-
Kiss The Girls (किस द गर्ल्स)
लॉस एंजल्समध्ये खुनांच्या मालिकेचा तपास करणाऱ्या पत्रकाराची हत्या करण्यात आली. चपल हिल, नॉर्थ करोलीनमध्ये रुग्णालयातील सुंदर कनिष्ठ महिला डॉक्टर अचानक नाहीशी झाली. वाशिंग्टन मधील गुप्त पोलिस अलेक्स क्रॉस आतापर्यंतच्या सर्वात गुंतागुंतीच्या आणि भीषण खुनाच्या प्रकरणाची उकल करण्यासाठी परत आले. दोन अत्यंत हुशार आणि एका विशिष्ट पद्धतीने परस्परांशी सहकार्य करून, भागीदारी करून,स्पर्धा करून अमेरिकेच्या एका किनाऱ्यापासून कार्यरत असणारे असे ते दोन मारेकरी होते. ''हि कादंबरी वाचून पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवणे फार कठीण आहे. एखाद्या टायीम बॉम्बच्या टिक टिकी प्रमाणे त्यामधील घडामोडी तीव्र,चित्त थरारक,आणि धोका यांनी परिपूर्ण आहेत.