Peshavai Maharashtrachya Itihasatil Ek Suvarnpan ( पेशवाई महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान)
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान असलेल्या पेशवाईचा प्रवास कौस्तुभ कस्तुरे यांनी या पुस्तकात मांडला आहे. 'पेशवाईतले अत्यंत गौरवाचे, अभिमानाचे आणि राष्ट्राला अत्यंत उपयोगी असे घडले, ते अभ्यासपूर्ण पद्धतीने इतिहासपंडितांनी सविस्तर सांगयला हवे,' अशी गरज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली आहे. हाच धागा कस्तुरे यांच्या या पुस्तकात दिसतो. पेशवाईतील पराक्रम, मुत्सद्देगिरी त्यातून दिसते. पेशव्यांच्या लढाया, व्यूहरचना अद्वितीय अश्या होत्या. त्याचे वर्णन पुस्तकात आले आहे. बाळाजी विश्वनाथ भट यांच्यापासून सूरु झालेला हा प्रवास पेशवाईच्या अस्तापर्यंत येऊन पोहोचतो. या पुस्तकामुळे पेशवाईसंबंधात पसरलेले अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होते. पुस्तकात मोडी लिपीत उपलब्ध कागदपत्रे, छत्रपती व पेशवे यांच्या मुद्रा आदींचाही समावेश आहे.