-
Breakup (ब्रेकअप)
ब्रेकअप या नावावरून ही कादंबरी एक प्रेमकथा आहे, हे कळते. पण ही स्त्री-पुरुष नात्यावर आधारित कथा नसून, प्रेमाचे एक जरा वेगळे आणि अनोळखी रूप या कथेतून दाखवले आहे. कथेतील मुख्य पात्र एक गायक असल्यामुळे कथेला संगीताची पार्श्वभूमी आहे. पण हे ब्रेकअप नेमके कोणाचे कोणाशी, हे कोडे मात्र वाचकांना कादंबरी वाचताना उलगडेल.
-
Balakanche Aarogya Ani Aayurved (बालकांचे आरोग्य आणि आयुर्वेद)
आयुर्वेदाच्या सिद्धांतांवर आधारित असे हे पुस्तक लिहिताना आजच्या काळातील संदर्भही आम्ही जागोजागी घेतले आहेत. जेणेकरून या पुस्तकाला एक Practical handbook चे स्वरूप यावे. हे करताना तत्व आणि व्यवहार यांची उत्तम सांगड घालण्याचा आम्ही पदोपदी प्रयत्न केला आहे हे आपल्याला पुस्तक वाचताना लक्षात येईलच.
-
Sahi Re Sahi (सही रे सही)
'सही रे सही' आणि 'नीरू आणि नेहा' असे माझे दोन बालकथासंग्रह पुण्याच्या उत्कर्ष प्रकाशनाने प्रसिद्ध केले, त्याला बरीच वर्षे झाली. पुस्तकं छोटीछोटी असली तरी त्यांना बालवाचकांकडून मोठी दाद मिळत असे. काळाबरोबर त्यांची मांडणी, बाह्य रूपडं वगैरे सगळंच काहीसं जुनं झाल्याने येथे मी ती पुस्तकं एकत्र करून नव्या आकर्षक स्वरुपामध्ये बालवाचकांसमोर सादर करत आहे. करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे ॥ असं सानेगुरुजी म्हणत असत. त्यांच्या एवढा माझा अधिकार नाही. मुलांचं मनोरंजन करणं हे किती गरजेचं आहे आणि किती आव्हानात्मक आहे, हे मात्र मलाही सतत जाणवत राहिलेलं आहे. त्या दृष्टीने ह्या कथासंग्रहातल्या कथा मुलांना कशा आवडतात, कुठे खटकतात, कुठे सुधारणेला वाव आहे ह्यासंबंधी प्रतिक्रिया मिळाल्यास मला आनंदच वाटेल. ह्या रूपाने पुन्हा बालवाचकांसमोर येण्याची संधी मला देणाऱ्या नावीन्य प्रकाशनाची मी ऋणी आहे. 'सही रे सही' वाचतांना एखाद्या वाचकाची 'सही रे ! एकदम सही' अशी प्रतिक्रिया आली तर मी तिलाच खरी पावती मानेन. ह्यासाठी सर्व बालवाचकांचं स्वागत व सर्वांना शुभेच्छा ! --- मंगला गोडबोले
-
Mazi ED Chukashi (माझी ईडी चौकशी)
सुनील पांडे हे बहुआयामी आणि बहुप्रसव लेखक आहेत. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ही सर्व पुस्तके भिन्न- भिन्न आकृतीबंधाची आहेत. तथापि, सर्व पुस्तकांमध्ये वाङमयीन गुणांची पखरण आहे. 'माझी ईडी चौकशी' हा त्यांच्या चार विनोदी कथासंग्रहापैकी एक आहे. हेच शीर्षक असलेली कथा ह्या संग्रहात प्रथम आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या देशात 'ईडी'ची प्रचंड चर्चा आहे, 'ईडी' धास्ती विशिष्ट वर्गात आहे, त्यामुळे शीर्षकापासूनच वाचकाच्या मनात कुतूहल निर्माण होते, पण कथा वाचून संपताच मन प्रसन्न होऊन जाते. ही अनुभूती सर्वच कथावाचून झाल्यावर येते. मराठीत श्री. कृ. कोल्हटकर, चिं. वि. जोशी, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, वि. आ. बुवा इत्यादी थोर लेखकांनी विनोदी लेखनाचा मानदंड निर्माण केलेला आहे. सुनील पांडे हे आपल्या कसदार विनोदी लेखनाने ह्या परंपरेचे पाईक ठरलेले आहेत. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे खेळकरपणे पाहण्याची दृष्टी विनोदी लेखकाच्या ठायी असली पाहिजे; तशी ती पांडे यांच्याकडे निश्चितच आहे. विनोदबुद्धी ही नैसर्गिक देणगी आहे. ती प्रत्येक लेखकाला ओढूनताणून आणता येत नाही. पांडे यांना ती उपजतच लाभलेली आहे, हे त्यांच्या कथा वाचताना जाणवते. --- -श्रीराम ग. पचिंद्रे, (ज्येष्ठ संपादक, कवी आणि लेखक कोल्हापूर)
-
Nirogi Raha (निरोगी रहा)
डॉ. परीक्षित शेवडे आणि डॉ. स्वराली शेंड्ये यांचे 'निरोगी रहा' हे पुस्तक स्वतःला निरोगी ठेवण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक मार्गदर्शनाची एक संक्षिप्त तरीही तपशीलवार ओळख करून देणारे एक उत्तम मार्गदर्शक आहे. भारतीय ग्रंथ परंपरेला अनुसरूनच, त्यांनी स्वस्थ (आरोग्यपूर्ण) या शब्दाच्या व्याख्येपासून सुरुवात करून त्यानंतर वर्षभरातील बदलत्या ऋतूंनुसार अवलंबल्या जाणाऱ्या दैनंदिन पद्धती आणि आवश्यक बदलांचे थोडक्यात पण सूक्ष्मपणे स्पष्टीकरण दिले आहे. आयुर्वेदात नवीन असलेल्या वाचकांना हे पुस्तक विषयाची उत्तम ओळख करून देईल आणि स्वत:चा प्रतिबंधात्मक प्रवास सुरू करण्यासाठी पुरेसा तपशील प्रदान करेल. लेखकांनी त्यांच्या विशिष्ट शिफारसींच्या समर्थनासाठी संबंधित संदर्भ आणि प्रकाशने देखील दिली आहेत, ज्यामुळे जिज्ञासू वाचकांना या विषयातील पुढील संशोधनासाठी मार्ग खुला होईल. वाचकाने या पुस्तकात सुचवलेल्या प्रत्येक पैलूतील किमान एक बदल स्वीकारावा, त्याचे फायदे (किंवा मर्यादा) स्वत: अनुभवावे आणि नंतर स्वत:च्या प्रकृतीनुसार प्रतिबंधात्मक उपचार सानुकूल (customize) करण्यासाठी तज्ज्ञ वैद्यांचे मार्गदर्शन घ्यावे. आयुर्वेदाचे उद्दिष्ट 'स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम्' (स्वस्थाच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे) आणि 'आतुरस्य विकारप्रशमनं च' (रुग्णाच्या आजाराचे निवारण करणे) हे आहे. हे पुस्तक अन्न उत्पादन, साठवणूक, भेसळ आणि फसवणूक यांसारख्या आजच्या काळातील आव्हानांकडे लक्ष वेधून आणि त्यातून मार्ग कसा काढावा, हे सांगून आयुर्वेदाचे उद्दिष्ट साध्य करते. एका जागरूक वाचकाने या पुस्तकापासून सुरुवात करायला हवी, मात्र स्वतःचा प्रतिबंधात्मक आरोग्याचा मार्ग हा स्व-अभ्यास, सराव आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातूनच तयार करायला हवा, हे लक्षात ठेवावे. -- नीलेश नीलकंठ ओक लेखक, वक्ते, मूळ संशोधक
-
Ek Aatpat Nadi Hoti (एक आटपाट नदी होती)
नदीचे सर्व सजीवांमध्ये असलेले महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. त्यातही मानवी जीवनात असलेले स्थान हे कधीही पुसता न येण्यासारखे आहे. तिने मानवासाठी दिलेले योगदान हे मोठे आहे. पण गेल्या काही वर्षात या नद्यांना नजर लागली. नागरीकरण आणि औद्योगिकरण यात या नद्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यामुळे एकेकाळी नितळ, स्वच्छ वाहणारी आता गटारगंगा म्हणून वाहू लागली. पण आता नदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी तुमच्या सारख्या लहानग्यांची साथ या पुढील काळात लागणार आहे. 'नदी वाचवा' हि हाक आता पुढच्या काळात अधिक तीव्रतेने तुम्हाला ऐकू येईल. नदी हि आपल्या पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे हे आपल्या लक्षात अजूनही आलेले नाही. या नद्यांचे वास्तव आणि त्यांचे संवर्धन हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण नद्या वाचवू शकत नाही. त्यामुळेच उद्याचे नागरिक म्हणून तुमची जबाबदारी हि जास्त आहे. हाच सांगावा घेऊन नदी सांगत्येय तिची कहाणी.
-
Maharashtracha Safarnama (महाराष्ट्राचा सफरनामा)
सारेच महाराष्ट्राच्या प्रेमात.. !! महाराष्ट्र हे नाव जरी नुसते उच्चारले, तरी आपण पर्यटनाच्या वेगळ्याच विश्वात जातो. या विश्वात इतिहास, भूगोल, सह्याद्री, मंदिरे, नद्या, जंगले, गड-किल्ले, समुद्रकिनारे, स्मारके, संग्रहालये, गावे, या साऱ्या गोष्टी सामावल्या आहेत. पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्राचे अवकाश खूप मोठे आहे. इतर राज्यांपेक्षा कांकणभर अधिक सरस आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशा विविध भागांतली संस्कृती आणि वेगळेपण हासुद्धा एक अनुभवायचा भाग आहे. या राज्याला लाभलेला शिव-छत्रपतींचा इतिहास तर कळसबिंदू ठरावा. कितीतरी गोष्टींनी महाराष्ट्र समृद्ध आहे. एक जन्मसुद्धा अपुरा पडेल हे सारे डोळे भरून पाहायला. संपूर्ण महाराष्ट्र हा पर्यटनाच्या बाबतीत एका पुस्तकात कधीच मावणार नाही. या पुस्तकात विविध भागांतील निवडक ठिकाणांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राचा हा सफरनामा निश्चितच तुम्हाला आवडेल.
-
Enjoy (एंजॉय)
गेल्या ४-५ वर्षांमध्ये कारणपरत्वे वृत्तपत्रांमध्ये आणि हौसेने दिवाळी अंकांमध्ये मी लिहिलेल्या काही लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक होय. ह्या लेखांना सन्मानाने जागा देणाऱ्या संपादक-प्रकाशकांची मी ऋणी आहे. तसंच सध्याच्या थोड्या अवघड वाङ्मयीन वातावरणातही हे पुस्तक प्रसिद्ध करणाऱ्या नावीन्य प्रकाशनाचे श्री. नितीन खैरे आणि त्यांचे सर्व सहकारी ह्यांचीही मी आभारी आहे. लेख मराठी भाषेत, लेखिका मराठी प्रेमी, मग पुस्तकाचं शीर्षक इंग्रजी का असावं? असं विचारणारे कोणी निघतील. त्यांना उत्तर असं की, एकतर आता 'एंजॉय' हा इंग्रजी शब्द मराठी भाषेत अत्यंत प्रचलित झाला आहे. गाणं-खाणं-सभा-संमेलन- प्रवास-निवास ह्यासारख्या सर्व व्यवहारांमध्ये 'एंजॉय करा' असं उच्चरवाने सांगितलं जातं. करताकरता एंजॉय हा नुसता शब्द न राहाता वृत्ती बनत चाललीय. आसपास काहीही, कितीही, अनुकूल- प्रतिकूल असो-नसो जगणाऱ्याने त्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा. होणाऱ्या गोष्टी होणारच. मग पुढ्यातला क्षण मनमुराद उपभोगू का नये ? ‘एंजॉय!’ हे पुस्तक वाचणाऱ्यांनी हीच दृष्टी ठेवावी असं मी नम्रपणे सुचवेन. खुलेपणाने स्वीकारल्यास ह्या पुस्तकात दिलखुलास क्षण नक्कीच मिळतील. ते वाचकांनी घेतले, प्रसंगी माझ्याकडे नोंदवले तर मला ह्या लेखनाच्या खटाटोपाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. मग काय, करणार ना 'एंजॉय ?' -- मंगला गोडबोले
-
Gajlelya Jagatik Rajkiya Hatya (गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या)
गाजलेल्या जागतिक राजकीय हत्या' हे पुस्तक म्हणजे अब्राहम लिंकन (१८६५) ते बेनझीर भुत्तो (२००७) असा प्रदीर्घ रक्तरंजित इतिहास आहे. लेखक धनंजय राजे यांनी अतिशय कौशल्याने जगात गाजलेल्या १५ राजकीय हत्यांचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. या पंधरा व्यक्तिपैकी म. गांधी आणि मार्टीन ल्यूथर किंग यांना वगळता बाकीच्या तेरा व्यक्ती त्या त्या देशात सर्वोच्च पदावर होत्या. जगात खळबळ माजविणाऱ्या या क्रूर हत्यांमागचे कटकारस्थान, घटनांचे चित्रदर्शी वर्णन वाचकांना खिळवून ठेवेल. जग जसजसे आधुनिकतकडे जात गेले तसतसे खून करण्याच्या पद्धती, खुनासाठी वापरलेली हत्यारे यांमध्येही बदल होत गेले. म्हणजे विषप्रयोग, तलवार, सुरा, खंजीर इथपासून ते मानवी बाँबपर्यंत हा कलंकित मानवी प्रवास येऊन ठेपतो. ज्येष्ठ संपादक, पत्रकार श्री. कुमार केतकर लिहितात-हे पुस्तक केवळ सुजाण वाचकांसाठी मर्यादित नाही, केवळ करमणुकीसाठी नाही तर हे अभ्यासाचे पुस्तक आहे. विविध परीक्षांना (यूपीएससी इत्यादी) ते अगदी केबीसी (कौन बनेगा करोडपती) साठी तयारी करणाऱ्यांनाही हे उपयोगी पडेल. राजकीय हत्या या राजकारणाचा, सत्तेचा समतोल बदलण्यासाठी केल्या जातात. त्या घडत नाहीत, घडविल्या जातात. राजे यांच्या या पुस्तकाबद्दल इतकेच म्हणता येईल की, हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अभ्यास आहे आणि तो एखाद्या रहस्यकथेसारखा सादर केला आहे.
-
Cancer Grastha, Tarihi Swastha (कॅन्सरग्रस्त, तरीही स्वस्थ)
“गेलेले आयुष्य सुंदरच होते, पण त्या आठवणीत बुडायचे नाही. जुने राग लोभ त्यांच्या जागी, त्यांचा आता काही संबंध नाही. काही, काही ठरवायचे नाही. उद्याचा तर विचारही नाही. आजचा दिवस नक्की आपला, तो सुंदर करणे आपल्याच हातात!!!” गेली अडीच-तीन वर्षे मी हे प्रयत्नपूर्वक पाळते आहे. म्हणूनच माझा आजार थोडातरी आटोक्यात ठेवू शकले असावे. हा आठ पायांचा विंचू कधीही, कुठेही आपल्याला घट्ट करकचवून टाकू शकेल ह्या भानासह ह्या काळातल्या जाणीवा, अनुभव शब्दात पकडण्याचा हा प्रयत्न! माया धर्माधिकारी ◆ कॅन्सरग्रस्त असूनही शक्यतो स्वस्थ राहू बघणारी ही लेखिका माझी सख्खी धाकटी बहीण आहे. उपचारादरम्यान व नंतर मनात होणारी भावनिक आंदोलनं, भेटलेली माणसं, जाणवलेल्या वृत्ती प्रवृत्ती, झालेले साक्षात्कार ह्यांचं तिच्याकडून झालेलं वर्णन थेट वाचणंच योग्य ठरेल... त्यातून अनेक व्यक्तीगत, सामाजिक विचारांना चालना मिळू शकेल.