-
Song Of The Day (साँग ऑफ द डे )
मनातल्या मनात लिंबू पीळून देखील तोंडाला पाणी सुटतावं तसं एखाद गाणं ऐकताच मेंदूत आठवणींचा एक चित्रपट सुरु होतो. आणि मग श्वास घ्यावा पण तो समजू नये, इतक्या सहजपणे आपण ते गाणं अख्खा दिवस गुणगुणत राहतो. आपण दिवसभर आनंदी का होतो हेही विसरायला लावणारं - साँग ऑफ द डे!
-
Zhanzhavat (झंझावात )
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नातील स्वराज्य प्रत्यक्षात आणून महाराष्ट्रातील आणि परप्रांतातील जनतेला जाणीव करून दिली की मनात आणले तर आपण आपले स्वतःचे राज्य स्थापन करू शकतो आणि ते उकृष्टरित्या चालवूही शकतो. मराठ्यांनी महाराष्ट्र बाहेर गाजवलेल्या समशेरीची यशोगाथा . निनाद बेडेकर यांच्या शब्दात मरठी वादळवाऱ्याची ही कहाणी.....झंझावत !!!
-
Kahitari Navin (काहीतरी नवीन )
या लेखांतून अनेक विषय ओघाने येतात. परस्पर नातेसंबध, प्रेम, सौंदर्या, निसर्ग, मूत्यू, मैत्री, संगीत, काव्य, सामाजिक भान … कधी तुम्ही अस्वस्थ व्हाल, कधी गहिववराल, कधी गालातल्या, गालात हसाल तर कुणीतरी तुमच्याच टपलीत मारल्याचा भास होईल. वाचनात तुम्हाला आनंद मिळत असेल, तर। हे पुस्तक म्हणजे तुमच्या हाती लागलेलंच आनंदचं घबाड आहे.
-
Shrutigeeta (श्रुतिगीता )
भारतीय संगीतातील २२ श्रुती या अत्यंत गहन विषयाचे सोपे काव्यासहित सार्थ विवेचन या पुस्तकात आहे, ज्यामुळे २२ श्रुती स्वतः वाजवणे, गाणे व समजणे सर्वाना शक्य होईल २२ श्रुतींची तारेवरची अंतरे, त्यामागील गणित, त्या सिंथसायझरवर कशा वाजवता येतात, त्यांची पश्चिमात्य नावे व कंपनसंख्या, ८० हिंदुस्तानी रागातील चढ्या /उतर्या श्रुती कर्नाटक संगीताची ७२ थांटाच्या रचनेसहित तोंडओळख, भारत मुनींचे नाट्यशास्त्रातील श्रुतिविचार इ. विस्तृत माहिती या पुस्तकात मिळेल.