-
Close Encounters (क्लोज एनकाउंटर्स)
क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये दिसणारा कामाठीपुरा हा सत्तर आणि ऐंशीच्या दशकातला आहे. यातल्या चोवीस भागांतून पुरुषोत्तम बेर्डे आपलं बालपण, पौगंड आणि तारुण्य यांच्या साक्षीने अनेक माणसांच्या आयुष्यांच्या आत डोकावतो. मराठी साहित्यातली व्यक्तिचित्रांची दोन तालेवार पुस्तकं मला चटकन आठवतात. एक अर्थातच पुलंचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ आणि दुसरं जयवंत दळवींचं ‘सारे प्रवासी घडीचे’. दोन्ही पुस्तकांची साहित्यिक गुणवत्ता मोठी आहे. ‘क्लोज एनकाउंटर्स’ मध्ये या दोन्ही पुस्तकांपेक्षा एक गोष्ट अधिक आहे. ती म्हणजे भौगोलिक सलगता. कामाठीपुऱ्याच्या सोळा गल्ल्या. त्यातली अखंड चालणारी राडेबाजी. सिनेमा आणि गल्ली क्रिकेट. पुरुषोत्तमने स्वत: मोकळं होण्याची जी प्रक्रिया अनुभवली त्याचं फलस्वरूप म्हणजे हे पुस्तक. जयंत पवार
-
Nicobarchi Navlai (निकोबारची नवलाई)
निकोबार ! समुद्राच्या निळाईत उठून दिसणारी पाचूची बेटं. जणू भारतमातेची उजवी ‘कर्णफुलं’ ! सोनेरी वाळूच्या किनाऱ्यांनी सजलेली… कल्पवृक्षांच्या विपुल वनराईने नटलेली… या बेटांवरच्या अपरिचित आदिम जमाती अन् त्यांच्या अनोख्या चालीरीती…. त्सुनामीने सर्वांत जास्त घायाळ केले ते निकोबारला, तरीही पुन्हा त्यावर उमेदीने वसवलेली वस्ती…. अशा या अस्पर्शित, काहीशा ज्ञात, खूपशा अज्ञात भूमीचा इतिहास, भूगोल आणि लोकसंस्कृती उलगडून दाखवणारे
-
Kidneyvishayi Bolu Kahi (किडनीविषयी बोलू काही)
माणसाच्या शरीरातला ‘किडनी’ हा एक महत्त्वाचा अवयव. दैनंदिन चयापचयापासून अनेक शारीरिक क्रियांमध्ये किडनीचा मोलाचा सहभाग असतो. या किडनीचे आरोग्य का बिघडते ? बिघडलेल्या किडनीमुळे आयुष्य धोक्यात का येते ? किडनीचे आरोपण म्हणजे काय ? ते कशासाठी करतात ? डायलिसीस कोणाला उपयोगी ठरते ? किडनीचे आरोग्य अबाधित ठेवायला कोणती काळजी घ्यावी ? सामान्य माणसाला पडणाऱ्या अशा अनेकविध प्रश्नांची उत्तरे साध्यासोप्या भाषेत वैज्ञानिक पद्धतीने उलगडून दाखवणारे किडनीविषयी बोलू काही…
-
T.V.Sardeshmukh - Atmanishth Lekhakachi Bakhar (त्
l शिष्यात इच्छेत पराजयम l प्रिया निघोजकर या माझ्या शिष्येने त्र्यं.वि.सरदेशमुख यांच्या साहित्यसंशोधनाला दिलेले हे ग्रंथरूप मराठी साहित्याचे अभ्यासक संशोधक आणि वाचक या सर्वांसाठी मौलिक ठरणार आहे . विद्यार्थी , विषय आणि मार्गदर्शक ह्या त्रिवेणी संगमातून उत्तम लेखन होऊ शकते , याचे हे ग्रंथरूप आदर्श उदाहरण आहे . मराठी साहित्यातील महत्त्वाचे कादंबरीकार आणि साक्षेपी समीक्षक असलेल्या सरदेशमुखांच्या साहित्याची एक नवी ओळख ह्या ग्रंथातून वाचकांना होईल .
-
Vavtal Peral Tar Vadalach Ugvel
प्राचीन काळात व्यापारी उद्देशाने सौदागरांचे तांडे देशीविदेशीचा भूगोल पालथा घालत. या तांड्यांबरोबर नट, नर्तक, वैदू, हेर, चोर असे घटकही सोबत जात. क्वचित परक्या भूगोलावर गुन्हेगारी धुडगूस घालत. आजचे भूराजकारण असेच काहीसे आहे. पृथ्वीवरील खनिजसंपत्ती आणि ती वाहून नेण्याचे व्यापारी मार्ग हे फक्त युरोप-अमेरिकेच्या ताब्यात हवेत, ही आजची अटीतटी मोठी आहे. त्यासाठी पाश्चात्त्य सांस्कृतिक संस्था, गुप्तचर यंत्रणा आणि शस्त्रलॉबी हातात हात घालून काम करतात. व्यापारी मार्गांवरील देशांना मांडलिक बनवण्याच्या नादात युद्धाचे वणवे पेटवून देतात. मध्यपूर्वेतील अशा युद्धकहाराची ही गोष्ट!
-
Thakare Viruddha Thakare (ठाकरे विरुद्ध ठाकरे)
‘ठाकरे’ म्हणजे अर्धशतकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेले घराणे. प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक. ‘शिवसेना’ स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात दरारा असलेले नाव. पण बाळासाहेबांच्या डोळ्यांदेखत ‘शिवसेने’त फूट पडली अन् ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ जन्माला आली. उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे हे दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले ! दोन सेना. दोन सेनापती. काय असणार या दोघांची रणनीती अन् नियती ? महाराष्ट्राच्या राजकारणातील एका विलक्षण सत्तासंघर्षाचा विविध अंगांनी घेतलेला वेध
-
Palvi (पालवी)
पुण्यातल्या मध्यमवर्गीय कुटुंबातला तो. बघता बघता व्यसनाच्या विळख्यात ओढला गेला. आईची माया, बहिणीचा जिव्हाळा, काहीच त्याला रोखू शकलं नाही. ना धड शिक्षण, ना नोकरी, ना व्यवसाय ! रस्ता हेच घर. पोलीस-कोठडीची हवाही खाल्ली. तो व्यसनातून सुटू पाहत होता. सुटल्यासारखा वाटला, तरी पुन्हा खेचला जात होता. br>अखेर त्याने व्यसनावर मात केली. एवढंच नाही तर स्वत: एक व्यसनमुक्ती केंद्र उभं केलं. एका फिनिक्सचं विलक्षण प्रांजळ आत्मकथन.
-
Pramanikahi Sundarahi (प्रामाणिकही सुंदरही)
अनुवाद म्हणजे भरतकाम केलेल्या कापडाची उलटी बाजू...’ ‘अनुवाद म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवणे...’ ‘अनुवाद म्हणजे मूळ लेखनकृती वाचता येत नाही, याबद्दल मिळालेला दिलासा...’ ‘अनुवाद हा तरुण स्त्रीसारखा असतो; सुंदर असेल, तर प्रामाणिक नसतो आणि प्रामाणिक असेल, तर सुंदर नसतो...’या आणि अशा अनेक वचनांनी अनेक शतके अनुवादित साहित्याची बदनामी केली आहे.पण, कुशल अनुवादक जेव्हा अनुवाद-प्रक्रियेची सर्व पथ्ये पाळून जबाबदारीने एखादी साहित्यकृती अनुवादतो, तेव्हा त्याचा अनुवाद मूळ लेखनाशी प्रामाणिकही राहतो आणि लक्ष्य भाषेत सौंदर्याची अनुभूतीही देतो. हे शिवधनुष्य कसे पेलायचे, हे सोदाहरण स्पष्ट करणारे पुस्तक
-
Kalam 370 Aagraha Ani Duragraha (कलम ३७० आग्रह आणि
३७० रद्द करण्याच्या ऐतिहासिक व अकल्पित निर्णयामुळे उठलेले वादळ अजूनही घोंघावत आहे आणि त्यात अनेक बाबी दृष्टीआड होत आहेत वा केल्या जात आहेत. १९४७-४८च्या काश्मीरमधील युद्धजन्य परिस्थितीपेक्षाही शेख अब्दुल्लांच्या दुराग्रहामुळे कलम ३७० राज्यघटनेत समाविष्ट करावे लागले. महाराजा हरिसिंग यांनी हिंदुस्थानात संमीलित होण्यास संमती दिल्यानंतरही काश्मीरच्या जनतेचे मत अजमावावे, हा काँग्रेसचा आग्रह होता; पण त्याची परिणती ३७०व्या कलमात होईल आणि शेख अब्दुल्लांच्या अवास्तव मागण्या भारताच्या राज्यघटनेचा विपर्यास करतील, ही कल्पनाही कोणी केली नव्हती. नेहरूंना माणसांची पारख नव्हती. काश्मीरसाठी वेगळी राज्यघटना, वेगळे नागरिकत्व, वेगळा ध्वज आणि सदर-इ-रियासत व पंतप्रधान ही पदे, अशा बहुतेक सर्व मागण्या दिल्ली करारान्वये मान्य झाल्या. ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ हा प्रश्न लोकमान्य टिळकांनी ब्रिटिश सरकारला विचारला होता. तोच प्रश्न तत्कालीन सरकारला विचारणे आवश्यक होते. गेली ७० वर्षे अनेक प्रयत्न करूनही काश्मीर प्रश्नाची सोडवणूक होऊ शकलेली नाही; कारण शेवटी सर्व चर्चा कलम ३७० वर येऊन थांबत असे. हे कलम रद्द केल्याने निर्माण झालेले प्रश्न वैधानिक व भावनिक आहेत. त्यांची सखोल चर्चा या पुस्तकात केली आहे.
-
Manuche Aranya Amazonchya Khoryatil Jangalbhatkant
‘मनू’ हे नाव आहे पेरू देशाच्या दक्षिणेला उगम पावणाऱ्या अन् नंतर महाकाय अॅमेझॉनला मिळणाऱ्या या एका नदीचे. अॅमेझॉनचे खोरे म्हणजे पृथ्वीतलावरील जैवविविधतेने स समृद्ध अशी जागा. पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया असो, हजारो प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींचे बहरलेले विश्व असो, जलचर अन् उभयचर प्राण्यांपासून कीटक अन् सस्तन प्राण्यांपर्यंतच्या हजारो प्रजाती असोत, या साऱ्या विविधांगी, विविधरंगी जीवसृष्टीला अंतरंगात सामावून घेणारे मनूचे अरण्य. पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेल्या या सदाहरित घनदाट जंगलात एका झपाटलेल्या निसर्गप्रेमीने मनसोक्त भटवंती केली. त्या भटवंतीतून नजरेपुढे साकार झालेले, शब्दांतून अन् छायाचित्रांमधून पानांवर उमटलेले मनुचे अरण्य: मोठा आकार, विपुल रंगीत/ कृष्णधवल छायाचित्रे.
-
Ye Hai Mumbai Meri Jaan (ये है मुंबई मेरी जान)
सरदार कुलवंतसिंग कोहली.मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अन् राजकीय क्षेत्रांतमोलाचं योगदान दिलेलं हे व्यक्तिमत्त्व.योगायोगानं मुंबईच्या मोहक मयसभेशी - चित्रपटसृष्टीशीकुलवंतजींचा घनिष्ठ संबंध आला. कपूर कुटुंब, दिलीपकुमार - राजेंद्रकुमार - धर्मेंद्रपासून राजकुमार - संजीवकुमार - जितेंद्रपर्यंतचे नायक,मीनाकुमारी - मधुबालापासून माला सिन्हापर्यंतच्या नायिका,व्ही. शांताराम - असीफ - मेहबूबसारखे दिग्दर्शक,नौशादपासून रवीपर्यंतचे संगीतकार, प्राणसारखे दिलेर खलनायक -किती किती नावं सांगायची?अशा दिग्गज कलाकारांबरोबर कुलवंतजींच्या तारा जुळल्या.सामान्य माणसासाठी आकाशीची नक्षत्रं असणारेहे चित्रपटसृष्टीतील तारे-तारका कुलवंतजींनाहाडामांसाची माणसं म्हणून न्याहाळता आली. अटलबिहारी वाजपेयी - बाळासाहेब ठाकरे -सुशीलकुमार शिंदे किंवा प्रमोद महाजन -झैलसिंग - बुटासिंग यांच्यासारखेराजकारणीदेखील या चित्राची चौकट बनून भेटतात. ही सारी माणसं अन्त्यांच्याबरोबर जगलेला अवघा काळकुलवंतसिंग यांनी आपल्यापुढे जिवंत केला आहे|
-
Hamarasta Nakaratana (हमरस्ता नाकारताना)
हमरस्ता नाकारायचाच, असं काही ठरवलं नव्हतं.पण स्वत: स्वतःची साक्ष काढत पुढे जातानापिढ्यानपिढ्या तुडवून तुडवून गुळगुळीत झालेलीवाट मागे पडली खरी.घेतलेली वाट बिकट होती, अनपेक्षित वळणांची होती,तशीच मधूनच सुखावणाऱ्या हिरवाईचीही होती.खूपसं चालून गेल्यावर मागे वळून पहावंसं वाटलं.भूतकाळच्या मुसक्या बांधून विस्मरणाच्या दरीतफेकून देण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती करावीशी वाटली.आपली मुळं शोधावीशी वाटली.नदीचं मूळ कधी शोधू नये म्हणतात –पण करू नये ते केलं.हा शोध घेता घेता मला माझ्यात दडलेलीमाझी आई गवसली, आजी सापडली.भूतकाळाशी दोस्ती करताना त्यातल्या माणसांबरोबर पुन्हा जगले…मला स्त्रीत्वाचं भान देणाऱ्या पुरुषांकडेप्रौढपणाच्या चष्म्यातून नीट न्याहाळलं.त्यावेळी भावनांच्या धुक्यात बुडालेले तिढे आज लक्षात आले.नात्यांचे निखळलेले सांधे जुळवताना वाटलं की,निखळ ‘मी’ अशी नाहीच. अनेक माणसांनी-त्यांच्या राग, लोभ, प्रेम, असूया, मैत्र अशाअनेक भावनांनी भारलेल्या नात्यांनी मला घडवलं आहे.गोष्ट माझीच नाही, तर त्या सर्वांची आहे.या गोष्टींशी जैवपणे जुळलेल्या काळाची ही गोष्ट आहे|
-
Vivekachya Vatevar (विवेकाच्या वाटेवर)
डॉक्टर, तुम्ही लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकातून, लेखातून; तुम्ही दिलेल्या प्रत्येक व्याख्यानातून, मुलाखतीतून; तुमच्या प्रत्येक उक्तितून अन् कृतीतून विवेकवादाचे पाऊल पुढे पडत राहिले. ही विवेकाची वाटचाल भविष्यातही अशीच चालू राहावी, यासाठीच हा पुस्तक-प्रपंच.
-
Bhootan (भूतान)
देवभूमी हिमालयात वसलेला आपला नितांतसुंदर शेजारी देश म्हणजे भूतान… पैसे किंवा दरडोई उत्पन्न याला जास्त महत्त्व न देता जिथे आनंदाचा निर्देशांक आवर्जून पाहिला जातो, तो जगातला एकमेव देश म्हणजे भूतान… वाहतुकीचे नियम अगदी अभावानेच मोडणाऱ्या लोकांचा देश म्हणजे भूतान… सगळा देशच जागतिक वारसा आहे, असे मानून मनापासून तसे वागणाऱ्यांचा देश म्हणजे भूतान… हॉटेलपासून दुकानांपर्यंत महिलांचाच दबदबा असलेला देश म्हणजे भूतान ! अशा या जगावेगळ्या देशाचा तपशीलवार परिचय करून देणारे पुस्तक.