-
You Are Under Arrest Gunhe Shodhkatha (यू आर अन्डर
पोलिस म्हणजे रुक्ष, भ्रष्टाचारी व सामान्यांना अडविणारे खाते, असा समज बहुतेकांचा असतो; पण या खात्यातही अनेक चांगली माणसे असतात. कायदा गरिबांसाठी वापरला पाहिजे, असे मानणारे, संवेदनक्षम पोलिस असतात. त्यापैकी एक म्हणजे अशोक इंदलकर हे पोलीस अधिकारी. राज्यात विविध ठिकाणी काम करताना आलेले अनुभव, तपासासाठी येणाऱ्या केस याबद्दल त्यांनी 'यू आर अंडर अरेस्ट'मधून लोहिले आहे. हे सर्व लिखाण वास्तव असल्याने राजघराण्यातील असूनही भणंग फिरणारा व खुनाच्या आरोपातून सुटणारा दिलीपसिंह, सोन्याचे हरवलेले दागिने शोधण्यासाठी महिला व राजकीय पार्श्वभूमी असलेल्या तिच्या पतीने केलेला पाठपुरावा, उच्चकुलीन पण बाहेरख्याली झालेला हिम्मतराव, ट्रेकिंगचा थरार, हरवलेली तरूण मुलगी सापडल्यानंतर वडिलांनी मानलेले आभार, पोलिस अधिकारी असूनही भीक मागायची वेळ आलेला गायकर, सीआयडी अधिकारी जयस्वाल, प्रेमवेडा कपिल यांच्याविषयी व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा शोधकथा यात आहेत. यातील घटना खऱ्या असल्याने त्या वाचताना गुन्हेगारीचे, पोलिसांचे विश्व व पोलिसांमधील माणसाचे दर्शन यातून होते.
-
Chaha-Vyasan, Pilvanuk ani Samrajya (चहा-व्यसन, पि
चहा हा भारतीय नव्हे, तर जगातील नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ‘चला चहाला’, किंवा ‘चहा घेणार?’ हे शब्द भारतात सहज ऐकू येतात, इतका चहा आपल्या अंगवळणी पडला आहे. हा चहा प्रथम चीनमधून इंग्लंडमध्ये आला. तेथून तो भारत, श्रीलंका यांसारख्या ब्रिटीश वसाहती देशांमध्ये पोचला. तेथे त्यांची लागवड इंग्रजांनी सुरु केली. त्यासाठी मिळेल त्या मार्गाने मनुष्यबळ वापरले. आपल्याकडे वापरतात त्याला ‘काळा चहा’ म्हणतात. याचा इतिहासही काळा आहे. यात गरीब, लाचार मजुरांची मळेवाल्यांकडून होणारी पिळवणूक, प्रसंगी प्राण गमविणारे कामगार अशा गोष्टींची काळी किनार चहाला आहे. चहाचा इतिहास रॉय मॉक्सहॉक यांनी शोधला व तो पुस्तकातून जगासशोर मांडला. चहाचे व्यसन, साम्राज्य याची माहिती समजते. याचा मराठी अनुवाद आनंद अभ्यंकर यांनी केला आहे. यात भारतातील चहा, त्याचा इतिहास, लागवड, तसेच शास्त्रीय माहिती आहे.
-
To Tee (तो ती)
वेगवेगळी नाती, त्यातील बंध त्यातील मौज सांगणारी आणि त्यांतील गुंते उलगडणारे सुधीर गाडगीळ यांचे हे पुस्तक. मैत्री, उसनं प्रेम, पती, पत्नी और वो, बोलघेवडी, मिस फिट अशा शीर्षकाखालील छोटेखानी लेखांचा हा संग्रह मन प्रसन्न करतो आणि नात्यांकडे अधिक सजगपणे पाहायला शिकवतो. वेगवेगळे प्रसंग, घटना आणि संवादांमधून ही नाती आपल्या समोर येतात. नकोशी, हवीशी, निरागस, निखळ, मैत्रीची अन प्रेमाची निराळीच व्याख्या ती सांगतात. या नात्यांमधला आनंद, समाधान किंवा ओझे अथवा ताणही दिसतो. शिवाय ही नाती काही एका विशिष्ट वयाचीही नसतात. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ती निर्माण होतात आणि आयुष्याला समृध्द बनवतात.
-
Rang Yacha Vegla...(रंग याचा वेगळा...)
रंग माझा वेगळा म्हणत सर्वत्र मजेत हिंडणारा एक अवलिया आपल्यासमोर आहे. याचे साहित्य वाचून विजय तेंडूलकर,दुर्गा भागवत,विंदा करंदीकर याचे चाहते झाले. मधु लिमये,नानाजी देशमुख,बलराज मधोक याचे जवळचे मित्र होते. काश्मीरपासून देवराळाच्या सतीपर्यंत आणि कोसळणाऱ्या रशियापासून आपल्या अंटार्क्टिका मोहिमेपर्यंत हे सारे समजावे म्हणून याने शोधयात्रा केल्या. औद्योगिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या दिल्लीतील एका जागतिक कीर्तीच्या संस्थेचा हा संचालक. औद्योगिक क्षेत्रातील संशोधनासाठी याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बहुमान मिळाले. आणि हो, याने वेगळ्या दर्जेदार कविता पण केल्या!
-
Mulancha Aahar (मुलांचा आहार)
प्रतेक स्वतंत्र राष्ट्राने आपला प्रजेला आरोगपूर्ण जगणासाठी आहार देणे, त्या राष्ट्राचे आद्य कर्तव आहे. पाश्चिमात राष्ट्रांत योग्य अन्न पुरवठ्यास महत्त्वाचे स्थान दिले आहे. भारतातील निरनिराळा राज्यातून आहाराची पाहणी करणात आली. त्यामधे असे स्पटपणे आढळून आले की सध्याचा सर्वसाधारण आहार अयोग्य आहे. याचा सगळ्यात वाईट परिणाम लहान मुलांवर होतो. मुलांचा वाढीच्या वयात जर योग्य आहार दिला नाही, तर तांची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक वाढ खुंटते. आज भारतातील ९० टक्वे मुलांना अयोग्य आहार मिळत आहे. याचे कारण म्हणजे दारिद्र्य, अपुरा अन्न पुरवठा, अज्ञान, अंधश्रद्धा आणि महत्त्वाचे म्हणजे आहार शिक्षणाचा अभाव. आजची मुले उद्याचे नागरिक. तांनी स्वत:ची आणि राष्ट्राची कर्तवे योग्य तर्हेने पार पाडणासाठी योग्य आहार आवशक आहे. या दृटिकोनातून मुलांचा आहार हे पुस्तक अत्यंत उपुक्त व माहितीप्रद आहे. प्रतेक पालकाने ते वाचलेच पाहिजे.
-
Jait Re Jait (जैत रे जैत)
कर्नाळ्यावरचा दीडशे फूट उंचीचा उभा टेंबा मी पाहिला आणि थक्कित होऊन उभा राहिलो. अवघा सह्याद्रि मंडळात कडा नाही. मग दिसली ता कड्याभोवती चहूबाजूंनी लोंबलेली भली प्रचंड पोळी-आग्यामाश्यांची. त्या पोळ्यांचा
-
Hubehub (हुबेहुब)
‘हुबेहूब’ नक्कल करणाया बबनचे वास्तविक आयुष्यही नकलेसारखेच झाले... पोटाची खळगी भरण्यासाठी स्वार्थी माणसाने देवालाही ‘घाम’ फोडायला लावला... स्वत:च्या जिवापेक्षाही मुक्या जनावरांवर जिवापाड प्रेम करणारा तात्या म्हातारा... ‘तगई’साठी पैसे खाणाया प्रत्येक माणसाला जन्मभराची अद्दल घडविणारा अण्णा भागवत... ‘जेवणवेळ’ झाली की, लिंबाखाली बसणाया आबामुळे कितीतरी चांगल्या आणि वाईट गोष्टी घडल्या... केस कोणती अन् कशीही असू दे; दिगुअण्णा ‘साक्षीदार’ असले की, निकाल लागलाच म्हणून समजा... मानवी स्वभावाच्या अशा नाना कळा... अनुभवा द.मांच्या खुमासदार शैलीत!
-
Purvarang-Himrang (पूर्वरंग-हिमरंग)
व्यवसायाने डेंटल सर्जन- अंत:करण रसिक कवीचे-दृष्टी चित्रकाराची- मन साहसी भ्रमंतीतून हिमालयात मन:शांती आणि परतत्व स्पर्श शोधणारे - त्या मनाला सापडला कर्तव्याचा अर्थ पूर्वांचलच्या निसर्गसमृद्ध प्रदेशात आरोग्यविषयक सुविधेचा अभाव - तिथे जाऊन ११ वर्ष दंतशिबिरे घेणारी पहिली डेंटल सर्जन प्रतिभा-सेवा आणि भ्रमंती सारे शब्दरूप झाले त्यातून साकारले- अपूर्व अनुभवांनी भरलेले आणि भारलेले.... पूर्वरंग-हिमरंग
-
Chorghade yanchi Katha (चोरघडे यांची कथा)
मराठी कथा ज्या महत्त्वाच्या कथाकारांनी नावारूपाला आणली त्यांच्या निवडक कथांचे संपादित संग्रह कॉन्टिनेन्टलने वेळोवेळी प्रकाशित केले आहेत. त्यांपैकी चोरघड्यांची कथा जुनी लघुकथा आणि स्वातंत्र्योत्तर काळातील नवकथा यांना जोडणारा दुवा म्हणून मान्यता पावली आहे. प्रस्तुत संग्रहात या कथेचे पुरेसे दर्शन वाचकांना घडेल.