-
Afsana Likh Rahi Hoo (अफ़साना लिख रही हूँ)
एक जमाना होता जेव्हा हिंदी चित्रपटांत ‘गाणी’ हा एक अविभाज्य घटक असे. काही चित्रपटांतील काही गाणी तर कथानक पुढे नेण्याचा भार उचलत… कथानकाचा भागच जणू! अशी गीतं रचताना, ती संगीतबद्ध करताना व ती चित्रित करताना त्यात कथेचं प्रतिबिंब पडेल असं पाहिलं जाई. चित्रपटसंगीताच्या अभ्यासिका डॉ. मृदुला दाढे यांनी या पुस्तकात आपल्या भावविश्वात अढळपद मिळवलेल्या अशा १५ चित्रपटांची निवड केली आहे. त्या चित्रपटांच्या कथेला समर्थ जोड देणाऱ्या गीतांचं चित्रपटातलं स्थान, त्यांची सौंदर्यस्थळं, त्यांची सांगीतिक बलस्थानं डॉ. मृदुला यांनी पारखी नजरेने पुस्तकात उलगडून दाखवली आहेत. गीतकाराची तरलता, संगीतकाराची सर्जनशीलता अनेक ‘अफसाने’ या रसग्रहणात आढळत जातील. चित्रपट कथानक आणि गाणी यांच्यातील मेळ उलगडणारं… अफ़साना लिख रही हूँ!
-
Zero Day (झिरो डे)
मुंबई शहरात प्रचंड गोंधळ माजला आहे. शहराच्या रस्त्यावरील सर्व ट्रॅफिक सिग्नल बंद पडले आहेत. महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे मुख्य शाहवाझ अली मिर्झा यांच्या कार्यालयीन ई-मेलवर आलेल्या इमेलमध्ये या सायबर हल्ल्याची जबाबदारी मुन्तकिम नावाच्या अतिरेक्याने घेतली आहे. त्याने आणखी हल्ल्यांची धमकी दिली आहे. मिर्झांसह सायबर गुन्हे शाखेचे आयजी विक्रांत सिंग, राष्ट्रीय सुरक्षा बलाची मेजर शायना वर्मा आणि इतर तिघे लगेच सायबर जगताच्या काळोख्या गुन्हेगारी जगतात शोध घेऊ लागतात. पण हॅकरला घेरण्यासाठी मिर्झा आणि विक्रांत यांनी खेळलेली खेळी उलटी पडते. परिणामी शहरावर आणखी एक सायबर हल्ला होतो आणि तोही मुंबईची जान असलेल्या रेल्वे सेवेवर! झिरो डेचे संकट संपूर्ण देशाच्या यंत्रणेला कोसळवू शकते. मिर्झा आणि विक्रांत झिरो डेमध्ये त्यांचे आयुष्य पणाला लावून या महाभयंकर अस्त्राचा सामना करण्यास सज्ज आहेत.
-
Gayanache Rangi ( गायनाचे रंगी)
नीला भागवत या ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल गायिका म्हणून ख्यातकीर्त… परंतु चौकटीबाहेर पडून शास्त्रीय गायनात अभिव्यक्तीचे नवनवे प्रयोग करणाऱ्या कलाकार म्हणून असलेली त्यांची ओळख काकणभर जास्तच भरते. ख्याल गायनात परंपरेने चालत आलेल्या बंदिशी बहुतांश वेळा ‘सौतन-साँस-नणंद’ या ‘पुरुषसत्ताक विचारांचं उदात्तीकरण’ म्हणून गणना होऊ शकणाऱ्या चौकटीत अडकलेल्या दिसतात. नीला भागवत यांनी मात्र निर्मळ मानवी सहभावनेच्या विचारांच्या बंदिशी रचण्याचे प्रयोग केले आहेत. या पुस्तकात या प्रयोगांविषयी, त्यांतील अनुभवांविषयी त्या विस्ताराने सांगतात. त्याचप्रमाणे त्यांना ज्या संतसाहित्यातील प्रेम, करुणा, समता, एकता, मानवधर्म अशा भावनांनी प्रभावित केले, त्या प्रभावातून त्यांनी निर्माण केलेल्या संगीताविषयीही त्या आपले विचार मांडतात. गायनाचे रंगी संगीत क्षेत्रातील त्यांची प्रेरणास्थानं, गुरु यांचीही त्यांनी कृतज्ञ भावनेने व्यक्तिचित्रणं पुस्तकात साकारली आहेत. शास्त्रीय संगीताचा चौकटीबाहेर जाऊन बहुपेडी विचार करणारं पुस्तक… गायनाचे रंगी
-
Mudka Kumpan (मुडकं कुंपण)
समाजजीवनाला एक दिशा असावी म्हणून नीति-अनीतीचे, नैतिकतेचे काही नियम घालून दिले जातात. पण ‘काहींना’ मात्र त्यातून सूट मिळते, आणि या दांभिकतेच्या वरवंट्याखाली भरडली जाते ती वंचित, अल्पशिक्षित स्त्री ! अशाच एका भरडलेल्या स्त्रीची, रंभीची ही कहाणी…. तिच्या अर्धवट संसाराची… तिच्या व्यथा-वेदनांची… तिच्या न संपणाऱ्या भोगांची… तिच्या मनातल्या उलाघालीची…. तिच्या संघर्षाची… तिच्या आशावादाची…. समाजातील दांभिकतेवर भाष्य करणाऱ्या… हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना-प्रसंगांमधून गावजीवनाचं, त्यातल्या स्त्री-जीवनाचं अस्सल चित्रण करणारी कादंबरी…. मुड़क कुपण
-
Hits Of Ninety Two (हिट्स ऑफ नाईन्टी टू)
ज्याचे कुणी नसते त्याचा हिंदी सिनेमा असतो. माझ्या आतमध्ये खोलवर घट्ट रुतून बसलेल्या ह्या जीवनावश्यक भावनेला अनेक वर्षांनी पुन्हा आठवणींचा मोहोर फुटला तो पंकज भोसलेच्या कथांमुळे. एका विशिष्ट विनोदबुद्धीने साकारलेल्या ह्या कथा नुसत्या परिसर कहाण्या नसून नव्वदीच्या दशकातील, महाराष्ट्रातील शहरी तरुणाची मनःस्थिती सांगणाऱ्या ऑडिओ कॅसेट्स आहेत. पंकजने कथा लिहिताना कॅसेटवरील ट्रॅक्सना नंबर द्यावेत तसे प्रकरणांना नंबर दिले आहेत. अभिजात जगणे, अभिजात ऐकणे, अभिजात पाहणे ह्या संस्कारांना चुना लावून, आधीच्या पिढीने पोसलेल्या फालतू आदर्शवादाला मधले बोट दाखवून, मोठ्या लाटेप्रमाणे आलेल्या हिंदी भाषेतील पॉप्युलर करमणुकीच्या संस्कृतीला नुसते आपलेसे करूनच नाही, तर त्यातील गाभ्यावर विश्वास ठेवून, आपले आयुष्य आखणाऱ्या स्थलांतरउत्सुक नव्वदीच्या मराठी तरुण पिढीचे हे कथारूपी विश्व आहे.
-
Red Light Dairies Khuloos (रेड लाइट डायरीज ख़ुलूस)
रेडलाइट एरिया म्हटलं की, अनेकांची नाकं मुरडली जातात…. ‘कुलटा’, ‘किटाळ’, ‘वेश्या’, ‘रंडी’… असे अनेक शब्द वापरून तिथल्या स्त्रियांना हिणवलं जातं. पण व्यापकदृष्ट्या, समाजाच्या वासना शमवणाऱ्या या स्त्रियांच्या नशिबी काय येतं… दुःख- दैन्य आणि नरकासम भोगवटा ! अशी अनेक आयुष्यं जवळून बघितलेल्या समीर गायकवाड यांनी या स्त्रियांनाच या पुस्तकाच्या नायिका केलं आहे. त्यांनी या स्त्रियांची घुसमट, त्यांच्या इच्छा-आकांक्षा, त्यांची परिस्थिती- शरणता, हतबलता, त्यांचे हुंकार, त्यांच्या आर्त हाका, त्यांच्या भावभावना आणि त्यांची तगमग हे सारं या पुस्तकात संवेदनशीलरीत्या टिपलं आहे. खुलूस म्हणजे निर्मळ सच्चेपण, आस्था आणि निष्ठा… या स्त्रियांचं जगणं त्याच सच्चेपणाने चितारणारं हे पुस्तक…. रेड लाइट डायरीज… खुलूस !
-
Hirabai Badodekar (हिराबाई बडोदेकर)
ही कथा आहे एका सावळ्याशा कृश मुलीची.. शंभर वर्षांपूर्वी, विसाव्या शतकाच्या आरंभी आपल्या गायनकलेच्या जोरावर पुरुषसत्ताक कलाविश्वात स्त्रियांसाठी एक सन्माननीय राजमार्ग निर्माण करणाऱ्या एका दीपकळीची… ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर यांची. सभ्य घरांतील स्त्रिया जेव्हा जाहीरपणे गात नव्हत्या त्या काळात तिकीट लावून आपला जाहीर जलसा करणारी ही पहिली धाडसी गायिका ! आपल्या गाण्याच्या हिमतीवर २० जणांच्या चमूला घेऊन पहिला ‘फॉरेनचा दौरा करणारी, भारताबाहेर पाऊल टाकणारी ही पहिलीच गायिका. ख्याल, ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत या सर्व क्षेत्रांत आपली मोहर उमटवून ‘सात्त्विक, सोज्वळ गायिकेचा’ आदर्श घालून देऊन ‘स्त्रियांचे घराणे’ निर्माण करणाऱ्या हिराबाई बडोदेकर. डॉ. शुभदा कुलकर्णी यांनी हिराबाई बडोदेकर यांच्या आयुष्यावर हे ललित चरित्र लिहिताना केवळ एका कलाकार स्त्रीचे वैयक्तिक आयुष्य नव्हे, तर ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंतच्या हिंदुस्थानी संगीतजगताचा एक आलेख मांडला आहे. सत्य आणि कल्पित यांचा हा ‘ख्याल’ आहे… हिराबाईंच्या गाण्यासारखाच सुरेल ! – डॉ. चैतन्य कुंटे
-
Hava Havai (हवा हवाई)
हवाई बेटसमूहाची सर्वसामान्यांमधली ओळख एका बाजूला नितांतसुंदर, निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून असते, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचं पन्नासावं घटकराज्य म्हणून जगाच्या नकाशावरचं त्याचं स्थान काहीसं अपरिचित असतं…. मात्र, एवढं निश्चित की ‘हवाई बेट’ हा अनेकांच्या कुतूहलाचा विषय असतो. हे कुतूहल या पुस्तकातून अनेक अंगाने शमवलं जातं. हवाई बेटांची मूळ पॉलिनेशियन संस्कृती, राजकीय इतिहास, लोक-संस्कृती, तेथील निसर्गसौंदर्य आणि त्यातील वैविध्य या सर्वांची सविस्तर ओळख या पुस्तकातून होते. ही ओळख करून देता देता आजवर त्रेपन्न देशांची भ्रमंती केलेले ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक हे जगप्रसिद्ध लेखक विचारवंत मार्क ट्वेन, कॅ. जेम्स कुक अशा हस्तींच्या तेथील वास्तव्याचा मागोवा घेतात. तसेच अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष बराक ओबामा यांची जन्मभूमी म्हणूनही ते ‘हवाई’कडे दृष्टिक्षेप टाकतात आणि तेथील स्थलांतरित भारतीयांचीही माहिती देतात. दुसऱ्या महायुद्धातील ‘पर्ल हार्बर’वरील जपानचा हल्ला तेथे म्युझियमरूपात कसा ‘जीवंत’ आहे, हेही नाईक पुस्तकात सांगतात. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य असं की लेखकाचं तेथील दीर्घ वास्तव्य आणि त्या वास्तव्यादरम्यान पाहिलेलं, अनुभवलेलं, अभ्यासलेलं ‘हवाई’ ते आपल्या डोळ्यासमोर उभं करतात. हवाईचा सर्वस्पर्शी छोटेखानी एन्सायक्लोपेडिया… हवा हवाई!
-
Gandhivadacha Chemical Locha Ani Itar Katha (गांधी
लक्ष्मीकांत देशमुख यांच्या या संग्रहातील कथांना तसा कुठलेही स्थानवैशिष्ट्य असलेला एक विशिष्ट असा परिसर नाही. त्या एकूणच भारतीय आणि जागतिकही पटलावरही घडतात. विशेषतः सांस्कृतिक बहुविधता हा आशय असणाऱ्या अनेक कथा या संग्रहात आहेत. ही बहुविधता हेच भारतीय समाजाचे वैशिष्ट्य आहे. जाती-धर्माच्या सीमारेषा ओलांडून सर्वांच्या मनाला भिडणारे संगीत, परस्परांमधला सद्भाव, सामाजिक सलोखा राखणारे समाजमन, परधर्मीयांच्या श्रद्धांचा आदर करणारी सामान्य माणसे असा या संग्रहातील कथांचा ऐवज आहे. भारतीय समाजातला मुस्लिम हा समाजघटक) आपल्या कथात्म साहित्यात अभावानेच आढळतो. ती उणीव यातील कथांनी भरून काढली आहे. या कथांमध्ये चित्रित झालेल्या समाजजीवनात भिन्न धर्मीयांचे अस्तित्वही ठळकपणे जाणवते. म्हणून या कथा व्यापक अर्थाने समाजजीवन कवेत घेताना दिसतात. कथात्म साहित्यातूनही लेखकाचा विचार डोकावतो. एका प्रागतिक अशा समाजाचे रेखांकन करणाऱ्या या कथा आहेत. विशेषतः सहिष्णुतेचा संकोच होत असलेल्या, एकारलेल्या काळात या कथांचे महत्त्व नक्कीच अधोरेखित होणारे आहे. – आसाराम लोमटे
-
My Barc Days
My BARC Days is a memoir of Dr. Suresh Haware’s inspirational journey from a remote village in India to becoming a nuclear scientist in India’s premier research organization Bhabha Atomic Research Centre (BARC). The book brings forth the author’s perspective of looking at difficulties as challenges and opportunities, and his intense passion for knowledge and research. His experiences span political events that affected the common man in India, days spent in educational institutions, work in BARC and also a Himalayan pilgrimage. Through detailed descriptions, the book gives a thorough understanding of life and work at BARC including a few milestones in the nation’s nuclear journey.
-
Swapnamohini (स्वप्नमोहिनी)
ॲस्ट्रोपायलट दिक्पाल आर्य .….. धाडसी, हरहुन्नरी, हजरजबाबी, प्रसंगावधानी अशा दिक्पालची मंगळावर जाण्यासाठी निवड झाली . पृथ्वीवरील मानवांचा प्रतिनिधी म्हणून मंगळावर जाण्याचा प्रथम मान मिळणं, ही भूषणावह गोष्ट होती . दिक्पाल मंगळावर उतरला …यानातून बाहेर पडून चालत जाताना त्याच्या सहकाऱ्यांना तो दिसलाही … पण तेवीस दिवसांनी परत येणं अपेक्षित असणारा दिक्पाल तब्बल २५ ९ दिवसांनी परतला. एवढे दिवस कुठे होता तो? विश्वातल्या अज्ञात, अकल्पित आणि अनपेक्षित घडामोडींची आणि मानवाच्या राक्षसी महत्वाकांक्षेची थरारक कथा.. स्वप्नमोहिनी! विख्यात भयकथा, गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी
-
Aathavani Mamanchya (आठवणी मामांच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे मामासोबतच्या मैत्रीचं… नात्याचं ! मामा-भाचरांच्या नात्यांत एक वडिलकी आणि मैत्र याचं मिश्रण असतं. म्हणूनच हे नातं नेहमी तरूण राहतं. मामांच्या बहुपेडी आठवणी सांगत आहेत… बाळासाहेब थोरात, अमृता सुभाष, प्रदीप चंपानेरकर, किशोर मेढे, राजेंद्र मलोसे, प्राची रेगे, सुचिता घोरपडे आणि अश्विनी देसाई !
-
Aathavani Aajobanchya (आठवणी आजोबांच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे, आजोबांच्या आठवणीचं । आजोबा म्हणजे घरातल्या प्रत्येकाचं विसंबून राहण्याचं हक्काचं ठिकाण! आजोबांचे अनुभवाचे चार बोल, त्यांची पाठीवर पडलेली थाप आत्मविश्वास देत असते. आजोबांच्या आठवणींचे पदर उलगडत आहेत… विश्वास पाटील, विजयराज बोधनकर, अन्वर हुसेन, सुनील मेहता, उदय निरगुडकर, लक्ष्मण खेडकर ।
-
Aathavani Aajichya (आठवणी आजीच्या)
काही नाती ही जन्मत:च मुरलेल्या स्वरूपात जुळली जातात. अगदी मुरांब्यासारखी! ही नाती ऊब, प्रेम किंवा मायेचा ओलावा अंगा-खांद्यावर घेऊनच आलेली असतात. विश्वासाचा भक्कम पाया असतो या नात्यांना! म्हणूनच कधी राग आणि गैरसमजुतीचं एखादं वादळ आलं आणि नात्यांचे धागे थोडे हेलकावले, तरी ते उसवत नाहीत किंवा तुटत नाहीत. कधी गोंजारून तर कधी फटकारुन ही नाती आयुष्य घडवणारे धडेही देत असतात. या नात्यांतून भरारी घ्यायला ऊर्जा मिळत असते आणि नंतर भरभरून कौतुकही मिळत असतं. आजोळची नाती ही अशी असतात, मग ती आईकडची असोत किंवा वडलांकडची! ‘आजोळचे दिवस’ या मालिकेत विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी याच नात्यांचे विविध पदर उलगडले आहेत. मालिकेतील हे पुस्तक आहे, आजीच्या आठवणींचं । आजीच्या तलम प्रेमाची सर कशालाच येत नाही. मऊ दुलईची ऊब देणाऱ्या पण प्रसंगी कणखरही होणाऱ्या आजीच्या बटव्यात बराच काही खजिना असतो. त्याच विषयीचे अनुभव सांगत आहेत…. मोनिका गजेंद्रगडकर, शुभदा चौकर, राधिका आपटे, शाहू पाटोळे, नितीन आरेकर, अनिल साबळे व राजीव खांडेकर।
-
Bhatkanti Saptarangi Betanchi (भटकंती सप्तरंगी बेट
कोणतंही बेट म्हटलं की आपलं कुतूहल चाळवतं आणि जगात तर अशी अनेक बेटं आहेत जी अक्षरश : स्वप्ननगरी वाटावीत… अशाच काही अनोख्या आणि अपरिचित बेटांची आपल्याला सैर घडवून आणत आहे प्रधान दाम्पत्य ! विशेष गर्दी नसलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बेटांवर जाऊन राहणं, तेथील निसर्ग भरभरून अनुभवणं, तेथील स्थानिक खाद्य-पेयांचा आस्वाद घेणं, घेणं तेथील वेगळी संस्कृती, प्रथा समजून हा प्रधान दाम्पत्याचा आवडीचा उद्योग…. गाठीला असलेला हा अनुभव रसिक वाचकांसमोर खुला करून प्रधान ती बेटं, तो प्रदेश डोळ्यासमोर उभा करतात. अशा तऱ्हेच्या फिरण्यातून पर्यटनाचा एक वेगळा आनंद कसा मिळू शकतो याची एक नवी दृष्टी ते पर्यटकांना भटकंती सप्तरंगी बेटांची या पुस्तकातून देतात . कोणत्या बेटांची सफर आहे या पुस्तकात ? ऐकलं आहे का तुम्ही या बेटांबद्दल ? स्पेनमधले बॅलेॲरिक आणि कॅनरी आयलंडचे अप्रतिम समुद्रकिनारे ११५ लहान – मोठ्या बेटांचा समूह सेशेल्स जागतिक पर्यटकांचं हॉट डेस्टिनेशन हवाई बेटं ग्रीस मधली पांढरी निळी बेटं लहान – मोठ्या १७,५०० बेटांचा मिळून झालेला व प्राचीन वारसा लाभलेला इंडोनेशिया नयनरम्य निसर्गसौंदर्याने नटलेली इटलीमधील लोकप्रिय बेटं .. अशा अनेक बेटांची सप्तरंगी सफर…
-
Theranos (थेरॅनॉस)
स्टीव्ह जॉब्जला आदर्श मानणाऱ्या एका तरुणीने रक्तचाचण्यांशी संबंधित नवं तंत्रज्ञान जन्माला घालायचा ध्यास घेतला … या ‘ इनोव्हेशन’मुळे वैद्यकीय क्षेत्राचा चेहरामोहराच बदलून जाणार होता … पण हे तंत्रज्ञान तिने खरंच प्रत्यक्षात आणलं होतं का ? की ती केवळ थापा मारून मोठमोठ्या गुंतवणूकदारांना आपल्याकडे आकर्षित करून घेत होती ? रुग्ण , डॉक्टरांपासून ते मोठमोठ्या औषध कंपन्यांची दिशाभूल करणारी थरारक कहाणी …. थेरॅनॉस !
-
Spy Stories-The Zero Cost Mission (स्पाय स्टोरीज द
द झीरो – कॉस्ट मिशन जमात – ए – इस्लामीच्या कारवायांमुळे भारत – बांगलादेश संबंध बिघडतात. कारण असतं जमातच्या छावण्यांमधून केली जाणारी पाकिस्तानच्या आय.एस.आय.ला मदत. या छावण्यांत प्रशिक्षित एजंट्स भारतात पाठवून दहशतवादी कारवाया करतात. भारताच्या एक्सटर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या बांगलादेश ऑपरेशन्सचे प्रमुख विजय शुक्ला एक धाडसी प्लॅन आखतात. त्यासाठी आवश्यक असतो अंगी कौशल्यं असलेला, आव्हानांना भिडण्याची वृत्ती असलेला आणि गरज पडली तर वरिष्ठांबद्दल काहीशी बेफिकिरी दाखवू शकणारा माणूस. असे गुणधर्म अंगी असतील असा ‘ऑपरेटिव्ह’ एजन्सीला मिळेल? मुख्य म्हणजे त्यांची योजना यशस्वी होईल ? थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा… द झिरो कॉस्ट मिशन आणि द वायली एजन्ट !