21 Divsat Yash Tumchya Darat (२१ दिवसात यश तुमच्या

By (author) Ranjeet Publisher Arvind Prakashan

जीवनात यश मिळविण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. यशस्वी आयुष्य हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण यशस्वी होण्यासाठी स्वकष्टाने, परिश्रमाने, स्वबुद्धीने, स्व-गुणांचा उपयोग करून अपेक्षित ध्येय गाठावे लागते. यशप्राप्तीसाठी काय करावे, याचे धडे रणजित यांनी '२१ दिवसांत यश तुमच्या दारात'मधून दिले आहेत. पहिला दिवसाचा धडा हा स्वयंशिस्तीचा आहे. हा प्राथमिक गुण आत्मसात केल्यावर वेळेचे नियोजन, आरमाला सुटी देऊन अथक परिश्रमांची तयारी, सयंम, नियंत्रण सकारात्मक विचार अंगी वाणवून उद्दिष्ट निवडून त्याकडे वाटचाल करावी. आपल्या अवतीभवती दिसणाऱ्या माणसांचे अवलोकन करून त्यांच्या आवडणाऱ्या व खटकणाऱ्या गोष्टींची नोंद करणे, योग्य गुरुचे मार्गदर्शन, हे ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ठरते. अशा तऱ्हेने २१ दिवसांत यशाला गवसणी घालता येते, हे लेखकाने सांगीतले आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category