-
Statistics Sankhyashastra (स्टॅटिस्टिक्स संख्याशास
पुराणकाळापासून स्टॅटिस्टिक्स रोजच्या व्यवहारात कळत-नकळतपणे वापरलं जात आहे. आजच्या डेटा सायन्सच्या काळात तर त्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढलेलं आहे. स्टॅटिस्टिक्स हा डेटा सायन्सचा आत्मा आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण कॉम्प्युटरवर काम होत असलं तरी मूळ संकल्पना स्टॅटिस्टिक्समधल्याच असतात. स्टॅटिस्टिक्सचा आपण जगत असलेल्या विश्वाशी, माणसांशी घनिष्ठ संबंध असतो. कारण यात लागणारा डेटा हे विश्व, त्यातली माणसं आणि त्यांची माहिती याविषयीचा असतो. अशा डेटाची मांडणी, विश्लेषण आणि त्यातले परस्परसंबंध कसे ओळखायचे हे सगळं स्टॅटिस्टिक्समध्ये येतं. आर्टिफिशियल इंटेलिजंसमधलं जे मशीन लर्निंग आहे, त्यात मोठा डेटाच इनपुट म्हणून द्यावा लागतो. त्यामुळे त्यातही स्टॅटिस्टिक्स लागतंच. स्टॅटिस्टिक्सला आजचं स्वरूप कसं प्राप्त झालं, त्याचा इतिहास, त्यातल्या संशोधकांचे संघर्ष, त्यांच्यातले वादविवाद, तसंच प्रॉबॅबिलिटी ही संकल्पना जुगारातून कशी निर्माण झाली, तिच्या विकासाचे टप्पे हे सगळं मनोरंजक पद्धतीनं यात लिहिलं आहे. कोणत्याही क्षेत्रात स्टॅटिस्टिक्स वापरायचं असेल, तर त्यातली मूलतत्त्वं समजली पाहिजेत. इथे ती सोप्या पद्धतीनं सांगितली आहेत. त्यामुळे फक्त स्टॅटिस्टिक्सचेच नव्हे, तर इतर विषयाचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. नोकरी व्यवसायात स्टॅटिस्टिक्स किती महत्त्वाचं आहे, याचं भान विद्यार्थी आणि पालकांना यावं याची काळजी या पुस्तकात घेतली आहे. तांत्रिक गोष्टी आवश्यक तेवढ्याच घेऊन सोपेपणा आणि रंजकतेला प्राधान्य दिलं आहे. तसंच स्टॅटिस्टिक्सची भीती कमी होऊन कुतूहल वाढावं या उद्देशानं हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक लोकांनी कादंबरीसारखं वाचावं.
-
Vaat Majhiya Gharachi (वाट माझिया घराची)
मी पुन्हा चांदणे देतो तू ओंजळ धर ना आधी श्वासात झिरपतो गंध ही गोष्ट एवढी साधी श्रीरंगाचे दोन भाग हे राधेआधी राधेनंतर पावा होता सुटला पावा इतुके त्याने पडले अंतर मनातले वादळ मनातच विरले तर बरे उदासीन कोसळ आतुनच जिरले तर बरे.
-
Shahanya Mansanchi Factory (शहाण्या माणसांची फॅक्ट
फॅक्टरी वेगवेगळ्या गोष्टींची असते. तशीच एक शहाण्या माणसांची फॅक्टरी उघडली आहे संगीतकार-गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘शहाण्या माणसांची फॅक्टरी’ या पुस्तकाच्या स्वरुपात. आपल्या आसपासच्या अनेक घटना, त्यातील विसंगती, व्यक्तिचित्र इथपासून ते विविध कवितांवरचे डॉ. सलील कुलकर्णी यांचे विचार आणि काही खुसखुशीत गोष्टी या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.
-
Sunahare Geet (सुनहरे गीत)
हिंदी चित्रपट संगीत कायम प्रवाही राहत आले, बदलत आले आणि म्हणून प्रत्येक पिढीला त्यांची त्यांची नवीन गाणी मिळत राहिली आहेत. गाणी येतात, गाजतात, कानाआड जातात. मात्र, बदलांचे प्रवाह पचवून आजही तेवढेच लोकप्रिय असलेले संगीत ढोबळमानाने १९५० ते १९७५ या पंचवीस वर्षातले! हजारो वेळा या काळातील गाण्यांवर बोलले गेले, लिहिले गेले असले तरीही कोणी या गाण्यांविषयी, त्यांच्या कर्त्याविषयी नव्याने लिहितो तेव्हा आपण त्याच रसिकतेने वाचतो. ती गाणी आठवतो आणि गुणगुणतोही. पद्माकर पाठकजी यांच्या पुस्तकातील लेख वाचताना तसेच होते.