-
Dhag (ढग)
‘ढग’ ही ‘चेटूक’ आणि ‘ऊन’नंतर त्रिधारेतील शेवटची कादंबरी. ‘चेटूक’मधून सामाजिक, ‘ऊन’मधून कौटुंबिक आणि ‘ढग’मधून व्यक्तिगत... अशा आत्मशोधक जाणिवांचा प्रवास हे ह्या त्रिधारेचं वैशिष्ट्य आहे. ‘मी कोण ?’ हा ‘ढग’चा काळीजप्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे निनाद काही माणसांच्या मनात कायम गुंजत असतात. पण जगण्याच्या झटापटीत त्याकडे दुर्लक्ष होतं. ढग ह्याच आद्य प्रश्नाशी झुंज देते. ती घेताना आठवणीचा पासवर्ड वापरून ती भूतकाळाच्या गुहेचं दार उघडते.
-
Oon (ऊन)
‘चेटूक’, ‘ऊन’ आणि ‘ढग’ ह्या त्रिधारेतील ‘ऊन’ ही दुसरी कादंबरी. स्त्री-पुरुष प्रेमातला संवाद विसंवादात रुपांतरीत झाल्यानंतर दिघ्यांच्या घराला घोर लागतो. पण रोजचं जगणं कोणाला चुकलं आहे? ते सर्वव्यापी उन्हात सुरूच राहतं. इथे भेटणारी बाया-माणसं आणि मुलं जगण्याच्या नादावर डोलत मोठी होतात. खूप काही कमावतात, खूप सारं गमावतात. राणी आणि वसंताची दोन्ही मुलं प्रकाश आणि विकास कौटुंबिक प्रेमाची ऊब कमावतात. ऊन या उबेचा लख्ख उत्सव आहे. संक्रमण काळात कौटुंबिक प्रेम हे मूल्यं टिकून राहावं ही ‘ऊन’ची आकांक्षा आहे.
-
Ishwar Dot Kom ( ईश्वर डॉट कॉम )
ही आहे एक धमाल कहाणी . ती घडते देवनगरीत म्हणजे तुमच्या आमच्या सभोवती. आपण डोळे उघडून बघायला मात्र हवं. देव ,धर्म , संस्कृती अन परंपरेच्या व्यापारीकरणात हृदयातला ईश्वर हृदयात हरवतो. उतार आधुनिक काळात तरी आपण विवेक हा तारणहार, समता हा ईश्वर आनं प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा हि त्रिसूत्री मानणार आहोत का? निकोप समाजजीवन अण्णा अन विवेकशील नागरिकत्व डोळसपणे अंगात ?मुरवणार आहोत का ? गमतीजमतीतून नवोत्तर युगातील धर्मचिकित्सा करणारी हसत-हसवत,गुदगुल्या करत वाचकांना विचारप्रवण करणारी कादंबरी
-
Al Tamir
सौदी अरेबियातील एक शहर अल् तमीर. इथे फुलूस म्हणजे पैशाच्या मागावर असलेल्या भारतीयांच्या जथ्यात एक संवेदनशील शिक्षक आपल्या डॉक्टर पत्नीसोबत वाट चुकून येतो आणि इथल्या कट्टर इस्लामिक राजवटीत अक्षम्य आगळीक करतो. त्याची आणि दोन भिन्न संस्कृतींच्या गाठभेटीची ही ‘ट्नॅजिकॉमिक’ कथा. उपभोगाचा अव्याहत पाठलाग करणारा आणि तो करताना आपल्या धार्मिक, सांस्कृतिक, प्रादेशिक वैशिट्यांना गोंजारणा-या भारतीयांच्या या कथेला जसे वाळवंटाचे रखरखीत संदर्भ आहेत, तसेच फक्त पैशासाठी परक्या आकाशाखाली स्वत:ची कोंडी अनुभवणा-या मजबूर व्यक्तींच्या एकाकीपणाचे सुद्धा. सौदी अरेबियाच्या कट्टर धर्मसत्तेची तसेच भारतीयांच्या आपसांतल्या हेव्यादाव्यांची आणि राजकीय प्रेरणांची पार्श्वभूमी लाभलेली ही कादंबरी गल्फमधील भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनाचा वास्तववादी आलेख आहे.