-
Chhotya Anuchi Mothi Gosht (छोट्या अणूची मोठी गोष्ट)
मानवाच्या प्रगतीमध्ये अणूविषयक ज्ञानाचा विधायक वापर -पाणी, शेती, वैद्यक इत्यादी महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अणूमुळे झालेल्या क्रांतिकारक बदलाचा एक लहानसा आढावा या पुस्तकात घेतला गेला आहे. वेगवान प्रगती की वेगवान विध्वंस हे शेवटी माणसाच्या सद्-असद् वृत्तीवर अवलंबून आहे. विज्ञान हे शाप की वरदान? अशा चर्चा पूर्वी पुष्कळ चालत. विज्ञानाने मानवजातीवर खूपच उपकार केले आहेत आणि जगण्याचा स्तर सर्व दिशांनी उंचावला आहे. चुकांमधूनच माणूस शिकत जातो हे मानवाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याला अनुसरून अणुशक्तीचा वापर माणसाच्या कल्याणासाठी होईल अशी आशा करू या. छोट्या अणूची मोठी गोष्ट आपल्याला बुऱ्यावर मात करून भल्याची वाट दाखवणारी आहे.
-
School’s Out
‘I’m thinking,’ said Romi, ‘that even if the fire is out in a day or two, it will be a long time before the bridge is repaired. So it will be a nice long holiday from school!’ ‘But you can walk across the river,’ said Teju. ‘You just did it.’ ‘Impossible,’ said Romi. ‘It’s much too swift.’ There is a sense of anticipation in the air, increasing as the clock slowly ticks on, each second seeming to last forever. The teacher’s voice drones on in the background as you exchange another grin with your best friends, already planning your summer routine in detail in your head. And then the bell rings—that sweet sound of freedom—signalling that school is finally out! Revelling in the joy of this moment, School’s Out! brings together a collection of Ruskin Bond’s best children’s stories, the perfect summer vacation read. Journey through streets and tunnels and forests, on tongas and trains and bicycles, with friends old and new, and make the most of the holidays through the delightful style of the writer on the hill.
-
Shahid Bhagatsing (शाहिद भगतसिंग)
‘‘वीरजी, शाईची बाटलीये ना ही?’’ अमरकौरने विचारलं. ‘‘माती आहे ती!’’ ‘‘पण लाल दिसतेय’’ ‘‘हो, तिच्यात मिसळलेल्या रक्तामुळे. अमृतसरला जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या लोकांवर ब्रिटिशांनी गोळ्या झाडल्या. त्यांच्या रक्ताने सगळं मैदान लाल झालं होतं. त्या मैदानावरची माती आहे ही!’’ मग भगतसिंग आणि अमरकौर यांनी देशबांधवांचं रक्त मिसळलेल्या त्या मातीला कळ्या वाहिल्या. भगतसिंग मनातल्या मनात म्हणाला, ‘शपथ या मातीची! आम्हाला गुलामगिरीत जखडणार्यांना आम्ही इथून हाकलून लावू! जालियनवाला बागेतल्या शहिदांचं बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही!’ ही शपथ घेतली, तेव्हा भगतसिंग जेमतेम बारा वर्षांचा होता. आज आपल्याला घेता येणार्या प्रत्येक मोकळ्या श्वासासाठी अनेक लहान-मोठ्या, सामान्य-असामान्य भारतीयांनी फार मोठी किंमत मोजली आहे; स्वतःचं आयुष्य अक्षरशः पणाला लावलं आहे; जीव ओवाळून टाकला आहे. मात्र त्यांनी आपल्याला दिलेला हा वारसा केवळ हौतात्म्याचा नाही, तर मूल्यांचा आणि विचारीपणाचासुद्धा आहे, याची पक्की खूणगाठ आपण मनाशी बांधायला हवी.
-
JRD Tata (जेआरडी टाटा)
"‘जर घडणार्या गोष्टींकडे मानवी दृष्टीकोनातून पाहण्याची आपली तयारी असेल, तर इतरांनी घेतलेले निर्णय आपल्याला विपरीत वाटले, तरी ‘हाच निर्णय योग्य आहे’ या विश्वासातून इतरांनी ते घेतलेले असतात, हे आपण समजून घेऊ शकतो.’ हे उद्गार एरवी आपल्याला कुणा संताचे किंवा तत्त्वज्ञाचे किंवा एखाद्या शिक्षकाचे वाटले असते. पण हे उद्गार भारतातल्या एका महत्त्वाच्या उद्योगपतीचे आहेत. त्यांचं नाव - जेआरडी टाटा! जेआरडींच्या मृत्यूला आज ३१ वर्षं झाली, पण आजही टाटांच्या समूहाचा पाया त्यांनी घालून दिलेल्या तत्त्वांच्या आधारावर भक्कम उभा आहे. हा समूह देशातल्या... जगातल्या काही श्रीमंत समूहांपैकी एक आहे, पण समूह म्हणून असलेल्या त्यांच्या प्रतिमेत किंवा टाटांच्या कोणत्याही वागण्यात कुठेच बडेजाव नाही; देखावा नाही. ते कायम आपल्या कामासाठीच ओळखले जात राहिले. ‘उद्योजक’ या बिरुदाला जागणारी आणि त्याला स्वस्त न करणारी ही तत्त्वं येणार्या उद्योजकांना किंबहुना आपल्या सगळ्यांना नक्कीच वाट दाखवत राहतील!"
-
Samrat Ashok Karunamay Samajacha Udgata (सम्राट अशोक करुणामय समाजाचा उद्गाता)
नुकत्याच झालेल्या भीषण युद्धामुळे सगळंच उद्ध्वस्त झालंय... कलिंगदेशावर राज्य करणार्या नंद घराण्याचा पराभव झालाय... इथून थोड्याच अंतरावर असलेल्या तंबूतून चाळीसेक वर्षांचा एक इसम या सगळ्या संहाराकडे निराशेने बघतोय... गेले काही तास तो तंबूत नुसत्या येरझारा घालतोय... त्याचा पोशाख, त्याचा चेहरा, त्याच्या हालचाली कलिंगदेशाच्या हरलेल्या राजाला शोभतील अशा आहेत, मात्र त्याच्या तंबूवर युद्धात जिंकलेल्या मगध साम्राज्याचा ध्वज दिमाखात फडकतोय... त्याच्या आजूबाजूच्या तंबूंमध्ये तर उत्साहाचं वातावरण आहे. मग हाच इतका दुःखी का? हा नेमका आहे तरी कोण? जिंकण्यापलीकडची व्यर्थता बघणारा असा हा कोणता राजा आहे? - हा तोच आहे, ज्याला युद्धाने शांततेचं मोल शिकवलं. याचं नाव ‘सम्राट अशोक’! मगधाच्या मौर्य साम्राज्याचा हा सम्राट अशोक... आजपासून साधारण अडीच हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेला एक थोर राजा! ‘कलिंगाचं’ हे युद्ध अशोकाच्या गोष्टीची सुरुवातही नव्हती किंवा शेवटही नव्हता... ते होतं, त्याच्या आयुष्याच्या गोष्टीतलं एक वळण. पण या एकाच वळणाने राजेपणाला एक नवीन झळाळी दिली. म्हणूनच आज अडीच हजार वर्षांनंतरही अशोकाची गोष्ट फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात सांगितली जाते!
-
101 Fairy Tales
Open this book and step into a world of wonder—where stars sing, animals talk, and magic hides in the tiniest places. 101 Fairy Tales is filled with short, sweet stories that sparkle with kindness, courage, and fun. Perfect for bedtime or anytime you want to dream a little bigger.
-
101 Bedtime Stories
Curl up tight and let the night unfold – where fairies flit, owls gossip, and trees have stories to tell. 101 Bedtime Stories is a collection of tiny adventures, perfect for sleepyheads who love a bit of wonder before drifting off.
-
The Adventures Of Biplob The Bumblebee : Vol 10
Biplob the Bumblebee is an Eco warrior Superhero. Through entertaining short stories, he introduces children to concepts around sustainability, climate change and the environment.
-
The Adventures Of Biplob The Bumblebee : Vol 9
Biplob the Bumblebee is an Eco warrior Superhero. Through entertaining short stories, he introduces children to concepts around sustainability, climate change and the environment. Each Biplob the Bumblebee picture book contains 3 short stories, appropriate for 5+ year olds. The Adventures of Biplob the Bumblebee' series is the ideal gift to introduce a child to a beautiful world of nature. These stories help your child foster an understanding of climate change and the problems it's causing.