-
Mukkam Post Sanskrutik Fat (मुक्काम पोस्ट सांस्कृत
‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा... अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’ - ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून --- गेली ३५हून अधिक वर्षं ज्येष्ठ लेखक सतीश तांबे निष्ठेने कथालेखन करून ‘कथेचा चिंचोळा अवकाश’ सातत्याने विशाल करत आहेत. मुठीत काजवा लपवलेला असावा, तशी त्यांच्या कथेत मर्मदृष्टी दडलेली असते आणि जेव्हा ती वाचकाला सन्मुख होते, तेव्हा वाचक चकित होऊन अंतर्मुख होतो. या संग्रहातली ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ ही कथा मराठी साहित्याची सांस्कृतिक चिकित्सा करते. तर ‘यत्र-तत्र-सावत्र’ ही कथा जमिनीच्या रूपकातून केलेलं मानवी अवस्थेवरचं करुण भाष्य ठरते. ‘नाकबळी’सारखी मिश्कील वाटणारी कथा गंभीरपणे स्त्रीपुरुष संबंधांचा वेध घेते. तर ‘संशयकल्लोळात राशोमान’ ही कथा सत्य म्हणजे काय, या प्रश्नाचा रहस्य कथेच्या अंगाने वेध घेते. ‘रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा’ ही कथा म्हणजे जणू कल्पित कसं रचावं याचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या आपल्या महाकाव्यांना वाहिलेली आदरांजलीच!
-
Sakshibhavane Baghtana (साक्षीभावाने बघताना)
पोएट टू पोएट' या अभिनव संकल्पनेतून सुप्रसिद्ध प्रतिभावान जर्मन कवयित्री उलरिकं द्रेस्नर हिच्या निवडक जर्मन कवितांचं अरुणा ढेरे व जयश्री हरि जोशी यांनी साकारलेलं अनुसर्जन... ... वेगवेगळ्या देशांतले भूप्रदेश तिथल्या सांस्कृतिक संदर्भांसकट उलरिकं यांच्या काव्यात्म अनुभवाचा भाग झालेले आहेत. त्यामुळे मराठी कवयित्रींच्या अनुभवविश्वापेक्षा तिचं अगदी निराळं आणि समृद्ध असं अनुभवाचं जग तिच्या कवितांमधून समोर येतं. सांस्कृतिक संदर्भांपासून पूर्ण मुक्त अशा स्त्रीशरीराच्या अनुभवापासून थेट मानवजातीच्या उत्क्रांतीच्या इतिहासापर्यंत आणि स्त्री पुरुष संबंधातल्या ताण्याबाण्यापासून बर्लिनच्या भूत-वर्तमानापर्यंत तिच्या कवितेचा विस्तृत पैस आहे... - अरुणा ढेरे हि कविता ध्वनीचे बोट धरून दृश्यप्रतिमांची उकल करते. उलरिकंला शब्दांचे खेळ करायला आवडतात. नवीन शब्दांचे सर्जन करण्यात तिचा हातखंडा आहे. दृश्य रूप हे तिच्या कवितेचे विशेष लक्षण आहे. उलरिकंची कविता माणसा-माणसांतील समीकरणं आणि लालसा, त्यांच्या भावनांचे खेळ, आकांक्षाचे ओझे हे जगाच्या पाठीवर सारखेच असते हे दाखवून देणारी. - जयश्री हरि जोशी
-
Bhumika (भूमिका)
यशवंतराव चव्हाण - महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील लोकप्रिय व कणखर व्यक्तिमत्त्व! कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या खेड्यातील एका युवकाचा उपपंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा व प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रकारची बरी-वाईट स्थित्यंतरं पाहिली, अनुभवली. त्यांच्या काही राजकीय कृती वादग्रस्त ठरल्या. तरीही त्यांनी आपली वैचारिक बैठक कधीही सोडली नव्हती. पूर्वग्रहविरहीत आणि नि:पक्षपणे विचार करणाऱ्या अभ्यासकाला त्यांच्या वैचारिक दृष्टिकोणात सुसंगतीच आढळेल. केंद्रीय मंत्री असताना यशवंतरावांनी विविधप्रसंगी केलेली निवडक भाषणं, काही वर्तमानपत्रांसाठीच्या व दिवाळीअंकासाठीच्या मुलाखती व काही लेखांचा या पुस्तकात समावेश केला आहे. १९६५ ते १९७९ या चौदा वर्षांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीची त्यांची भूमिका काय होती, याचा चिकित्सक वाचकांना या पुस्तकामुळे मागोवा घेता येईल. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात जवळजवळ पंचावन्न वर्षं डोळसपणे वावरलेल्या यशवंतरावांची वैचारिक बैठक व विचारांची सखोलता विशद करणारं हे पुस्तक... भूमिका
-
Batamimagachi Batami (बातमीमागची बातमी)
हातात वृत्तपत्र घेतल्यानंतर सर्वप्रथम नजर जाते ती त्या दिवशीच्या ‘एक्सक्लुसिव्ह' बातमीकडे. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात, त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा ‘एक्सक्लुसिव्ह' बातम्या पत्रकार मिळवतो तरी कशा? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही ‘स्पेशल सोर्सेस'कडून मिळतात, काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने... थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते ! अशाच काही राजकीय, समाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं ‘एक्सक्लुसिव्ह' पुस्तक...‘बातमीमागची बातमी !'
-
Dhag (ढग)
‘ढग’ ही ‘चेटूक’ आणि ‘ऊन’नंतर त्रिधारेतील शेवटची कादंबरी. ‘चेटूक’मधून सामाजिक, ‘ऊन’मधून कौटुंबिक आणि ‘ढग’मधून व्यक्तिगत... अशा आत्मशोधक जाणिवांचा प्रवास हे ह्या त्रिधारेचं वैशिष्ट्य आहे. ‘मी कोण ?’ हा ‘ढग’चा काळीजप्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे निनाद काही माणसांच्या मनात कायम गुंजत असतात. पण जगण्याच्या झटापटीत त्याकडे दुर्लक्ष होतं. ढग ह्याच आद्य प्रश्नाशी झुंज देते. ती घेताना आठवणीचा पासवर्ड वापरून ती भूतकाळाच्या गुहेचं दार उघडते.
-
Oon (ऊन)
‘चेटूक’, ‘ऊन’ आणि ‘ढग’ ह्या त्रिधारेतील ‘ऊन’ ही दुसरी कादंबरी. स्त्री-पुरुष प्रेमातला संवाद विसंवादात रुपांतरीत झाल्यानंतर दिघ्यांच्या घराला घोर लागतो. पण रोजचं जगणं कोणाला चुकलं आहे? ते सर्वव्यापी उन्हात सुरूच राहतं. इथे भेटणारी बाया-माणसं आणि मुलं जगण्याच्या नादावर डोलत मोठी होतात. खूप काही कमावतात, खूप सारं गमावतात. राणी आणि वसंताची दोन्ही मुलं प्रकाश आणि विकास कौटुंबिक प्रेमाची ऊब कमावतात. ऊन या उबेचा लख्ख उत्सव आहे. संक्रमण काळात कौटुंबिक प्रेम हे मूल्यं टिकून राहावं ही ‘ऊन’ची आकांक्षा आहे.
-
Love In The Time Of Corona (लव्ह इन द टाइम ऑफ करोन
Neeraja Ganesh Matkari Shreekant Bojevar Hrushikesh Palande Pranav Sakhadev Pravin Dhopat Manaswi Lata Ravindra Paresh Jayshree Manoharएका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं... Standstill ! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशलडिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल! ८ लिहिते लेखक.... त्यांच्या खास ८ कथा... कथा नव्याने फुलणाऱ्या प्रेमाच्या... शेवटच्या भेटीच्या..... गावाकडच्या ओढीच्या.... साठीत गवसलेल्या प्रेमाच्या.... करोनाच्या पार्श्वभूमीवर `प्रेम' ही संकल्पना कवेत घेणाऱ्या कथांचा संग्रह... लव्ह इन द टाइम ऑफ करोना!
-
Hakamari (हाकामारी)
ती तीनदा हाका मारते आणि जो ओ देईल त्याला घेऊन निघून जाते! हो, खरंच हाकामारी असते! खरंच असते! त्या काळ्याकुट्ट रात्री... त्याला हाक मारणारी नक्की कोण होती? संध्या? निशा? की आणखी कोणी? नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधता येतील? की आयुष्यभर ते त्याला टोकरत राहतील? गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी!
-
Kaljugari (काळजुगारी)
काली स्वतःला आरशात पाहतो. कपाळाच्या मधोमध त्याला दिसतो जोकर! मरण्याआधी त्याच्या बाबानेच हा जोकर त्याच्या कपाळावर गोंदून जणू काही त्याच्या नशिबाचा रस्ता आखून ठेवलेला... आणि हा रस्ता जात होता कित्येक वर्षांनी होणाऱ्या काळजुगारी स्पर्धेत! जगाची व्यवस्था बदलण्याची संधी असलेल्या कालीचं नशीब या स्पर्धेत उजळेल की त्याच्या बाबासारखाच तोही नुसताच परत येईल? मराठी साहित्यातील रूपककथांच्या दालनात मोलाची भर घालणारी लघुकादंबरी – काळजुगारी!
-
Perfectchi Bai Foldingcha Purush (परफेक्टची बाई फो
‘मनापासून पतंग उडवणाऱ्या’वर ‘परफेक्ट बाई’चं प्रेम आहे खरं, पण ती त्याच्यासोबत जाईल की तिची सव्वीसावी गोष्ट अधुरीच राहील? समस्त स्त्रीजातीला समाधान देईल असा तीळ त्याला जन्मजात लाभला असला तरी वास्तवात खरोखरीच तिळा दार उघडचा मंत्र कामी येईल? पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करणाऱ्या दोन अनवट दीर्घकथा!
-
Zurangling (झुरांगलिंग)
टडंगऽऽऽ टडंगऽऽऽ मी आहे एक लेखकदेव... एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले...अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी... अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची... झुरांगलिंग !
-
Iti - Aadi (इति - आदि)
‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,' असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात.... या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात....''
-
Ha Ye Mumkin Hai ( हा ये मुमकिन है )
बिहारमधल्या दोन वर्षाच्या कामामुळे तरूचं(लेखिकेचं) आयुष्य तर उजळून निघालंच पण ती म्हणते प्रत्येक भारतीयाने समर्पित वृत्तीने निदान वर्षभर जरी सामाजिक काम करायचं ठरवलं तर आपल देश ख-या अर्थाने सुदृढ, विकसनशील होऊ शकतो. प्रत्येक भारतीयाला 'खरंखुरं 'सोनेरी स्वप्न दाखवणारं पुस्तक....