-
My Encounters In Parliment
Dr. Bhalchandra Mungekar was a nomineted member of the rajya sabha for a full term during my tenure as chairman, rajya sabha. from that vantage point, i had a good opportunity to know him and observe his work as a member of the house. The sppeches included in this volume are reflective of his interests. His insights into issue of primary and higher education. of budgetary matters in relation to the sectoral, regional and social dimensions of poverty and inclusive growth of the entire gamut of constitutional issues relating to the historically deprived segments in our society, are worthy of notes. His speeches shed light both on the achievements and the failure of our society and are candid in their commentary. - M. Hamid Ansari ( Former Chairman, Rajya Sabha)
-
Mi HIndu Stri Ka Nahi : Majha Ladha, Majhi Kahani (मी हिंदू स्त्री का नाही : माझा लढा, माझी कहाणी)
वंदना सोनाळकर या स्त्रीवादी अभ्यासक आणि कार्यकर्त्या आहेत. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकाद्वारे त्यांनी राजकीय हिंदुत्व आणि व्यापक हिंदू धर्म या दोहोंची चिकित्सा करताना एक स्त्री, त्यातही महाराष्ट्रातील उच्चजातीय स्त्री म्हणून जन्माला येऊनसुद्धा स्वतःची धार्मिक ओळख आपण का नाकारली, याची तर्कसंगत अशी मांडणीही केली आहे. वैयक्तिक अनुभव तसेच लिखित आणि अनुभवजन्य पुराव्याआधारे त्यांनी या पुस्तकात जातकेंद्री परंपरा आणि व्यवहारांचे समीप दर्शन घडवले आहे. तसे ते घडवताना पुसरुषसत्ताक व्यवस्था आणि ब्राह्मणवाद हे हिंदुधर्माचे व्यवच्छेदक लक्षण असल्याचा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. त्यांच्या मते, ही व्यवस्था आणि त्याआधारे प्रभाव राखत आलेला ब्राह्मणवादी धर्म मुळातूनच जातभेदी आणि स्त्रीद्वेष्टा राहिला आहे. ब्राह्मणवादी धर्माने लादलेले नियम आणि आज्ञा या दोन्ही गोष्टी प्रथा-परंपरांचे पालन करण्याकामी तसेच राजकीय हिंदुत्वाच्या विस्तारासाठी आवश्यक ठरत आले आहेत. याच रुढीकेंद्री रिवाजांचे पुढे जाऊन मुस्लिमांवरही आक्रमण होत आले आहे. वंदना सोनाळकर या पुस्तकाद्वारे हेदेखील जोरकसपणे सांगितले आहे की, भेदभाव आणि विषमता ही दोन वैगुण्ये हिंदू धर्मात अशा रीतीने आत्मसात झालेली आहेत, ज्यायोगे दैनंदिन परस्परव्यव्हारात या वैगुण्यांचे नकळत पालनही होत आले आहे आणि त्यास मान्यता मिळून ही वैगुण्ये समाजात खोलवर मुरलेलीसुद्धा आहेत.
-
Muldravyanchya Jadui Duniyet (मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत)
हेमंत साने यांचे ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत!’ हे पुस्तक खरोखरच ज्ञानाचा एक उजळ दीपस्तंभ आहे. ११८ मूलद्रव्यांची माहिती एवढ्या सोप्या, प्रवाही आणि रसास्वादक मराठीत देऊन त्यांनी विज्ञानाला सामान्यांच्या दारी नेले आहे. शास्त्रीय अचूकता, सुस्पष्ट मांडणी आणि उपयुक्त परिशिष्टांमुळे हे पुस्तक विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे, विज्ञानप्रेमी आणि सर्वसाधारण वाचक—सर्वांसाठीच अमूल्य ठरते. विज्ञानाची गुंतागुंत सहजतेने उलगडून दाखवण्याची ही खरोखरच प्रेरणादायी किमया आहे. - पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर
-
Jahannam - Pratima Joshi Yanchya Nivadak Katha (जहन्नम : प्रतिमा जोशी यांच्या निवडक कथा)
मराठी साहित्याच्या वर्तुळात पत्रकार- साहित्यिक ही काही नवलाची गोष्ट नाही. प्रतिमा जोशी याही आपल्याला पत्रकार म्हणून परिचित आहेत. विशेषतः त्यांच्या वार्तापत्रांत असलेला परिघावर जगणाऱ्या माणसाविषयीचा आपुलकीचा स्वर आपल्याला ओळखीचा आहे. पण हा आपुलकीचा स्वर भावविवश होत नाही, कारण प्रतिमा जोशी यांना व्यवस्था आणि व्यवस्थाबदलाची कणखर वास्तवता परिचित आहे. प्रतिमा जोशींच्या कथेकडे पाहताना जाणवणारे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातल्या निवेदकाचा ननैतिक दृष्टिकोन! त्यांच्या कथेतील निवेदक समाजमान्य नैतिकतेचे मापदंड मानीत नाही पण त्याहीपलीकडची माणसामाणसातील गाभ्याची नैतिकता त्यांच्या निवेदनातून व्यक्त होते. एखाद्या वादाची छत्री मिरवत माणसाच्या वागणुकीचा योग्य-अयोग्य न्याय करण्याची भूमिका या कथांत नाही. तरीही माणूस माणसाला किती विविध तन्हांनी छोटा करतो याविषयीची जाणीव या कथांतून व्यक्त होते. या सर्वच कथांत लेखिकेने वातावरण, पात्रधर्म यांच्याशी भाषेचे रूप मिळतेजुळते राखले आहे. स्त्री कथाकारांच्या आत्ममग्न विमनस्कतेपेक्षा या कथांचे रूप वेगळे आहे.
-
Aadvatechi Pustak (आडवाटेची पुस्तके)
Aadwatechi Pustak । आडवाटेची पुस्तकं,Nikhilesh Chitre | निखिलेश चित्रे,Marathi Book
-
Fractured Freedom (फ्रॅक्चर्ड फ्रीडम)
फ्रॅक्चर्ड फ्रीडम हे पुस्तक या प्रामाणिक माणसाने आणि त्याच्या जोडीदाराने, अनुराधाने, एक कठीण ध्येय समोर ठेवून केलेल्या वाटचालीबद्दल आहे. उपेक्षितांसाठी काम करण्याकरिता आयुष्य वेचलेल्या, आणि एका अधिक मानवी, अधिक न्याय्य समाजासाठी थेट कृती आवश्यक आहे असे मानणाऱ्या या दोन लोकांची ही कहाणी आहे. गत आयुष्यातील काही आठवणी, काही तुरुंगातील अनुभव सांगताना गांधी यांनी त्यांचे आयुष्य, प्रेम, गमावलेल्या गोष्टी, राजकारण अशा एकात एक गुंतलेल्या सगळ्या गोष्टींकडे मागे वळून पाहिले आहे. दहा वर्षे भारतातल्या विविध तुरुंगांमध्ये शारीरिक त्रास सोसावे लागलेल्या कोबाड यांनी त्यांच्या या दीर्घ तुरुंगवासाबद्दल, त्यांच्याबरोबर तुरुंगात असलेल्या कैद्यांबद्दल, काफ्काच्या काल्पनिक जगातले वाटावेत अशा भारतीय कायदा व्यवस्थेच्या अनुभवांबद्दल लिहिले आहे. एक अन्याय्य व्यवस्था एका शूर, धैर्यवान माणसालाही कशी दुबळी बनवते त्याचे हे प्रामाणिक आणि आडपडदा न ठेवता लिहिलेले वर्णन यात आहे. ही कहाणी आहे दोन टोकांवरच्या अनुभवांची – उच्चभ्रू जगातल्या संपन्नतेची, आणि आत्यंतिक निराशेची. आपल्या काळातल्या विविध घडामोडींची, आणि बहुसंख्य लोक ज्याच्यापासून दूरच राहतील अशा एका जीवनमार्गाची!
-
Culture can Kill
Why do certain societies advance and others fall behind? Why did a European discover India rather than an Indian discovering Europe? Taking India as a specific example, this book affirms that Culture Counts. Some beliefs, though helpful in personal life, can have disastrous long-term consequences on groups. Many popular beliefs blocked India's progress. They still do. This book spells them out. Divided into four sections, in a stepwise exposition, it defines India's Disease, describes Symptoms, analyzes Causes and suggests Remedies. Environment, economics, fate, foreigners, sins or genes did not cause the downfall of this once magnificent civilization into depths of destitution today and despair in the face of foreign aggressions in the past. India's much vaunted culture---beliefs, values, goals, attitudes---killed her. Surprised? Shocked? As they always say, the devil is in the detail. Can we Indians reverse the course of history? Yes. We must shed our vanity in our distant hazy past. Fleeting localized successes should not blind us to the grim realities of everyday life in India today. We must transform our culture and religion from a theoretical, pessimistic, defeatist philosophy to a positive, forward looking, action-based outfit. We must modernize our minds genuinely, not just cosmetically. This book elucidates this unconventional, basically rationalist, approach. It examines in laser light everyday problems that educated Indians casually discuss in their drawing rooms, arrive at a dead end and disperse without direction. Intellectually robust, boldly challenging, freshly innovative, this book revisits ancient assumptions and myths believed in by a billion people---nuclear armed, shooting for the moon and starving in the streets. And in the process, it illuminates the way to a brave new world of the future for an ancient culture desperately struggling to emerge into modernity.
-
Vishwache Arta (विश्वाचे आर्त)
पर्यावरण हा तसा आपल्या सर्वाच्याच जगण्याला वेढून असलेला विषय, तरीही आपण पर्यावरणाच्या संदर्भात कमालीचे गाफील आणि बेफिकीर असतो. पाणी, जमीन, जंगल अशा सर्वच घटकांबाबत असलेली आपली बेपर्वाई एक दिवस आपला कडेलोट करणार, असे आपण वारंवार वाचतो, ऐकतो, तरीही याबाबत आपण किंचितही गंभीर नसतो. सर्वच पातळ्यांवर दिसून येणारी ही अनास्था हा अतुल देऊळगावकर यांच्या 'विश्वाचे आर्त' या पुस्तकाचा गाभा आहे. पर्यावरण ही बाब केवळ नैसर्गिक नाही तर त्यात बेमालूमपणे सामाजिक आणि राजकीय रंगही मिसळले आहेत, हे साधार दाखवून देतानाच सध्या जैवविविधता जपणारे व नष्ट करणारे यांच्यातल्या संघर्षांचे अनेक पैलू देऊळगावकर उलगडतात. अभ्यासकांच्या अहवालापासून ते समकालीन साहित्य, चित्रपट, छायाचित्रे अशा विपुल संदर्भासह त्यांनी हा विषय मांडला आहे. तरीही केवळ संदर्भ किंवा आकडेवारीत हे पुस्तक गुरफटले नाही तर सुरुवातीपासून शेवटापर्यंत ते आपल्याला भानावर आणण्याचे काम करते. प्रश्नांची उकल, दुसरी बाजू आणि उपाय अशा पातळ्यांवर विषयाचा धांडोळा घेत असतानाच आपल्यातल्या विवेकबुद्धीला आवाहन करण्याचे काम करते.