-
Jagacha Etihas Ek Drushtikshep (जगाचा इतिहास एक दृ
गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांच्या काळात जगाच्या इतिहासात घडलेल्या महत्वाच्या घटनांचा सदर पुस्तकात मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या कालावधीत अमेरिका व युरोपात अमेरिकेची क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, नेपोलियनचा उदय, शीत युद्ध, सोविएत संघाचे विघटन आदी ठळक घटना घडल्या. यातील घटना अठराव्या, एकोणिसाव्या व विसाव्या शतकात घडलेल्या आहेत. या घटनांविषयीची माहिती व त्यांचे जगाच्या इतिहासातील महत्व वाचकांना कळावे या दृष्टीने या पुस्तकाचे लिखाण करण्यात आले आहे. हे पुस्तक सामान्यवाचक, अभ्यासक, शिक्षक, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. या पुस्तकात नमूद केलेल्या घटनांचा परिणाम जगाच्या इतिहासावर कळत नकळतपणे झालेला आढळतो. त्यामुळे या घटनांचा अभ्यास करणे उपयोगी ठरणार यात वाद नाही.
-
Talkies Chi Goshta (टॉकीज ची गोष्ट)
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण पूर्वीचे फिल्म दीवाने आपण कोणता पिक्चर कोणत्या थिएटरमध्ये किती पैशाच्या वा रुपयाच्या तिकीटात एन्जॉय केला याही आठवणीत रमत. मी गिरगावात लहानाचा मोठा होताना दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सचा हुकमी 'स्टॉलचा पब्लिक ' होतो. मिडियात आल्यावर यातील काही चित्रपटगृहात मिनी थिएटर असल्याचा अनुभव घेतला. थिएटर डेकोरेशनपासून चित्रपटाचे यशापयश यात या 'मेन थिएटर'च्या गोष्टी खूपच रंजक. अशाच कुलाब्यापासून ताडदेवपर्यंतच्या थिएटर्सचा इतिहास जाणून घेतला, अनेक थिएटर्स इंग्रजकालीन आहेत, अनेक आठवणी देत बंदही पडली आणि याच थिएटर्सचे माझे बहुरंगी, बहुढंगी अनुभव म्हणजेच हे 'टॉकीजची गोष्ट' पुस्तक. आपल्यालाही आपल्या आठवणीत नेण्याचा प्रयत्न.
-
Pandavapuram (पांडवपूर)
एक दिवस ती अचानक भडकली. आपल्या पाचही पुरुषांना समोर एका रांगेत उभे करून ती ओरडली - मी तुमच्या सर्वांचा एकसारखाच तिरस्कार करते. किड्या-मुंग्या व कुजलेल्या. अन्नपदार्था सारखी मला तुमच्या सर्वांची किळस येते. ते ऐकून पाचही पुरुष हादरून एकमेकांकडे बघत स्तब्ध उभे राहिले. आईने मात्र थकलेल्या आवाजात तिला विचारले 'सुनबाई, तू विचार करूनच बोलतेस ना ?' 'हो !' ती कठोर शब्दात म्हणाली.... 'मला एक गोष्ट सांगायची आहे.... तुम्हीच तुमच्या या वीर पुत्रांना नपुंसक करून टाकले आहे, आता हे पुरुष पण नाहीत आणि स्त्री पण...' एक विलक्षण कादंबरी....
-
Mich Evadha Shahana Kasa (मीच एवढा शहाणा कसा)
चेहऱ्यावर गांभीर्य ठेवून आयुष्याकडे मिश्किलपणे पाहता आलं पाहिजे. रोजच्या जगण्यात जेवढ्या कटकटी, समस्या असतात तेवढीच गंमतही असते. 'खाली डोके वर पाय' करुन पाहिलं तर त्या गमतीची मजा घेता येते. विनोद आणि हास्य आपल्या आजूबाजूलाच असते. आपल्याला ते अनुभवायचे असेल, त्याचा आनंद घ्यायचा असेल तर स्वतःमधील विसंगतीही टिपता आली पाहिजे, म्हणजे इतरांवर हसण्याचा अधिकार आपोआप प्राप्त होतो. अशाच निरीक्षणातून जन्माला आलेले हे लेख आहेत.
-
Mudi (मुडी)
ही आहे दिलीप अनंत सावंत यांच्या गावाकडच्या हृद्य आठवणींची मुडी. १९७० च्या दरम्यानचं कोकणातलं सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं गाव, साधेपणानं पण स्वाभिमानानं जगणारी आपल्या कुटुंबातली माणसं, नमुनेदार गाववाले, शेती-भाती, झाडं-पेडं, पशु-पक्षी यांच्या आठवणी काढत ही कहाणी सुरू होते. काही सुखद स्मृती, काही व्याकुळ करणाऱ्या. यातून आत्मशोध घेता-घेता लेखक समस्त ग्राम समष्टीला आपल्या वेंगेत घेऊ पाहतो. ऐकत रहाव्यात अशा 'गजाली' सांगत राहतो. आजच्या काळाशी स्वतःला आणि वाचकांना जोडून घेत आठवणींची मुडी सोडत आणि पुन्हा घट्ट बांधत राहतो. 'मुडी' म्हणजे तांदूळ साठवून ठेवायची गवताची मोठ्या आकाराची खोबण. मुडी बांधण्याचं आणि ती घट्ट रहावी म्हणून भवताली दोरी गुंडाळण्याचं कसब सगळ्यांकडेच नसतं. मुडी बांधणारा आचार- विचारांनी स्वतः एकसंघ असावा लागतो. कलावंत मनाचा असावा लागतो. लेखकाचे आजोबा लाडोबा सावंत-पटेल फोंडाघाट पंचक्रोशीत मुडी बांधण्यासाठी नावाजलेले शेतकरी होते. त्यांच्या नातवाचं हे लेखनही त्यांच्याच वाटेवरुन शब्दपंढरीच्या दिशेने निघालं आहे.