-
Mirasdari (मिरासदारी )
मराठीतले प्रसिद्ध विनोदी लेखक द.मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावेल.
-
Mahasphotatil Vishva ( महास्फोटातील विश्व )
दहा सप्टेंबर 2008 ला विश्वनिर्मितीचा महास्फोट प्रयोग सुरू झाला आणि त्याबाबतच्या उलटसुलट चर्चाही रंगल्या. अनेकांनी त्यासंबंधीच्या अंधश्रद्धांना खतपाणी घातले. पण त्या वेळी एक महत्त्वाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे या प्रयोगाने विश्वनिर्मितीचा विषय सर्वसामान्यांपर्यंत नेला. साहजिकच आपल्या मनात प्रश्न येतो, की हे विश्व आहे तरी कसे? 1920 च्या दशकात एडविन हबल या खगोलशास्त्रज्ञाने आकाशनिरीक्षणातून विश्व प्रसरणशील आहे, हा सिद्धान्त मांडला आणि विश्वाला गतिमान केले. विश्व फक्त विस्तारतच आहे असे नाही, तर ते वाढत्या गतीने विस्तारत आहे, असे 2011 चा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे सॉल पर्लमुट्टर, ऍडम टीस व ब्रायन स्मिट या तीन खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले. अतिदूरच्या सुपरनोव्हांचा (स्फोट पावणारे तारे) अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. परिणामी महास्फोट सिद्धान्ताला अधिकच बळकटी मिळाली. अशा या गतिमान विश्वाची आणि "सर्न' (युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च) या ठिकाणी चाललेल्या महाप्रयोगाची माहिती देणारे डॉ. निवास पाटील यांचे "महास्फोटातील विश्व' हे पुस्तक आहे.
-
Sachin Tendulkar (सचिन तेंडूलकर )
अनुवादित, क्रीडाविषयक, क्रिकेट,
-
-
Lapavlelya Kacha
कलावंताचं मन, तरीही एक त्रयस्थपणे पाहण्याची शक्ती आणि सुक्ष्म निरीक्षण यांतून सलीलचं लिखाण फुललं आहे ! त्याने या लपवलेल्या काचा अशाच शोधून काढत राहायला हव्यात कारण अशा काचा कधीच व्यक्तिगत उरत नसतात - अशा काचांच्या झुंबरहंड्याच अनेकांची मनं उजळवीत असतात ! -संदीप खरे ‘लपवलेल्या काचा’ या डॉ. सलील कुलकर्णी लिखित पुस्तकाचं प्रथमदर्शनी वैशिष्टय़ नजरेत भरतं ते या पुस्तकाची आगळीवेगळी आणि आकर्षक अशी मांडणी. रविमुकुल यांनी या पुस्तकाची मांडणी करताना सलील कुलकर्णी यांच्या विविध भावमुद्रा टिपणाऱ्या रेखाचित्रांचा वापर केला आहे, तसंच नवीन प्रकरणाच्या सुरुवातीला हस्ताक्षरातील मजकूर टाकण्याची कल्पना या ललित लेखसंग्रहाला एकदम साजेशी ठरली आहे. मांडणीमुळे नजरेत भरणारं हे पुस्तक मनाचाही ठाव घेतं. कारण यातले ललित लेखांचे विषय सहजी कोणाच्याही मनाशी नातं जोडणारे. ज्यांना ललित लिखाण आवडतं, त्यांना तर त्यांच्याच मनाचं प्रतििबब या पुस्तकात पडल्यासारखं वाटेल. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटना; आनंद देणाऱ्या, दु:खी करणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या, चिडचडीस कारणीभूत होणाऱ्या, राग देणाऱ्या.. वेळोवेळी आपण त्यांच्यावर मतं व्यक्त करत असतो. कधी प्रत्यक्षपणे किंवा कधी मनातल्या मनात. त्याच विविधरंगी भावना या पुस्तकात शब्दांच्या माध्यमातून व्यक्त झालेल्या आहेत.
-
Al Tamir
सौदी अरेबियातील एक शहर अल् तमीर. इथे फुलूस म्हणजे पैशाच्या मागावर असलेल्या भारतीयांच्या जथ्यात एक संवेदनशील शिक्षक आपल्या डॉक्टर पत्नीसोबत वाट चुकून येतो आणि इथल्या कट्टर इस्लामिक राजवटीत अक्षम्य आगळीक करतो. त्याची आणि दोन भिन्न संस्कृतींच्या गाठभेटीची ही ‘ट्नॅजिकॉमिक’ कथा. उपभोगाचा अव्याहत पाठलाग करणारा आणि तो करताना आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, प्रादेशिक वैशिट्यांना गोंजारणा-या भारतीयांच्या या कथेला जसे वाळवंटाचे रखरखीत संदर्भ आहेत, तसेच फक्त पैशासाठी परक्या आकाशाखाली स्वत:ची कोंडी अनुभवणा-या मजबूर व्यक्तींच्या एकाकीपणाचे सुद्धा. सौदी अरेबियाच्या कट्टर धर्मसत्तेची तसेच भारतीयांच्या आपसांतल्या हेव्यादाव्यांची आणि राजकीय प्रेरणांची पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी गल्फमधील भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनाचा वास्तववादी आलेख आहे.