेने मरणशिळा ठेवून मृत्यूचा स्वीकार करणाऱ्या – ‘मरण म्हणजे जीवनाचा नैसर्गिक शेवट आहे’ याची जाणीव ठेवून त्याच्याकडे धीटपणे वाटचाल करणाऱ्या – मुलखावेगळया स्त्री-पुरुषांची सत्यकहाणी. विलक्षण बाब म्हणजे हे सारे एकाच ‘कुलकर्णी’ कुटुंबाचे सदस्य होते !
-
Mantra Guntavanukicha (मंत्र गुंतवणुकीचा)
अर्थनियोजनापासून आर्थिक उद्दिष्टांपर्यंत वाटचाल करण्याचे बहुविध मार्ग असतात. पैशाची गुंतवणूक आणि त्यासाठीचे विविध पर्याय म्हणजे अशा मार्गांवरची वाटचाल. कोणता पर्याय निवडावा? पीपीएफ? शेअर्स? म्युच्युअल फंड? सोने? स्थावर मालमत्ता? पेन्शन स्कीम? कोणताही पर्याय निवडायचा; तर संशोधन, अभ्यास आणि अनुभव म्हणजे यशस्वी गुतंवणुकीचा पाया. वस्तूचे योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, इतरांना न दिसलेली गोष्ट हेरणे आणि यथायोग्य विश्लेषण हे यशस्वी गुंतवणू्कदारासाठी आवश्यक गुण. या गुणांच्या आधारे यशस्वी गुंतवणुकीची पायाभरणी कशी करावी, हे सर्वांना उलगडून दाखवणारा || मंत्र गुंतवणुकीचा ||
-
Steve Aani Mee (स्टीव्ह आणि मी)
मगरीचं नाव काढलं, तरी सामान्य माणसाला भयाचा काटा फुटतो! तिचा अजस्र जबडा अन् कराल दात, तिचा बलाढ्य देह अन् विक्राळ शेपटी आणि तिच्याशी निगडित अशा किती तरी कथा-दंतकथा. मगरमिठी म्हणजे जणू मरणमिठीच! अशा मरणमिठीत आपणहून शिरणारा – केवळ मगरीशीच नव्हे, तर साऱ्याच प्राणीजगताशी मैत्र जुळवणारा – स्टीव्ह इरविन आणि आपल्या या जगावेगळ्या प्राणसख्याला त्याच्या या सगळ्या साहसी आयुष्यात सर्वस्वी साथ करणारी टेरी इरविन यांच्या सहजीवनाची विलक्षण सत्यकहाणी
-
Ya Saam Ha (या सम हा)
मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा… थोरला बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ.
-
Faiz Ahmed Faiz Ek Pyasa Shayar ( फैज अहमद फैज एक
फैज अहमद फैज. एक सुप्रसिद्ध उर्दू शायर. मूळचे लाहोरचे.फाळणीनंतर त्यांनी भारतात राहावं म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनीसुद्धा प्रयत्न केला, पण ते तिकडेच गेले. आणि अपेक्षाभंगाचं दु:ख आपल्या गझलांमधून व्यक्त करीत राहिले.तसे फैज होते मार्क्सवादी, डाव्या विचारसरणीचे. रशियाचे समर्थक. ‘लेनिन’ पारितोषिकाचे पहिले मानकरी. आणि तरीही ‘पाकिस्तानी’ साहित्यविश्वात रमणारे. त्यांचं हे चरित्र. फैज यांच्या गाजलेल्या गजला, त्यांची पत्रकारिता, त्यांची तुरुंगवारी, त्यांची प्रेमप्रकरणं, त्यांच्या आयुष्यातीले असंख्य चढउतार...फैज आणि त्या सर्वांपेक्षाही वरचढ ठरलेली त्यांची अर्धीमुर्धी स्वप्नं... जगावेगळं तेजोवलय लाभलेल्या एका कवीचं रसीलं चरित्र.
-
Samagra Jayant Naralikar (समंग्र जयंत नारळीकर)
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या प्रतिभाविलासातून फुललेल्या पाच विज्ञान कादंबर्या ! विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ भक्कम पायावर उभ्या असलेल्या – प्रागैतिहासिक काळापासून भविष्यातील सहस्रकापर्यंतच्या कल्पक कथासूत्रांमध्ये गुंफलेल्या – विश्वनिर्मितीपासून सर्वसंहारक अणुयुद्धापर्यंत अनेक रहस्यमय घटनांमध्ये गुरफटलेल्या – वरवर चकव्यासारख्या वाटणार्या, पण तर्कशुद्ध विचारांचा चकित करणारा वेध घेणार्या – या पाच कादंबर्या वाचकाला जणू कालयंत्रातून भूत-भविष्य-वर्तमानाची सफर घडवतात, भविष्यातील सावध हाका ऐकवतात अन् वर्तमानाबद्दल सजग, सुजाण अन् विचारी बनवतात !
-
Daulatbanki Aani Tyacha Khajina (दौलतबंकी आणि त्या
विराज अन् त्याचे खट्याळ सवंगडी – या साऱ्यांना भेटतो दौलतबंकी. हा आहे शिवाजीराजांच्या काळाशी एकरूप झालेला अवलिया. विराजला अन् त्याच्या मित्रांना अनेक कोडी पडतात या दौलतबंकीबद्दल. हा नेमका कोण ? तो नेहमी जंगलात का राहतो ? तो राखण करतोय तो खजिना कसला ? दौलतबंकीबरोबर ते निघतात एका अद्भुत मोहिमेवर. काय घडलं या मोहिमेत ? दौलतबंकीचा गनिमी कावा आजही कामी आला का ? दौलतबंकीचा खजिना कुठे दडलेला होता ? विराज अन् त्याच्या दोस्तांना तो मिळाला का ? अनेक रहस्यांचा उलगडा करणारी सतत उत्कंठा वाढवणारी साहसकथा !
-
Lagna Jamavnya Adhi...(लग्न जमवण्याआधी...)
लग्न कशासाठी ? भावनांचं व्यवस्थापन… डेटिंग…. लिव्ह इन रिलेशनशिप… गृहव्यवस्थापन… व्यक्तिमत्व चाचणी आणि विवाह… मुलामुलींच्या लग्नाविषयी पालकांची भूमिका.. नात्यांचं व्यवस्थापन… लग्न करण्याआधी पत्रिका बघावी का? विवाहपूर्व समुपदेशन.. काळाची गरज… लग्न करण्यामागच्या कारणांपासून ते जोडीदार निवडीच्या निकषांपर्यंत, लग्न सोहळ्याच्या स्वरूपापासून ते स्वत:च्या आंतरिक ओळखीपर्यंत अनेक गोष्टींची तपासणी करण्यास प्रवृत्त करणारे पुस्तक – लग्न जमवण्याआधी…