-
Vegale Pravas, Anokhe Anubhav (वेगळे प्रवास,अनोखे
प्रदेश,निर्सग,घटना, प्रसंग, माणस याच्या वर्णनचित्रातील थरारक, चित्रमय शैलीमुळे हे पुस्तक परिणाम साधतंच, पण सवदीचा केवळ रसिकतेचा व सह्रदयतेच्या नव्हे तर प्रगल्भ, चितनशील, व्यक्तीत्वाचा स्पर्शामुळे ते अधिक प्रभावी वाटतं. या अनुभवासाठी अख्ख पुस्तकच झपाटून वाचायला हवं.
-
Eka Punarjanmachi Katha (एका पुनर्जन्माची कथा)
डॉ. मनोज भाटवडेकर यांनी सांगितलेली एका डॉक्टरचीच ही एक कहाणी आहे. इतरांना आजारातून बरे करणाऱ्या आणि जगण्याची उभारी देणाऱ्या डॉक्टरलाच एक दुर्धर रोगाने त्रासले, तर काय होईल....या कहाणीतील डॉक्टरला अशाच एका दुर्धर आजारानं ग्रासलं आहे. वैद्यकीय उपचारांना काही फारसं यश येत नाही. मनही खचल आहे;पण चारही बाजूंनी आलेल्या संकटातून एक मार्ग समोर येतो. जादू झाल्यासारखा तो आजारातून बरा होतो. खर तर चमत्कार झाल्यासारखा त्याचा पुनर्जन्मच होतो. एक वेगळं आयुष्य सुरु होतं.या प्रवासाचीच ही कहाणी आहे. वाचनाचा वेगळा अनुभव देणारी आणि वेगळा विचार घेऊन वाचकापर्यंत पोहोचलेली.!!डॉ. मनोज भाटवडेकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकात त्यांच्या आयुष्यात एका आजारानंतर घडलेल्या क्रांतिकारी बदलाची कहाणी दिली आहे. डॉ. भाटवडेकर यांनी आपल्याला ध्यानधारणेचा कसा फायदा झाला, तसंच या काळात त्यांच्यात जे बदल झाले त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे. ओशो यांच्या तत्त्वज्ञानाचा भाटवडेकर यांच्यावर कसा प्रभाव पडला, ते त्यांनी यात दिलं आहे. यात आध्यात्मिक बाजूचा आग्रह नाही किंवा असं केल्याने आजार बरा झाल्याचा दावाही नाही. मन आणि बुद्धी यांचा वापर कसा करायचा, दोन्हींतील कुठली गोष्ट कधी ऑन ऑफ करायची, ते मला कळतं. असं भाटवडेकर सांगतात.
-
Raranga Dhang Nantar (रारंग ढांग नंतर)
वास्तवाचे चित्रमय दर्शन घडवणारे एक नामांकित लेखक म्हणजे प्रभाकर पेंढारकर, 'रारंगढांग' ही त्यांची गाजलेली कादंबरी. या कादंबरीची उत्तरकथा (सिक्वल) लिहिण्याचं आव्हान 'चंद्रकांत' मासिकानं दिलं, ते स्वीकारलं अन पेललं प्रा. श्रीकृष्ण शामराव सवदी यांनी. सवदी हे मुळात इंग्रजीचे प्राध्यापक. पण त्यांनी प्रदीर्घ सेवा बजावली ती डिफेन्स अकाऊन्ट्स डिपार्टमेंटमध्ये अत्यंत उच्च पदावर. वाड्मयीन व व्यावसायिक अनुभवातून मिळालेल्या बळाच्या जोरावर ते 'रारंगढंग' चं आव्हान स्वीकारू अन- पेलू शकले. पेंढारकरांपेक्षा सवदींची शैली वेगळी असली तरी 'रारंगढंग'चं प्राणतत्व त्यांना सापडलं आहे. मूळ कथेचा पोतही या उत्तरकथेत बरोबर उतरला आहे. उत्तरकथेची कल्पना पेंढारकरांना आवडली होती. सवदी लिखित या उत्तरकथेला त्यांनी नक्कीच दाद दिली असती. आता कसोटी आहे ती वाचकांच्या रसिकतेची ! मात्र ती विद्वत्तेच्या बेडीत अडकू नये !
-
Valut Umalalela Phul (वाळूत उमललेलं फूल)
वारिस डियरी या सोमालियाच्या झोपडपट्टीत जन्मलेल्या, रखरखीत वाळवंटात वाढलेल्या कृष्णवर्यीय मुलीची ही गोष्ट. तिच्या वाटय़ाला आलेल्या भीषण नरकयातनांची, हालअपेष्टांची ही कहाणी अंगावर शहारा आणते. एकेदिवशी पिरेल्ली कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर तिचं छायाचित्रं छापून येतं आणि तिचं विश्व बदलतं. ती सुपर मॉडेल होते. नामांकित फॅशन मॅगझिन्समधून तिची छायाचित्रं छापून यायला लागतात. जाहिराती मिळायला लागतात. त्यातून तिला न कळणाऱ्या, मोजता येणाऱ्या आकडय़ांचे चेक मिळू लागतात. पण पैसा आणि प्रसिद्धीच्या मोहात न अडकता वारिस 'फिमेल जेनायटल म्युटिलेशन'सारख्या क्रूर प्रथेविरुद्ध चळवळ सुरू करते. त्यामुळे तिला यूनोच्या व्यासपीठापासून जगातली सगळी व्यासपीठं बोलावू लागतात. वारिस जगप्रसिद्ध होते. त्या वारिसची ही कहाणी मुंदरगी यांनी रसाळपणे पण नेमक्या शब्दांत मांडली आहे. सत्यघटना असली तरी ती कादंबरी वाटावी, परीकथेत शोभून दिसावी अशी आहे. वाळूत उमललेल्या एका फुलाची ही जीवनकहाणी प्रेरणादायी आहे, हे नक्की.
-
Athavanitil Moti ( अठवणितील मोती )
एखाद्या क्षेत्रात काम करायला मिळणे ही एक संधी असते; परंतु त्या संधीचे सोने करण्यासाठी कर्तृत्व लागते. कर्तृत्वाला परिश्रमाची जोड व नशिबाची साथ असली की ते ते क्षेत्र त्या त्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या नावाने ओळखले जाते. तीर्थस्वरूप प्रभाकरचा व मराठी रंगभूमीचा असा अन्योन्य संबंध आहे. सन १९४८ ते २०११ पर्यंतच्या प्रदीर्घ काळात ती.प्रभाकरने आयुष्यातील क्षण अन् क्षण नाट्यसेवा व नाट्यचिंतनातच खर्च केला. या कालावधीत त्याच्या आयुष्यातील अनेक व्यक्ती, घटना भूतकाळात जमा होऊन त्या स्मृतीरुपही झाल्या. त्या सार्या स्मृतींना आपल्या शैलीदार शब्दांच्या मोत्यांमध्ये गुंफून त्या आठवणींना सुंदर रूप ती.प्रभाकरने या ग्रंथात बहाल केले आहे. सर्व आयुष्यभर रंगभूमीवरील २८ फुटांचा रंगमंच भव्य आणि सुंदर करण्यात खर्ची घालणार्या या नाट्यसेवक नटसम्राटाने आपल्या आठवणीही अशा नाट्यमय कथन केल्या की, त्या आठवणींचा आठवही मनोज्ञ व्हावा! पुन:पुन्हा आठवून आठवून आठवणीने या आठवणी वाचून त्या नाट्यमय प्रभाकरला अभिवादन करावे इतकेच!
-
Chala, Badal Ghadvuya!
'बदल घडवून आणायचाच असेल तर षंढासारखं वागून चालणार नाही. बदमाशांच्या पालखीचे भोई किती दिवस होत राहणार? बारामतीपासून बोस्टनपर्यंत बदलांचे वारे आता वाह्तायेत. वाऱ्यांवर स्वार तर व्हायलाच हवं' !
-
Nivdak Dhananjay Trutiya Netra (निवडक धनंजय तृतीय
1961 ते २००० मधील धनंजय दिवाळी अंकांच्या निवडक कथांचा संग्रह.