-
Ganimi Kava (गनिमी कावा )
मराठ्यांच्या या युद्धतंत्राची प्रेरणा घेऊन हिंदुस्थानात १८५७ चा उठाव झाला जगातील ४२ गुलाम राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा आणि ताकद या शिवतंत्राने दिली. शिवतंत्राचा उपयोग करून जी राष्ट्रे स्वतंत्र झाली त्यामध्ये क्युबा, व्हिएतनाम, जर्मनी, जपान अगदी शेजारील बांगलादेशही आहे. व्हिएतनामचे गुरिल्ला वार, जर्मनीची ब्लीट्स क्रिग, जपानची छापामारी, माओत्सोतुंगचा स्वातंत्र्य लढा ही सर्व शिवछत्रपतींची गनिमी काव्याची आधुनिक रूपे. म्हणून खऱ्या अर्थाने मराठ्यांचे युद्धतंत्र जागतिक कीर्तीचे आहे. या देशातील क्रांतीकाराकांनी जेव्हा सशस्त्र क्रांतीचा लढा उभारायचे ठरविले तेव्हा त्यांच्या समोर एकच नाव, एकच प्रदेश आणि एकच युद्धतंत्र होते. ते म्हणजे शिवशंभू छत्रपती, महाराष्ट्र आणि मराठ्यांचा गनिमी कावा. शंभूराजांच्या २०० व्या जयंतीचे (१४ मे १६५७) अवचीत्य साधून या देशातील क्रांतिकारकांनी पहिला उठाव केला. तो म्हणजे १८५७ चा राष्ट्रीय उठाव. आणि हाच गनिमी काव्याचा वणवा पेटता ठेवून आझाद हिंद फौज आणि इतर संघटनांनी मिळून पुढील नव्वद वर्षात हा देश स्वतंत्र केला आणि म्हणून या देशाच्या स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान आणि यशस्थान जर काय असेल तर तो मराठ्यांचा गनिमी कावाच. आता याच गनिमी कावा युद्धतंत्राचा उपयोग जगातील प्रगत ३५ राष्ट्रांमध्ये केला जातो. आपण या शिवतंत्राचा उपयोग आजही आपल्या देशाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी निश्चित करू शकतो.
-
Panipatcha Vijay (पानिपतचा विजय)
विदेशी आक्रमकांना कायमचा धडा शिकविणाऱ्या महायुद्धाचा खरा वेध या युद्धात जसे मराठ्यांचे नुकसान झाले तसेच मोठ्या प्रमाणावर अब्दालीचेही झाले. विजय म्हणावा तसा अब्दालीला या युद्धातून ना पैसा मिळाला, ना मुलुख, ना एखादी सत्ता. मग विजय तो कसला आणि कशाचा? या युद्धातून मराठ्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागल्याचे क्षणिक चित्र दिसते तर दुरगामी दृष्टिकोनातून पाहिले तर मोठा दीर्घकालीन निर्णायक विजय मराठ्यांनी या युद्धात नोंदवला. या युद्धानंतर ३५ वर्षे दिल्लीवर भगवा फडकला. मराठ्यांचा या पार्थ पराक्रमामुळे पंजाबातील शिखांनाही परकीय आक्रामकांविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळाली. स्वातंत्र्यासाठी अनेक दशके लढणाऱ्या शिखांच्या स्वातंत्र्याची पायरी मराठ्यांनी बसविली हे विसरून कसे चालेल. अब्दाली स्वतःच्या अटीवर नव्हे तर मराठ्यांना हवा तसा तह करून या प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू इच्छित होता ते याच कारणामुळे. मराठ्यांनी अब्दालीला दिलेला तडाखा एवढा जबरदस्त होता की खुद्द अफगाणिस्थानात अब्दाली जिवंत राहील का? असा प्रश्न लोकांना पडला. कांदाहारात अनेक प्रकारच्या बातम्या पसरू लागल्या. त्यात अब्दालीचा दारूण पराभव झाल्याची बातमी सराव मोठी होती. आता हिंदुस्थानात तर काही मिळाले नव्हते. आणी तिकडे दोन वर्षे अब्दाली भारतातच अडकल्यामुळे त्याच्या प्रभावाची बातमी तिकडे पोहोचल्यामुळे तिथले तख्तही बुडण्याच्या भीतीने अब्दालीला पाळणे भागच होते, तो जिवंत राहिला होता हेच त्याचे नशीब आणि हाही इतिहास जाणून होता की सिकंदर सारख्या जगजेत्याला हिंदुस्थानातील लोकांनी तांगडून मारला होता आणि बेबीलोनला तो जिवंत पोहचू दिला नव्हता. आपलाही मराठे सिकंदर करतील या भीतीने गाळण उडालेल्या अब्दालीने असेल तशा परिस्थितीत मोकळ्या हातांनी खिन्नावस्थेत हिंदुस्थान सोडला.
-
Shivaji The Mangement Guru (शिवाजी द मॅनेजमेंट गुर
हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय याची सखोल माहिती देतं.हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापनाची चौदा तत्वे, रत्ने याची माहिती देऊन जगातील सर्वात यशस्वी व्यवस्थापकाने कोणती कामे केलि पाहिजेत याची माहिती देतं.व्यवस्थापनाची साड़ी आवश्यक कौशल्या आणि नियोजन कसे करावे याबाबत हे पुस्तक माहिती देत. नियोजनाचे टप्पे आणि निर्णय प्रक्रिया यावर हे पुस्तक प्रकाश टाकते.आयुष्यात प्रत्येकाला निर्णय हां घ्यावाच लागतो. तेंव्हा अचूक निर्णय कसा घावा हे तुम्हाला शिकायला मिळेल. जग जिंकायचे टार तुम्हाला नेतृत्व हे करावंच लागत येंव्हा नेतृत्व म्हणजे के? नेतृत्वाचे यशस्वी पैलू कोणते आणि ते कसे आत्मसाद करावे याचे मार्गदर्शन तुम्हाला या पुस्तकातून मिळेल. लोकांना कोणत्या प्रकारच्या प्रेरणा दिल्या म्हणजे लोक तुमच्या भोवती गोळा होतात आणि ते कसे हाताळले जातात याची माहिती मिलते. जगावेगली प्रेरणादायी उदहारणे या पुस्तकातून तुम्हाला मिलातिल आणि एक यशस्वी उद्योजक, व्यवस्थापक किंवा नेता म्हणून तुमचं आयुष्य घडविण्यासाठी हे पुस्तक तत्पर असल्याचे प्रथमदर्शानिचे तुम्हाला कळुन येइल. आयुष्याला दिशा देणारे हे पुस्तक एकदा नाहीतर अनेक वेळा वाचुन काढावे आणि अंमलात आणावे असेच आहे. तुम्ही एक महत्वकांक्षी व्यक्ति आहात. जग जिंकण्याची तुमची मानसिकता आहे म्हनुनच तुम्ही हे पुस्तक पाहता क्षणीच खरेदी केलेलं आहे. चल टार आता ते वाचु आत्मसात करू आणि जग जिंकुया.
-
Shivray:Bhag 1 (शिवराय (भाग १ )
छत्रपती महाराजांचा लढायांव्यतिरिक्त खरा इतिहास
-
Shivray:Bhag 3 (शिवराय:भाग ३)
हे आहे स्वराज्याची राजधानी रायागादावारिल जगदीश्वर मंदिर. याला चारही बाजूंनी मशिदिप्रमाने मिनार असून दरवाज्यावर जाळी कोरलेली आहे. मंदिर मशीद ही दोन्ही एकच ठेउन महाराजांनी ईश्वर एक असल्याचं रयतेला जे शिकवलं त्यांचं जिवंत प्रतिक. प्रतिगामी मंत्रिमंडळाने बहुमताने विरोध करूनही महाराजांनी हे जगादिश्वर मंदिर बांधले. अपेक्षा हीच की आम्हीही असेच चंद्र-सूर्य असेपर्यंत गुण्या गोविंदाने नांदावे! शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात एकाही किल्ल्यावरील एकहि मशिद किंवा दर्गा पाडला नाही उलट त्यांची व्यवस्था जावी याची काळजी घेतली. महाराजांनी निर्माण केलेल्या या उदार तत्वाचं आणि जातीय सलोख्याचं रक्षण कारण आपलं कर्त्तव्य आहे.
-
khara sambhaji (खरा संभाजी)
जगातील पहिले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भूमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा आदिलशाही, कुतुबशाहीची एकजूट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी, पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडून ठेवणारा , त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून डोंगर पोखरून जल नियोजन करणारा उत्तरप्रदेशापासून दूर तामिळनाडू कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा इतर धर्मांचा मान सन्मान राखणारा धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा बाल मजुरी व वेठबिगारी विरुद्ध कायदा करणारा शिवप्रभूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दूर मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूरवर छापा घालणारा स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा देहू ते पंढरपूर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणून चरईची सवलत कायम ठेवणारा आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करून स्वदेशीचा महामंत्र देणारा खरा संभाजी....