-
Chakra Te Chrkha
कृष्ण म्हणजे मूर्तिमंत करुणा आणि गांधीजी म्हणजे साक्षात साकारलेलं अद्भुत प्रेम! गांधीजींचे जीवन म्हणजे सत्य प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. कृष्णाचे जीवन म्हणजे सत्यप्राप्ती- नंतरचे आचरण आहे. धर्माची स्थापना हे कृष्णाचे जीवितध्येय होते; तर सत्याची प्राप्ती हे गांधीजींचे. ह्या दोघां असामान्य व्यक्तींच्या जीवनाचे अवलोकन करून झाल्यावर त्यांच्या कर्मांची मीमांसा केल्यानंतर ह्या दोघांचे उद्देश साध्य झाले, असे आपण म्हणू शकू का? ह्या प्रश्र्नाचे छातीठोकपणे होकारार्थी उत्तर देणे अवघड आहे. … आणि तरीही कृष्णाविना आणि गांधींविना आपल्या देशाचेच काय, सगळ्या जगाचेही; किंबहुना समग्र मानवजातीचेही चालले नाही! चालणार नाही. कृष्ण आणि गांधी ही अशी दोन प्रतीके आहेत की त्यांच्या स्पर्शाविना मानवजातीचा उद्धार होणे शक्य नाही. काळ पुढे जात राहिला आणि मधून मधून अशी प्रतीके मानवजातीला लाभत राहिली हे मानवजातीचे भाग्य होय! ज्या क्षणी मानवजात अशी प्रतीके निर्माण करण्याची क्षमता हरवून बसेल तो क्षण इतिहासाचा अंतिम क्षण असेल!
-
Baalkand
आघाडीचे कथाकार, कादंबरीकार, पत्रकार, संपादक. निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, काळेशार पाणी, सॉफ्टवेअर, मार्केट अशा त्यांच्या कादंबऱ्या जाणकार वाचकांच्या कौतुकाचा विषय झाल्या. अनेक कथांना मराठी वाचकांनी मनःपूर्वक दाद दिली. अनेक नियतकालिकांचे यशस्वी आणि कुशल संपादक म्हणूनही ते मराठी वाचकांना उत्तम प्रकारे ज्ञात आहेत. ‘किर्लोस्कर’, ‘स्त्री’, ‘घरदार’ ही मासिके, लोकप्रभा साप्ताहिक आणि नवशक्ती दैनिक ही त्यांनी संपादित केलेली नियतकालिके. ‘एक माणूस-एक दिवस’ या अभिनव व्यक्तिचित्रणात्मक लेखनप्रकाराचे आद्य जनकत्व त्यांच्याकडेच जाते. ‘बालकाण्ड’ ही आहे या लेखक, संपादकाच्या बालपणाची मन हेलावून सोडणारी कहाणी.
-
Swargangechya Tiri
हे आत्मचरित्र नाही. स्वतःचं चरित्र लिहिण्याइतकी पात्रता मी मिळवली आहे, असं प्रामाणिकपणे मला वाटत नाही. माझं जीवन सात स्वरांच्या आरोह-अवरोहांत व त्यांच्या आंदोलनांत सामावलं आहे. सुमारे 40 वर्षं स्वरगंगेच्या विशाल पात्रात व किनार्यावर मी मनसोक्त विहार केला. या काळात रसिकांचं जीवन आनंदनिर्मितीच्या द्वारे सुखमय करण्याचं सेवाव्रत मी कटाक्षानं पाळलं. त्यामुळेच स्वरगंगेत व तिच्या तीरी इतके प्रतिभासंपन्न व अलौकिक गुणिगंधर्व मला भेटले. त्यांची माझी ओळख झाली व जवळीक झाली. या सर्व सुखद स्मृतींची नोंद या पानांतून रसिकांना आढळेल.