Panipatcha Vijay (पानिपतचा विजय)

By (author) Namdevrao Jadhav Publisher Rajmata Publication

विदेशी आक्रमकांना कायमचा धडा शिकविणाऱ्या महायुद्धाचा खरा वेध या युद्धात जसे मराठ्यांचे नुकसान झाले तसेच मोठ्या प्रमाणावर अब्दालीचेही झाले. विजय म्हणावा तसा अब्दालीला या युद्धातून ना पैसा मिळाला, ना मुलुख, ना एखादी सत्ता. मग विजय तो कसला आणि कशाचा? या युद्धातून मराठ्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागल्याचे क्षणिक चित्र दिसते तर दुरगामी दृष्टिकोनातून पाहिले तर मोठा दीर्घकालीन निर्णायक विजय मराठ्यांनी या युद्धात नोंदवला. या युद्धानंतर ३५ वर्षे दिल्लीवर भगवा फडकला. मराठ्यांचा या पार्थ पराक्रमामुळे पंजाबातील शिखांनाही परकीय आक्रामकांविरुद्ध उभे राहण्याची ताकद मिळाली. स्वातंत्र्यासाठी अनेक दशके लढणाऱ्या शिखांच्या स्वातंत्र्याची पायरी मराठ्यांनी बसविली हे विसरून कसे चालेल. अब्दाली स्वतःच्या अटीवर नव्हे तर मराठ्यांना हवा तसा तह करून या प्रसंगातून सही सलामत बाहेर पडू इच्छित होता ते याच कारणामुळे. मराठ्यांनी अब्दालीला दिलेला तडाखा एवढा जबरदस्त होता की खुद्द अफगाणिस्थानात अब्दाली जिवंत राहील का? असा प्रश्न लोकांना पडला. कांदाहारात अनेक प्रकारच्या बातम्या पसरू लागल्या. त्यात अब्दालीचा दारूण पराभव झाल्याची बातमी सराव मोठी होती. आता हिंदुस्थानात तर काही मिळाले नव्हते. आणी तिकडे दोन वर्षे अब्दाली भारतातच अडकल्यामुळे त्याच्या प्रभावाची बातमी तिकडे पोहोचल्यामुळे तिथले तख्तही बुडण्याच्या भीतीने अब्दालीला पाळणे भागच होते, तो जिवंत राहिला होता हेच त्याचे नशीब आणि हाही इतिहास जाणून होता की सिकंदर सारख्या जगजेत्याला हिंदुस्थानातील लोकांनी तांगडून मारला होता आणि बेबीलोनला तो जिवंत पोहचू दिला नव्हता. आपलाही मराठे सिकंदर करतील या भीतीने गाळण उडालेल्या अब्दालीने असेल तशा परिस्थितीत मोकळ्या हातांनी खिन्नावस्थेत हिंदुस्थान सोडला.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category