-
Haddapar (हद्दपार )
श्री.ना. पेंडसे यांनी सांगितलेले वर्णन - "या कादंबरीविषयी आमच्या मास्तरांच्या विद्यार्थ्यांत ब-यापैकी लेखनकला असलेला मीच - यामुळं प्रस्तुत कथेच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर आली. माझ्या तोटक्या लेखणीनं मी ती पार पडली आहे. मास्तरांच्या महात्मतेचं दर्शन घडवायला ही कथा अपुरी पडणारी असेल तरी मला फिकीर नाही. जोवर येथील दुर्गेश्वर आणि मास्तरांच्या स्वर्गवासामुळे ओका झालेला बुरोडीच्या खाडीवरील राजेवाडा हयात आहे, तोवर येथील निर्जीव जगसुद्धा मास्तरांविषयी काय सांगायचं ते सांगेल." मास्तरांविषयी हद्दपार ही श्री.ना. पेंडसे यांची कादंबरी वाचकाला अंतर्मुख करून जाते.
-
Octopus (ऑक्टोपस )
ऑक्टोपस हे एक जलचर प्राण्याचं नाव आहे. त्याला आठ नांग्या असतात. या नांग्यानी तो आपले भक्ष्य पकडत असतो. याचं नाव सहेतुकपणे या कादंबरीला योजले आहे. प्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांची चारू पंडीत, मीना मोडक, गुरुनाथ हिंदकेकर या प्रमुख व्यक्तिरेखा असलेली ही कादंबरी वाचनीय असून श्री. ना. पेंडसेंच्या उत्कृष्ट कादंबरीच्या यादीत मोलाची भर टाकणारी आहे.
-
Sudoul Vha Sundar Disa(सुडौल व्हा सुंदर दिसा )
स्थूलपणा बरोबरच शरीराचा बेढब आकार पाहिजे तिथे आणि पाहिजे तसा कमी करू शकणारा संपूर्ण नैसर्गिक आणि क्रांतिकारक अशा व्हिढेक्स पॅटर्नची सविस्तर माहिती देणारे पुस्तक. यातील मार्गदर्शन हजारो स्त्रीपुरुषांना शास्त्रीय आणि योग्य पद्धतीने जाडीवर नियंत्रण ठेवून बारीक होण्यास खात्रीने मदत करील. साधे सापे परंतु शास्त्रीय फ्री हँड फ्लोअर एक्झरसाईझ आणि पोट भरेल असे आहारविषाक मार्गदर्शन याचा उत्कृट समन्वयामुळे व्हिdढेक्स पॅटर्न ११ ते ६० वायोगटातील प्रतेकाला सहज आणि घरोघरी करता येण्यासारखा आहे. फॅट जाळणारी उपकरणे किंवा शस्त्रक्रिया, भूक मंदावणारी औषधे असे झटपट बारीक करणारे’ किंवा कष्ट न करता बारीक करणारे’ कोणतेही उपाय या पुस्तकात सुचविलेले नाहीत.
-
Tumbadache Khot( तुंबाडचे खोत)
मराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार ही श्री. ना. पंडसे यांची आजची पदवी आहे. रसिकांची व श्री. पेंडसे यांचीही आजवर समजूत अशी होती की 'रथचक्र' ही त्यांची सर्वोत्कृष्ट कादंबरी. 'एल्गार'पासून सुरू झालेल्या त्यांच्या कादंबरीयात्रेचा अखेरचा मुक्काम म्हणजे 'रथचक्र'! आणि असे वाटत होते की त्यानंतर स्वभावधर्मानुसार ते कादंबरीलिखाण करतच रहातील पण 'रथचक्र' नंतर काही भव्यतर आलोक असेल, अशी त्यांना व रसिकांना बहुतकरून कल्पनाही नसणार. - पण मराठी कादंबरीचे भाग्य असे की 'रथचक्र' नंतर आता आणखी एक महाकाय अशी लोकविलक्षण कादंबरी पेंडसे यांनी लिहिली आहे, 'तुंबाडचे खोत'. मुळात या दुखंडी कादंबरीचा आवाकाच प्रचंड आहे. तुंबाडच्या खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम दशकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी. म्हणजे जवळपास सव्वशे वर्षांचा हा प्रदीर्घ कालखंड आहे. तुंबाडकर खोतांच्या आद्य पूर्वजांपासूम विद्यमान वंशजांपर्यंत या इतिहासाची व्याप्ती आहे. या चित्रविचित्र इतिहासाच्या मार्गक्रमणात पदोपदी असंख्य स्वभावविशेष अशा व्यक्ती आणि त्या व्यक्तींच्या स्वाभाविक संघर्षातून निष्पन्न होणार्या अनिक घटना भेटत रहातात. त्यात पुन्हा एक व्यक्ती दुसर्या व्यक्तीसारखी नाही. एक घटना दुसरीसारखी नाही. एकूणएक सर्वच व्यक्ती व घटना स्वत्वविषेष अशा. आणि काळ सव्वाशे वर्षे असला तरी स्थळ मात्र एकच: तुंबाड आणि तुंबाडचा परिसर. तुंबाडच्या खोतांच्या कुलवृतांताची ही बखर ही एखाद्या रम्याद्भुत आणि उग्रभीषण कहाणीसारखी आहे.
-
Sarjya (सर्ज्या)
आपण सभोवताली बैलं पाहतो पण त्या मुक्या प्राण्याचं दुख: शब्दात मांडलं पाहिजे असं कुणाला वाटत नाही आणि ते तेवढं सोपंही नाही. पण प्रत्यक्ष काम केल्यामुळेच, वेदनामय जीवनाचा अनुभव घेतल्यामुळेच सुरेश शिंदे ही कादंबरी लिहू शकले. मुक्या जितराबाला खरोखर वाचा असती तर त्यानेच स्वत:ची आत्मकथा जगाला सांगितली नसती का ?
-
Dharmashree (धर्मश्री)
तत्त्वज्ञान हे वेगवेगळ्या विचारशक्तीच्या माणसांमध्ये कशा वेगवेगळ्या प्रेरणा निर्माण करते आणि त्या प्रेरणा व्यक्तीच्या जीवनधारा कशा संपूर्ण बदलून टाकतात याचे दर्शन 'धर्मश्री' कादंबरीत स्पष्टपणे होते. जीवनाबद्दल प्रत्येकाला असलेली श्रद्धा व जीवनाची मूल्ये यांच्यातला संघर्ष व शेवटी निघणारे सत्य यांचा संगम 'धर्मश्री' मध्ये दिसून येतो. हा संगम तत्त्वज्ञानाच्या रुपाने वाहतो, पण कादंबरीची सुबोधता व सौंदर्य बिघडवून टाकत नाही. - विजयालक्ष्मी रेवणकर
-
Tumbadache Khot Khand - 3 Ani 4 ( तुंबाडचे खोत खंड
श्री. ना. पेंडसे यांनी एक महाकाय अशी लोकविलक्षण कादंबरी लिहीली. ती म्हणजे तुंबाडचे खोत. मुळातच या द्वीखंडी कादंबरीचा आवाका प्रचंड आहे. तुंबाडचे खोत घराण्याच्या ज्ञात इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटीश अमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतच्या अंतिम शतकात, स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा प्रदीर्घ कालखंड आहे. तरी स्थळ मात्र एकच : तुंबाड आणि तुंबाडचा परिसर.
-
Vishkha ( विशाखा )
उत्कट जीवनानुभव, स्वानुभवापासून ते राष्ट्रप्रेमापर्यंत विषयांचे वैविध्य, लालित्यपूर्ण आणि ओघवती भाषाशैली या विविध गुणांनी युक्त असणारा विशाखा हा काव्यसंग्रह जगन्मान्य कवी कुसुमाग्रजांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलाय. सुरेख काव्यानुभूती देणारा हा कवितासंग्रह प्रत्येकाने आपल्या घरात, हृदयात व मनातही जपून ठेवावा असाच आहे.