-
Karmayog (कर्मयोग)
जीवनात श्वास जसा महत्वाचा,तशी परमपिता परमात्म्याची ओळख महत्वाची आहे. सर्व व्यवहार त्याच्या साक्षीनेच झाले पाहिजेत. सर्व व्यवहारात त्याचा आशीर्वाद पाहिजे,त्याशिवाय कोणत्याही कार्यात यश संभवणार नाही. मानवी जीवनात यश हि अत्यंत महत्वाची बाब आहे. यशप्राप्तीसाठी मेहनत हा एकच सर्वोत्तम मार्ग आहे. मेहनत फलदायी होत असते,अन्य मार्ग फलदायी असतीलच असे नाही. मेहनतीच्या मार्गातून मिळणारे यश फसवे, क्षणिक किंवा मृगजळाप्रमाणे भूलभुलैय्या असते. जे शेवटपर्यंत टिकणार नाही,ते त्याच्या अस्तानंतर आपणास त्रासदायक ठरते, आणि त्रासदायक ठरणारे मिळण्यापेक्षा न मिळणे बरे,असे शेवटी वाटते. मिळून पश्चाताप होण्यापेक्षा न मिळता झालेला पश्चाताप कमी त्रासदायक असतो.
-
21 Divsat Yash Tumchya Darat (२१ दिवसात यश तुमच्या
जीवनात यश मिळविण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. यशस्वी आयुष्य हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण यशस्वी होण्यासाठी स्वकष्टाने, परिश्रमाने, स्वबुद्धीने, स्व-गुणांचा उपयोग करून अपेक्षित ध्येय गाठावे लागते. यशप्राप्तीसाठी काय करावे, याचे धडे रणजित यांनी '२१ दिवसांत यश तुमच्या दारात'मधून दिले आहेत. पहिला दिवसाचा धडा हा स्वयंशिस्तीचा आहे. हा प्राथमिक गुण आत्मसात केल्यावर वेळेचे नियोजन, आरमाला सुटी देऊन अथक परिश्रमांची तयारी, सयंम, नियंत्रण सकारात्मक विचार अंगी वाणवून उद्दिष्ट निवडून त्याकडे वाटचाल करावी. आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या माणसांचे अवलोकन करून त्यांच्या आवडणाऱ्या व खटकणाऱ्या गोष्टींची नोंद करणे, योग्य गुरुचे मार्गदर्शन, हे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ठरते. अशा तऱ्हेने २१ दिवसांत यशाला गवसणी घालता येते, हे लेखकाने सांगीतले आहे.
-
Rangresha ( रंगरेषा )
या कादंबरीचा ' महाराज ' हा नायक शिवमंदिराच्या बाजूला हिरवळीवर , एका झाडाखाली बसून आपल्याला निसर्गतः प्राप्त झालेल्या सिद्धीने कस लोकांच्या निकडीच्या अडचणी , समस्या , संकट यांचं निराकरण करतो ते प्रत्यक्ष वाचण्यासारख! सगळच अघटीत ! अद्वितीय !