-
Geisha Of Gion (गेशा ऑफ़ गिओन )
जपान, जपानी माणसं, त्यांची पारंपरिक, कणखर मानसिकता, दीघरेद्योगी वृत्ती, आधुनिक जपानच्या घडणीतली त्यांची समर्पितता, तिथली प्राचीन संस्कृती, अनवट प्रथा-परंपरा, तिथले शूर सामुराई योद्धे, गेशा-संस्कृती या सगळ्याबद्दल आपल्या मनात कमालीचं कुतूहल असतं. एक तर तिथल्या बौद्ध धर्मामुळे आपलं त्यांच्याशी अंतस्थ नातं आहेच. त्यात जपानसंबंधीच्या काना-मनावर आदळलेल्या गूढरम्य कहाण्यांमुळेही त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला आपण उत्सुक असतो. विशेषत: तिथल्या गेशा-संस्कृतीबद्दल असणाऱ्या कुतूहलामुळे आणि त्यासंबंधीच्या अर्धवट वा अत्यल्प माहितीमुळे आपल्या या औत्सुक्यात भरच पडली आहे. अशात एखाद्या गाजलेल्या, यशस्वी गेशेचं आयुष्य जगलेल्या कलावतीचं आत्मकथन आपल्या हाती पडलं तर..? तर ते अधाशासारखं वाचलं जाणार यात शंका नाही. मिनेको इवासाकी या गेशेचं (त्या स्वत:ला ‘गेको’ म्हणवतात.) ‘गेशा ऑफ गिओन’ हे प्रांजळ आत्मकथन गेशासंस्कृतीबद्दलच्या आपल्या समज-गैरसमजांचं जसं निराकरण करतं, तसंच साडेतीनशेहून अधिक वर्षे टिकून राहिलेल्या या पारंपरिक कलासंचिताचं अंतरंगही तपशिलात उलगडून दाखवतं.
-
Kombada Zala Ghadyal (कोंबडा झाला घड्याळ)
कवी राजेश देवराव बारसागडे यांचा 'कोंबडा झाला घड्याळ' हा बालकवितांचा संग्रह आहे. प्रत्येक कविता ही अर्थपूर्ण आणि प्रवाही आहे. कधीकधी ती गुणगुणत वाटेल,ती कधी गात राहावी वाटेल. येथे इथे माणसं आहेत, प्राणी आहेत, मुलं आहेत आणि कितीतरी … जे आपल्या भोवती असतात. कविता भावपूर्ण आहेत आणि खूप अर्थपूर्ण आहेत मुलांचे भाविश्व अधिक प्रगल्भ करणा -या ह्या कविता केवळ मुलांनाच नव्हे तर सर्वांनाच आवडतील.
-
Agatha Christie And The Eleven Missing Days
रहस्यकथांची सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती यांचं हे चरित्र आहे. मात्र ते केवळ तिच्या आयुष्यातल्या अकरा दिवसांविषयीच आहे. रहस्यकथांची सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती यांचं हे चरित्र आहे. मात्र ते केवळ तिच्या आयुष्यातल्या अकरा दिवसांविषयीच आहे. हे अकरा दिवस अगाथा आपल्या घरातून बेपत्ता होऊन एका हॉटेलमध्ये गुपचूप राहिली होती. अगाथा बेपत्ता का झाली आणि सापडली कशी याची कहाणी सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली. पण जेरेड केड यांनी या पुस्तकातून अगाथाच्या बेपत्ता होण्यातलं खरं रहस्य शोधून काढलं. या पुस्तकावर बीबीसीने लघुपटही केला होता. नव-याशी होऊ घातलेल्या फारकतीमुळे रागावून त्याच्यावर सूड उगवण्यासाठी अगाथाने बेपत्ता होण्याचे नाटय़ रंगवले खरे, पण त्यात तीच फसली. कारण त्यावर ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी मोठी खळबळ उडवून दिली. अगदी संसदेतही त्यावर प्रश्न विचारले गेले. हे पुस्तक जेरेड यांनी भरपूर कष्ट घेऊन आणि संधोधन करून लिहिलं असलं तरी मूळ घटना एवढी छोटी आहे की, त्यासाठी पुस्तकाचा खटाटोप जरा जास्त वाटू शकतो. शिवाय ज्यांना अगाथा माहीत आहे, त्यांनाच या पुस्तकाबाबत विशेष आस्था असू शकते. अंबिका सरकार यांचा अनुवाद मात्र अतिशय नेमका आणि सफाईदार झाला आहे.