-
Kashmirchi 5000 Varshe (काश्मीरची ५००० वर्ष)
काश्मीरमधी जेष्ठ विचारवंत बलराज पुरी यांनी जी. एम. डी. सुफी , पी.एन.के. बमाजाई , वेदकुमार घई, प्रेमनाथ बजाज , पीर गीयास उद्दीन , माधवी यासीन , सैफुद्दीन सोझ यांच्यासारख्या नामवंत काश्मिरी लेखकांच्या भूतकाळाचा वेध घेणाऱ्या लेखांचे 5000 years of Kashmir हे पुस्तक प्रसिध्द केले. १९८९ सालच्या एका परिषदेतील लेखांचे हे पुस्तक काश्मीरमधील सर्व बदलाच मागोवा घेत असल्याने अतिशय अभ्यासपूर्ण आणि महत्वाचे झाले . मराठी वाचकांना काश्मीर प्रश्नाबद्दल माहिती व्हावी तसेच त्याच्या इतिहासातील घटनांपासून बोधही घेता यावा हा या पुस्तकाच्या अनुवाद करण्याचा हेतू आहे. हे पुस्तक म्हणजे काश्मीरमधील ५००० वर्षातील विविध परंपरांचा , बदलांच वाचनीय इतिहास आहे .
-
Sattechya Paareeghatatun (सत्तेच्या परिघातून)
'Through the Corridors of Power' या पी.सी.अलेक्झांडर यांच्या मुळ पुस्तकाचा अनुवाद ..
-
Train To Pakistan (ट्रेन टू पाकिस्तान)
खुशवंतसिंग यांची ही गाजलेली कादंबरी १९५६ मध्ये प्रकाशित झाली होती. मात्र आजही या कादंबरीची लोकप्रियता कमी झालेली नाही. स्वातंत्र्यानंतर देशाच्या झालेल्या फाळणीची पार्श्वभूमी या कादंबरीला लाभली आहे. राजकीय पटलावर ज्या घडामोडी घडत असतात त्याचे पडसाद भारत - पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या लहानशा गावांमध्ये कसे उमटतात, त्याचे चित्रण त्यातून केले आहे. तेथीलच एका गावात शीख आणि मुस्लिम बंधुभावाने राहात असतात. फाळणीशी त्यांचा संबधीही नसतो. शिखांच्या मृतदेहांनी भरलेली ट्रेन अशा घटना - प्रसंगांनी व्यापलेल्या या कादंबरीचा थरार रोमांच उभे करतो. खुशवंतसिंग यांची खास शैली अनिल किणीकर यांच्या रसाळ अनुवादात उतरली आहे.
-
Netaji Subhash
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या धगधगत्या रणकुंडात अनेक देशभक्तांनी उडी मारली. त्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशमुक्तीसाठी केलेले अथक प्रयत्न म्हणजे एक स्वतंत्र लढाच आहे. उच्चविद्याविभूषित सुभाष बाबूंनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून देशवासीयांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी हाक दिली. परदेशी नेत्यांची मदत घेण्याचे धाडस त्यांनी दाखविले. त्यांच्याबद्दल भारतातच नव्हे, तर अन्य देशांतही आदर व्यक्त केला जातो. त्यांच्या राजकीय वाटचालीतून त्यांची जीवनगाथा सितांशू दास यांनी ‘नेताजी सुभाष’ मधून कथन केली आहे. त्याचा मराठी अनुवाद श्रीराम पचिंद्रे यांनी केला आहे. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एका तेजस्वी पर्वाचा वेध यातून घेतला आहे.