Athavanitil Moti ( अठवणितील मोती )

By (author) Prabhakar Panshikar Publisher Rajendra

एखाद्या क्षेत्रात काम करायला मिळणे ही एक संधी असते; परंतु त्या संधीचे सोने करण्यासाठी कर्तृत्व लागते. कर्तृत्वाला परिश्रमाची जोड व नशिबाची साथ असली की ते ते क्षेत्र त्या त्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या नावाने ओळखले जाते. तीर्थस्वरूप प्रभाकरचा व मराठी रंगभूमीचा असा अन्योन्य संबंध आहे. सन १९४८ ते २०११ पर्यंतच्या प्रदीर्घ काळात ती.प्रभाकरने आयुष्यातील क्षण अन् क्षण नाट्यसेवा व नाट्यचिंतनातच खर्च केला. या कालावधीत त्याच्या आयुष्यातील अनेक व्यक्ती, घटना भूतकाळात जमा होऊन त्या स्मृतीरुपही झाल्या. त्या सार्‍या स्मृतींना आपल्या शैलीदार शब्दांच्या मोत्यांमध्ये गुंफून त्या आठवणींना सुंदर रूप ती.प्रभाकरने या ग्रंथात बहाल केले आहे. सर्व आयुष्यभर रंगभूमीवरील २८ फुटांचा रंगमंच भव्य आणि सुंदर करण्यात खर्ची घालणार्‍या या नाट्यसेवक नटसम्राटाने आपल्या आठवणीही अशा नाट्यमय कथन केल्या की, त्या आठवणींचा आठवही मनोज्ञ व्हावा! पुन:पुन्हा आठवून आठवून आठवणीने या आठवणी वाचून त्या नाट्यमय प्रभाकरला अभिवादन करावे इतकेच!

Book Details

ADD TO BAG